ETV Bharat / city

मंत्रिमंडळाची बैठक सुरू असताना जयंत पाटील यांची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल - ताज्या बातम्या

राज्य मंत्रिमंडळाची बैठक सुरू असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना अस्वस्थ वाटू लागले. तात्काळ ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांना उपचार्थ दाखल केले असून त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे सांगण्यात आले.

जलसंपदा मंत्री जयंत पाटील
जलसंपदा मंत्री जयंत पाटील
author img

By

Published : Jul 28, 2021, 7:17 PM IST

मुंबई - राज्य मंत्रिमंडळाची बैठक सुरू असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना अस्वस्थ वाटू लागले. तात्काळ ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांना उपचार्थ दाखल केले असून त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे सांगण्यात आले.

प्रकृती स्थिर असल्याची माहिती

राज्यात आलेल्या अतिवृष्टीमुळे अतोनात हाल झाले. पूर व दरडी कोसळून मोठ्या प्रमाणावर घरांचे, रस्ते, शेती, दुकानांचे नुकसान झाले. या पार्श्वभूमीवर राज्य मंत्रिमंडळाची बैठक सुरू होती. दरम्यान, जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यामुळे मंत्रिमंडळ बैठक अर्धवट सोडून पाटील यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्यासह गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, सतेज पाटील आदी मंत्री त्यांच्यासोबत आहेत. पाटील यांची तपासणी करण्यात आली असून सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. अशी माहिती सांगण्यात आली आहे. पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या समवेत नुकताच पश्चिम महाराष्ट्राचा दौरा केला होता.

हेही वाचा - दिलासादायक! बँकेवर निर्बंध लागू झाले तरी ठेवीदाराला 90 दिवसांमध्ये मिळणार पैसे

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.