मुंबई - शहराला पाणी पुरवठा करताना, प्रथम पिसे पंजारापोळ या ठिकाणी पाणी आणून नंतर ते शहरात वितरित केले जाते. पिसे पंपिंग केंद्रातील विद्युत पुरवठा अचानक खंडित झाल्याने आज (सोमवारी) मुलुंड ते घाटकोपर आणि चेंबूर ते मानखुर्द या विभागात १५ टक्के पाणीकपात लागू करण्याचा निर्णय पालिकेच्या जल विभागाने घेतला आहे.
हेही वाचा... 'शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये ही म्हण खोटी ठरवावी'
मुंबईला शहराबाहेरील सात तालावांमधून पाणीपुरवठा केला जातो. त्यासाठी शहापूर येथील पिसे आणि पांजरापोळ या ठिकाणी पाणी आणून नंतर भांडूप संकुल येथे त्याचे शुद्धीकरण केले जाते. त्यानंतर नागरिकांना वितरित केले जाते. पिसे पंपिंग स्टेशनमधील विद्युत पुरवठा अचानक खंडित झाला आहे. तसेच पांंजरापोळ पंपिंग स्टेशनमध्ये आवश्यक पाणी साठवण्यात आलेले नाही. त्यामुळे आज पाणी पुरवठा करताना अडचणी येणार असल्याने मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, चेंबूर, गोवंडी, मानखुर्द आदी विभागात १५ टक्के पाणी कपात करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. त्यामुळे नागरिकांनी पाणी जपून वापरावे असे आवाहन जल विभागाकडून करण्यात आले आहे.