मुंबई - मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या ( BMC Election 2022 ) पार्श्वभूमीवर प्रभाग पुनर्रचना केली आहे. त्याविरोधात तब्बल ८१२ हरकती दाखल झाल्या आहेत. या प्रभाग पुनर्रचनेला भाजपानेही विरोध केला आहे. नागरिक, मतदार यांना सोयी सुविधा देताना यामुळे अडचणी निर्माण होणार आहेत. तसेच एखादा प्रभाग दोन प्रशासकीय वॉर्ड तसेच तीन ते चार विधानसभा क्षेत्रात विभागला गेल्याने लोकप्रतिनिधींमध्ये समन्वय राखतानाही अडचणी निर्माण होणार आहेत. यामुळे ही प्रभाग पुनर्रचना निवडणूक आयोगाच्या नियमानुसार नसल्याची तक्रार भाजपाने पालिका आयुक्त व निवडणूक अधिकाऱ्यांकडे एका पत्राद्वारे नोंदवली आहे.
प्रभाग पुनररचना -
मुंबई महापालिकेची निवडणूक एप्रिल महिन्यात होत आहे. त्यासाठी राज्य सरकारने पालिकेतील २२७ प्रभागांमध्ये ९ प्रभागांची वाढ केली आहे. मुंबई महापालिकेत २३६ प्रभाग झाले असून त्यावर १ फेब्रुवारी ते १४ फेब्रुवारी पर्यंत ८१२ सूचना व हरकती दाखल झाल्या आहेत. भाजपाकडून ही प्रभाग रचना योग्य नसल्याचे म्हटले आहे. त्यासाठी पालिकेतील गटनेते प्रभाकर शिंदे, पक्ष नेते विनोद मिश्रा, नगरसेवक हरिष भांदिर्गे यांनी पालिका आयुक्त इकबाल सिंग चहल व उप निवडणूक अधिकारी, मुंबई महापालिका यांच्याकडे हरकत नोंदवली आहे.
ड्राफ्ट चुकीचानवीन प्रभाग रचनेचा ड्राफ्ट हा चुकीच्या पद्धतीने बनवण्यात आला आहे. नियमानुसार नाला, मोठे पूल, मोठे रस्ते, रेल्वे आदी सीमारेषा ठरवल्या गेल्या आहेत. प्रभाग क्रमांक 31 मध्ये नाल्या ऐवजी एक छोटी गल्ली सीमारेषा ठरवण्यात आले आहे. एका इमारतीला दोन प्रभागांमध्ये विभागण्यात आले आहे. यामुळे मतदारांमध्ये संभ्रम निर्माण होऊन मतदानाचा टक्का कमी होऊ शकतो अशी भीती भाजपाने व्यक्त केली आहे. प्रभाग क्रमांक 109 मध्ये रेल्वेची हद्द ओलांडून प्रभाग बनवण्यात आला आहे. यामुळे हा प्रभाग पाच किलोमीटर लांबीचा झाला आहे. यामुळे नागरिकांना पालिकेच्या सेवा मिळवण्यासाठी रेल्वेची हद्द ओलांडून यावे लागेल. तसेच भाजपच्या नेत्यांनी भ्रष्टाचाराचा आरोप केल्यामुळे अशा प्रकारे प्रभागांचे विभाजन केल्याचा आरोप भाजपाने केला आहे.
प्रभाग व सोसायटी विभागल्या
प्रभाग क्रमांक 30 हा पी नॉर्थ आणि पी साऊथ या दोन वॉर्डमध्ये विभागण्यात आला आहे. यामुळे येथील नागरिकांना नागरी सुविधेसाठी मोठ्या प्रमाणात अडचण निर्माण होणार आहे. प्रभाग क्रमांक 164 हा चार विधानसभा क्षेत्रांमध्ये विभागण्यात आला आहे. यामुळे निवडून आलेले नगरसेवक तसेच आमदार यांना या ठिकाणी सोयीसुविधा देताना अडचणी निर्माण होणार आहेत. राजकीय पक्षांना अडचणीत आणण्यासाठी प्रभाग रचना करण्यात आली आहे. प्रभाग क्रमांक 44 मध्ये एका सोसायटीला दोन प्रभागांमध्ये विभागण्यात आले आहे. या सोसायटीमधील चार बुथ प्रभाग क्रमांक 38 मध्ये तर 10 बूथ प्रभाग क्रमांक 43 मध्ये विभागण्यात आले आहेत अशी तक्रार भाजपने केली आहे. या प्रभागात लोकसंख्येचा असमतोल