ETV Bharat / city

Ajit Pawar On Muddasir Lambe : वक्फ बोर्डाचे मुदस्सीर लांबेची नियुक्ती फडणवीसांच्या काळात - अजित पवार - मुदस्सीर लांबेची नियुक्ती फडणवीसांच्या काळातील

वक्फ बोर्डाचे सदस्य मुदस्सीर लांबेची नियुक्ती तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ( Muddasir Lambe Appointed During Fadnavis Government ) काळात झाली होती. त्यामुळे त्यांनी आमच्या नावाने बोटे मोडू नये, असे म्हणत अजित पवार यांनी फडणवीसांना प्रत्युत्तर दिले ( Ajit Pawar Reply Devendra Fadnavis ) आहे.

Ajit Pawar
Ajit Pawar
author img

By

Published : Mar 16, 2022, 10:40 PM IST

मुंबई - वक्फ बोर्डाचे सदस्य मुदस्सीर लांबे यांची नियुक्ती तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Muddasir Lambe Appointed During Fadnavis Government ) यांच्या काळात झाली होती. त्यामुळे त्यांनी आमच्या नावाने बोटे मोडू नये, असे म्हणत अजित पवार यांनी फडणवीसांना प्रत्युत्तर दिले ( Ajit Pawar Reply Devendra Fadnavis ) आहे.

अजित पवार विधिमंडळात बोलताना म्हणाले, मुदस्सीर लांबे यांची नियुक्ती राज्य सरकारने केली नव्हती. तर, मुतलवी संवर्गातून त्यांची निवड झाली होती. ती सुद्धा 31 ऑगस्ट 2019 रोजी करण्यात आलेली. यावेळी राज्यात देवेंद्र फडणवीस यांचे सरकार होते. त्यामुळे त्यांनी विनाकारण महाविकास आघाडी सरकारवर आरोप करु नये, असेही पवार यांनी सांगितले आहे.

काय म्हणाले होते फडणवीस?

विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या दुसऱ्या पेनड्राईव्ह बॉम्बने महाविकास आघाडी सरकारमध्ये खळबळ उडाली होती. या पेनड्राईव्हमध्ये वक्फ बोर्डाच्या सदस्यांचे व्हिडिओ संभाषण होते. यात दोन व्यक्ती असल्याची माहिती फडणवीस यांनी दिली. यातील एकाचे नाव मोहम्मद अर्शद खान, तर दुसऱ्याचे नाव डॉक्टर मुदस्सीर लांबे असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. तसेच या दोघांना वक्फ बोर्डावर नियुक्त करण्यात आले आहे. एका महिलेने या दोघांपैकी मुदस्सीर लांबे याच्याविरोधात बलात्काराची तक्रार केली होती. मात्र, तरीही त्याला अटक केली नाही. पण, महिलेच्या पतीला चोरीच्या आरोपातून अटक करण्यात आली आणि तो सध्या तुरुंगात आहे. त्याचबरोबर लांबे याचे दाऊदशी संबंध असून, वक्फ बोर्डाच्या जमिनीसंदर्भात मोठा घोटाळा झाल्याचे फडणवीस यांनी म्हटलं होते.

हेही वाचा - Manisha Kayande On Pravin Darekar : प्रवीण दरेकर फरार आहेत का?, शिवसेनेने विधानपरिषदेत भाजपाला डिवचले

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.