ETV Bharat / city

Presidential election : राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी मतदान साहित्य विधानभवनात रवाना - राष्ट्रपती निवडणूक

भारतीय निवडणूक आयोगाकडून ( Election Commission of India ) राष्ट्रपदीपदाच्या निवडणुकीची ( Presidential election ) तयारी पूर्ण झाली आहे. मतदानासाठीचे साहित्य विविध राज्यांच्या विधानमंडळांच्या सचिवालयांमध्ये पोहोचविण्याचे काम सध्या सुरू आहे. दिल्लीहून विशेष विमानाने या साहित्याचा बॅलेट बॉक्स ( Ballot box ) मुंबईतील विधिमंडळाच्या सचिवालयात आणला आहे. या सर्व साहित्यांची वाहतूक करताना विशेष म्हणजे बॅलेट बॉक्स ( Ballot box ) ही व्यक्ती आहे असे समजून तिकीट काढण्यात आले.

Presidential election
Presidential election
author img

By

Published : Jul 13, 2022, 9:47 AM IST

Updated : Jul 13, 2022, 10:26 AM IST

मुंबई - राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी ( Presidential election ) भारत निवडणूक आयोग ( Election Commission of India ) नवी दिल्ली यांनी आज मतपेट्या, मतपत्रिका, विशेष पेन आणि इतर सीलबंद निवडणूक साहित्याचे वाटप केले आहे. हे सर्व साहित्य नवी दिल्ली येथून विमानाने आणण्यात आले आहे. या सर्व साहित्यांची वाहतूक करताना विशेष म्हणजे बॅलेट बॉक्स ( Ballot box ) ही व्यक्ती आहे असे समजून तिकीट काढण्यात आले. हे सर्व साहित्य मंत्रालयातील सहमुख्य निवडणूक अधिकारी मनोहर पारकर, उपमुख्य निवडणूक अधिकारी श्रीमती शुभा बोरकर तसेच विधानभवनातील सहायक निवडणूक निर्णय अधिकारी ऋतुराज कुडतरकर आणि अवर सचिव सुभाष नलावडे यांनी नवी दिल्लीहून मुंबईत आणले आहे.

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी मतदान साहित्य विधानभवनात पोहचले

सोमवारी राष्ट्रपतीपदासाठी मतदान - येत्या 18 जुलै 2022 रोजी राष्ट्रपती पदाकरीता भारताची राजधानी दिल्ली, पुंडूचेरी केंद्रशासित प्रदेश आणि राज्य विधानमंडळ सचिवालये येथे मतदान होणार आहे. त्यानुसार विधिमंडळात त्याची तयारी सुरू झाली आहे. भारत निवडणूक आयोगाने पाठविलेले निवडणूक साहित्य मुंबई विमानतळ येथून महाराष्ट्र विधानभवन येथे आणण्यात आले. हे साहित्य महाराष्ट्र विधान भवन येथे अपर मुख्य सचिव तथा मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे, विधीमंडळाचे प्रधान सचिव राजेंद्र भागवत यांच्या प्रमुख उपस्थितीत विधिमंडळ सचिवालयाच्या स्ट्राँग रूम येथे पूर्ण सुरक्षित आणि योग्य त्या खबरदारीसह ठेवण्यात आले आहे.

द्रोपदी मुर्मू, यशवंत सिन्हा उमेदवार - 18 जुलै 2022 रोजी राष्ट्रपती पदाकरीता दिल्ली, पुंडूचेरी केंद्रशासित प्रदेश आणि राज्य विधानमंडळ सचिवालये येथे मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वातील आघाडीकडून माजी राज्यपाल द्रोपदी मुर्मू यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर विरोधी पक्षांच्या वतीने देशाचे माजी अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांना उमेदवारी देण्यात आली आहे. देशाचे सर्वोच्च पद असलेल्या या पदासाठी या दोनच उमेदवारांमध्ये ही निवडणूक होत आहे. यामध्ये द्रोपदी मुर्मू यांचे पारडे जड दिसत आहे.

आदिवासी समाजातील पहिल्याच उमेदवार - राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीने द्रोपदी मुर्मू यांना उमेदवारी दिली आहे. राष्ट्रपतीपदाकरीता निवडणूक लढविणाऱ्या आदिवासी समाजातील त्या पहिल्याच महिला उमेदवार आहेत. त्या विजयी झाल्यास देशाच्या या सर्वोच्च पदावर जाण्याचा आदिवासी समाजातील महिलेस सन्मान मिळणार आहे. राष्ट्रपतीपदासाठी होणाऱ्या मतदानावर नजर टाकल्यास सध्या द्रोपदी मुर्मू यांचे पारडे जड मानले जात आहे. केंद्रात सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वातील आघाडीकडे जवळपास 50 टक्के मते निश्चित आहेत. त्यामुळे त्यांचा विजय जवळपास निश्चित मानला जात आहे.

हेही वाचा - Actress Ketaki Chitale Controversy : अभिनेत्री केतकी चितळेची याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाची 14 जुलै पर्यंत स्थगिती!

हेही वाचा - ETV Bharat Impact: संभाजीराजेंनी मुख्यमंत्र्यांकडे पन्हाळा संवर्धनाची केली मागणी

हेही वाचा - Maharashtra breaking News : गुरुपौर्णिमेनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेब ठाकरेंना केले अभिवादन

Last Updated : Jul 13, 2022, 10:26 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.