मुंबई - महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांचा आज स्मृतिदिन आहे. या निमित्ताने 'ई टीव्ही भारत'ने धीरज देशमुख यांच्याशी संवाद साधला. या वेळी त्यांनी सांगितले की, ही परंपरा त्यांच्या निधनाच्या ७ वर्षानंतर आजही कायम आहे. ९८२११२५००० हा विलासराव देशमुख यांचा नंबर अजूनही सुरू आहे.
या नंबरवर फोन केल्यानंतर विलासराव देशमुखांची भाषणे ऐकवली जातात. आम्ही या नंबरवर फोन केला असता, आम्हाला विलासराव देशमुखांचे एक भाषण ऐकण्यास मिळाले आहे. त्यामुळे त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी ही सुविधा आजही चालू आहे.