ETV Bharat / city

Vidhan Sabha Floor Test : फ्लोअर टेस्टवेळी सर्व आमदारांना सावधगिरी बाळगण्याचे शिंदे-फडणवीस यांचे निर्देश - Vidhan Sabha Floor Tes

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारची सोमवारी विधानसभेत चाचणी ( Floor Test On Eknath Shinde Government ) होणार आहे. विधानसभा अध्यक्षपदी भाजपचे राहुल नार्वेकर यांची निवड झाली. या निवडणुकीत राहूल नार्वेकर ( Rahul Narvekar ) 164 मते मिळवून विजयी झाले आहेत. राजकीय संकटानंतर महाराष्ट्र विधानसभेचे ( Maharashtra Legislative Assembly ) दोन दिवसांचे विशेष अधिवेशन होत आहे. महाराष्ट्र विधानसभेत आज सभापती निवडीवरून शिवसेनेच्या दोन गटांमध्ये वादावादी झाली. यापूर्वी, शिवसेना, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटाने वेगवेगळे व्हिप जारी करून आमदारांना आपापल्या उमेदवारांना मतदान करण्याचे निर्देश दिले होते.

Vidhan Sabha Floor Test: Shinde-Fadnavis group instructs all young women MLAs to be careful
युतीच्या सर्व आमदारांना सावधगिरी बाळगण्याचे शिंदे-फडणवीस गटाचे निर्देश
author img

By

Published : Jul 3, 2022, 10:44 PM IST

Updated : Jul 3, 2022, 10:51 PM IST

मुंबई - शिवसेनेचे बंडखोर नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट तसेच भाजपने आज विधानसभा अध्यक्ष पदाच्या निवडीचा त्यांचा पहिला टप्पा पूर्ण केलेला आहे. पण, उद्या शिंदे-फडणवीस सरकारला बहुमत चाचणीचा दुसरा महत्त्वाचा टप्पा पार करावा लागणार आहे. याबाबत आज शिंदे गटाच्या आमदारांची तसेच भाजपच्या आमदारांची संयुक्त बैठक मुंबईतील ताज प्रेसिडेंट या पंचतारांकित हॉटेलमध्ये झाली. या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी संबोधित केले.

बेसावध राहू नका, चूक करू नका? आज विधानसभा अध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये शिंदे गट तसेच भाजप यांच्या आमदारांची संख्या 164 आहे. भाजपचे दोन आमदार मुक्ता टिळक, लक्ष्मण जगताप हे आजारी असल्याने उपस्थित राहू शकले नाही. भाजप-शिंदेगटकडे सध्या 166 आमदारांचा आकडा आहे. आजारी असलेले दोन्ही आमदार उद्या बहुमत चाचणीसाठी मुंबईत येण्याची शक्यता आहे. मात्र, बहुमतासाठी जो आकडा पाहिजे त्याच्यापेक्षा शिंदे- भाजपगटाचे संख्याबळ जास्त आहे. उद्या कशा पद्धतीने मतदानाला सामोरे जायचे या बद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी युतीच्या सर्व आमदारांना मार्गदर्शन केले. मतदानाबाबत सावधगिरी बाळगण्याचा इशाराही देवेंद्र फडवणीस यांनी सर्व आमदारांना दिला आहे.

हेही वाचा - Meeting of BJP National Executive: पंतप्रधानांची 'KCR' यांच्यासह घराणेशाहीवर जोरदार टीका

आमदार आमच्या संपर्कात, मग कुठे गेले आमदार? शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्याबरोबर अगोदर सुरत, गुवाहाटी, नंतर गोवा असे पर्यटन करायला गेलेल्या शिवसेनेच्या ३९ आमदारांपैकी १५ ते २० आमदार आमच्या संपर्कात आहेत असे, शिवसेनेकडून सांगितल जात होते. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, खासदार संजय राऊत हे वारंवार शिवसेनेचे बंडखोर आमदार आमच्या संपर्कात असल्याचे सांगत होते. याचा खुलासा आज खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहात करत केला. जे आमदार त्यांच्यासोबत होते त्यांनी मला सांगितले असते तर, मी त्यांना विशेष चॅटर्ड विमानाने मुंबईत पाठवले असते, असे शिंदे विधानसभेत म्हणाले. यावरून हे सिद्ध झाले की, शिंदेगटाबरोबर गेलेला शिवसेनेचा एकही आमदार शिवसेना नेत्यांच्या संपर्कात नव्हता. म्हणून आज विधानसभा अध्यक्ष निवडणुकीत शिंदे-फडणवीस युती सरकारला १६४ हा बहुमताचा आकडा गाठता आला. यावरून आता उद्या चाचणीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

विश्वास दर्शक ठरावाला शिंदे-फडणवीस जाणार सामोरे - शिवसेनेचे बंडखोर नेते, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( CM Eknath Shinde ) व भाजपसाठी आज ( 3 जुलै ) विधानसभेत विधानसभा अध्यक्ष पदाच्या निवडणुकीचा पहिला पेपर होता. तो पेपर त्यांनी विधानसभा अध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये व्यवस्थितपणे पार पडला आहे. कारण विधानसभा अध्यक्षपदी भाजपचे उमेदवार राहुल नार्वेकर ( Rahul Narwekar ) हे आज विराजमान झाले आहेत. परंतु, आता दुसरी महत्त्वाची लढाई उद्या ( 4 जुलै ) बाकी असून, विश्वास दर्शक ठरावाला शिंदे-फडणवीस सरकारला सामोरे जायचे आहे. त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपले मत व्यक्त केले आहे.

'आम्ही बहुमताने विश्वासदर्शक ठराव जिंकू' - देवेंद्र फडणवीस म्हणाले की, विधानसभा अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत १६४ आमदार आमच्या बाजूने होते. आमचे लक्ष्मण जगताप व मुक्ता टिळक हे दोन आमदार आजारी असल्याकारणाने ते आज अनुपस्थित राहिले. आमच्याकडे १६६ आमदारांचा पूर्ण पाठिंबा आहे. उद्या विश्वास मताचा प्रस्ताव ठेवण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात हा प्रस्ताव आम्ही बहुमताने पारित करू, असा विश्वास उपमुख्यत्र्यांनी व्यक्त केला ( Devendra Fadnavis On Vidhan Sabha Floor Test ) आहे.

हेही वाचा - Assembly Speaker Election : 'शिवसेनेच्या बंडखोर 39 आमदारांना निलंबित करा; विधानसभा अध्यक्षांना पत्र'

हेही वाचा - Devendra Fadnavis : 'उमेश कोल्हे हत्या प्रकरणात विदेशी हात आहे का?, याची चौकशी होणार'

Last Updated : Jul 3, 2022, 10:51 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.