मुंबई - उद्या विधानसभेत होणाऱ्या बहुमत चाचणी संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसची महत्त्वाची बैठक आज मुंबईतील यशवंतराव चव्हाण केंद्रात पार पडली. या बैठकीत विरोधी पक्षनेते पदाबाबत चर्चा करण्यात आली. तसेच संजय पांडे ( Sanjay Pandey यांना ईडीने बजावलेल्या नोटीस बाबत काहीच माहीत नसल्याचे माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले. अमरावती प्रकरणात बोलताना वळसे पाटील म्हणाले की, या प्रकरणाचा तपास एनआयए ( National Investigation Agency ) करीत आहे. यात लपवण्यासारखे काहीच नाही. जी घटना झालेली आहे ती सर्वांच्या समोर आहे. यात संशयित असलेल्या आरोपींना पोलिसांनी पकडले असल्याची माहिती त्यांनी दिली. या बैठकीला माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, ( Former Deputy Chief Minister Ajit Pawar ) छगन भूजबळ, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील ( Jayant Patil ) तसेच माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील ( Dilip Walse Patil ) उपस्थित होते.
हेही वाचा - Assembly Speaker Election : 'शिवसेनेच्या बंडखोर 39 आमदारांना निलंबित करा; विधानसभा अध्यक्षांना पत्र'
दरम्यान, विधानसभा अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत १६४ आमदार आमच्या बाजूने होते. भाजपचे लक्ष्मण जगताप तसेच मुक्ता टिळक हे दोन आमदार आजारी असल्याकारणाने ते आज अनुपस्थित राहिले. असे नवनिर्वाचित उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Deputy Chief Minister Devendra Fadnavis ) यांनी सांगितले. तसेच आमच्याकडे १६६ आमदारांचा पूर्ण पाठिंबा आहे. उद्या विश्वास मताचा प्रस्ताव ठेवण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात हा प्रस्ताव आम्ही बहुमताने ( Devendra Fadnavis On Vidhan Sabha Floor Test ) पारित करू, असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला. शिवसेनेचे बंडखोर नेते, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, तसेच ( CM Eknath Shinde ) भाजपसाठी आज ( 3 जुलै ) विधानसभेत विधानसभा अध्यक्ष पदाच्या निवडणुकीचा पहिला पेपर होता. तो पेपर त्यांनी विधानसभा अध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये व्यवस्थितपणे पार पडला असल्याचे फडणवीस म्हणाले. विधानसभा अध्यक्षपदी भाजपचे उमेदवार राहुल नार्वेकर ( Rahul Narwekar ) हे आज विराजमान झाले आहेत. परंतु, आता दुसरी महत्त्वाची लढाई उद्या ( 4 जुलै ) बाकी असून, विश्वास दर्शक ठरावाला शिंदे-फडणवीस सरकारला उद्या सामोरे जावे लागणार आहे. त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपले मत व्यक्त केले आहे.
हेही वाचा - ED Summoned To Sanjay Pandey : पोलीस आयुक्त पदावरून बाजूला होताच संजय पांडेंना धक्का; ईडीकडून समन्स