ETV Bharat / city

Aslam Shaikh : 'महाविकास आघाडीवर कोणीही आमदार नाराज नाही'

महाविकास आघाडी सरकारवर ( Mahavikas Aghadi ) कोणीही नाराज नाही. आम्ही एकसंघ आहोत, आमचे सर्व आमदार निवडून येतील, असा विश्वास मंत्री अस्लम शेख ( Aslam Shaikh ) यांनी व्यक्त केला आहे.

Aslam Shaikh
Aslam Shaikh
author img

By

Published : Jun 18, 2022, 10:31 PM IST

मुंबई - महाविकास आघाडी सरकारवर ( Mahavikas Aghadi ) कोणीही नाराज नाही. आम्ही एकसंघ आहोत, आमचे सर्व आमदार निवडून येतील, असा विश्वास मंत्री अस्लम शेख ( Aslam Shaikh ) यांनी व्यक्त केला आहे. विधानपरिषद निवडणुकांच्या ( vidhan parishad election 2022 ) पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाने आपल्या आमदारांना वरळी येथील फोर सीजन हॉटेलमध्ये ठेवले आहे. या आमदारांची पक्षाचे वरिष्ठ नेते चर्चा करणार आहेत. या निवडणुकीत गुप्त मतदान पद्धती असलेले कशा रीतीने मतदान करावयाचे याचे मार्गदर्शन केले जाणार आहे. त्यासाठी पक्षाच्या सर्व आमदारांना पाचारण करण्यात आले आहे.

यावेळी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, मुंबई अध्यक्ष भाई जगताप यांच्यासह ज्येष्ठ मंत्री अशोक चव्हाण, मंत्री नितीन राऊत, मंत्री अस्लम शेख, मंत्री सतेज पाटील, आमदार प्रणिती शिंदे आणि अन्य आमदार उपस्थित होते.

दरम्यान, फोर सिझन हॉटेल येथे सर्व आमदार उपस्थित होणार आहेत. या आमदारांना मार्गदर्शन दिले जाणार आहे. सरकार पक्षावर कोणीही आमदार नाराज नाही, अशा पद्धतीची कुठेही चर्चा नाही. हे केवळ विरोधकांनी पसरवलेल्या अफवा आहेत. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारच्या सर्व जागा जिंकून येतील, असा विश्वास अस्लम शेख यांनी व्यक्त केला.

नाना पटोलेंचा गंभीर आरोप - विधान परिषद निवडणुकीसाठी केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करून भाजपातर्फे मविआ आमदारांना धमकावले जात असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.

हेही वाचा -Jitendra Awhad : जितेंद्र आव्हाडांची 'अग्निपथ'वरुन केंद्र सरकारवर टीका, म्हणाले, 'देशालाही कंत्राटीवर...'

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.