रायसेन (मध्य प्रदेश) - कोरोना संसर्गामुळे आईचा मृत्यू झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी मुलीने चौथ्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ती उडी मारत असताना काही नातेवाईक आणि शेजाऱ्यांनी तिला पकडून ठेवले. तिचे हात पकडून वर खेचण्याचा प्रयत्न सुरू होता. खाली उभे असणारे लोक मात्र मोबाईलमध्ये व्हिडिओ बनवण्यात व्यग्र होते.
आईच्या मृत्यूमुळे धक्का बसलेल्या या मुलीने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले. ती मुलगी किंचाळत होती. डझनभर लोक केवळ तमाशा पाहात व्हिडिओ करण्यात गुंतले होते.
हा प्रकार रायसेन शहरातील मंडीदिप ठाणे क्षेत्रातील हिमांशु मेगा सिटीतील असल्याचे सांगितले जात आहे. हे कुटुंब मूळचे कोलकात्यातील आहे. मृत मुलीची आईचे कोरोनाने निधन झाले होते. त्यानंतर तिने आज हे टोकाचे पाऊल उचलले होते.
मृत मुलीचे वय ३२ असून तिने चौथ्या मजल्यावरुन उडी मारण्याचा प्रयत्न केला. नातेवाईकांनी तिचा हात पकडण्याचा प्रयत्न केला. आरडोओरडा पाहून शेजारचे लोकही नातेवाईकांच्या मदतीला आले. जे तिला वर खेचण्याचा प्रयत्न करीत आहेत. परंतु खाली उभे असलेले लोक व्हिडिओ बनवत राहिले. त्या मुलीला वाचवण्यासाठी त्यांनी कोणताही पुढाकार घेतला नाही.
नातेवाईकांनी मुलीला वर खेचण्याचा प्रयत्न करीत असतानाच हात सुटला आणि ती थेट खाली जमीनीवर कोसळली. तात्काळ तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र तिचा प्राण गेला होता. पोलीस या प्रकरणाचा खोलवर तपास करीत आहे. संकटाच्या या काळात असे कोणतेही पाऊल उचलू नये असे आवाहन ईटीव्ही भारत करीत आहे.
हेही वाचा - कार्तिक आर्यनच्या एक्झीटनंतर 'दोस्ताना २'मध्ये झळकणार अक्षय कुमार?