ETV Bharat / city

घोटाळे अन् शपथपत्रांमधील चलाखी.. - सिंचन घोटाळा

२०१४ मध्ये एका पुण्यातील कंत्राटदाराने सरकारला दिलेल्या लेखी निवेदनात सर्व सिंचन विभागास अगदी कारकुनापासून ते कार्यकारी अभियंता, अधिक्षक अभियंता, संचालक आणि सचिव आणि अध्यक्षांपर्यंत  दलाली देणे सक्तीचे होते, असे म्हटले आहे.या लाचेचे प्रमाण प्रकल्पाच्या एकूण खर्चाच्या २२ टक्केपर्यंत होते. यावर उसळलेला जनप्रक्षोभ आणि टीकेची पर्वा न करता, केंद्र सरकार आणि राज्य सरकारी विभागांनी जसे की सीबीआय, सक्तवसुली संचालनालय, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग आदीं तपास संस्था राजकारण्यांच्या पावलांवर पावले टाकत असून आपली जबाबदारी पार पाडण्यात अपयशी ठरत आहेत आणि लोकांचा विश्वास हरवत आहेत.

Vidarbha Irrigation Scam : Anti-corruption Affida'wits'
घोटाळे अन् शपथपत्रांमधील चलाखी..
author img

By

Published : Dec 27, 2019, 3:12 PM IST

कोणत्याही कोनातून पाहिले तरीही, समकालीन राजकारण हे घोटाळ्यांचे न उलगडलेले कोडे बनले आहे. राजकीय नेते शपथ घेऊन देशाची घटना आणि कायद्यानुसार आपल्या जबाबदाऱ्या पार पाडतील, भीती किंवा मर्जीशिवाय आणि प्रेम किंवा कुहेतू न बाळगता, ज्या काही प्रतिज्ञा करतात, त्यात खरेपणाचे कोणतेही तत्व नसते आणि न्यायालयात भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागांकडून जी प्रतिज्ञापत्रे सादर केली जातात, ते विभाग त्यांच्याच नियंत्रणाखाली काम करतात, ही शोकांतिका आहे. 'कन्यासुलकम'मधील गिरीषम हे प्रसिद्ध पात्र असे म्हणते की, जो आपली मते प्रसंगानुरूप बदलत नाही तो राजकारणीच नाही! महाराष्ट्रातील भ्रष्टाचारविरोधी विभागाने राजकीय मालकांशी संगनमत करून सोयीनुसार आपली विधाने बदलून गिरिषम याचे खऱ्या अर्थाने अनुकरण केले आहे.

पाणीप्रकल्पांची कंत्राटे देताना ७० हजार कोटी रूपयांचा घोटाळा झाल्याच्या गंभीर आरोपांच्या पार्श्वभूमीवर, मुंबई उच्च न्यायालयाने 'एसीबी'ला या घोटाळ्यात अजित पवार यांचा कितपत हात आहे, याची चौकशी करण्याचा आदेश दिला. गेल्या वर्षीच्या नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात, एसीबीचे महासंचालक यांनी म्हटले होते की, महाराष्ट्र सरकारच्या सामान्य प्रशासन नियमांच्या कलम दहानुसार, तत्कालीन काँग्रेस आणि राष्ट्रवादीप्रणित सरकारमधील सर्वाधिक काळ जलसंपदा मंत्री राहिलेले हे एकटेच विभागातील सर्व गैरव्यवहारांना जबाबदार आहेत. अजित पवार यांनी असा आग्रह धरला की, सर्व नियम आणि प्रक्रियांचे योग्य रित्या पालन केले जात आहे की नाही, याची खात्री करण्यासाठी सचिव आणि कार्यकारी संचालक जबाबदार आहेत, एसीबीने न्यायालयाला सांगितले की, कंत्राटे बहाल करण्याच्या आणि आगाऊ बयाणा देण्याच्या सर्व कागदपत्रांवर अजित पवार यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. त्यानंतर, एसीबीने असे विधान केले की, घोटाळ्यासाठी आणि सरकारचे मोठे नुकसान करण्यास जबाबदार असलेले सर्वजण, नियम आणि शासननियमांचा आधार घेत आपली जबाबदारी इतरांवर ढकलत आहेत. एसीबीने आपल्या प्रतिज्ञापत्रात सरकारची फसवणूक करण्यासाठी जलसंपदा मंत्रालयाने रचलेला हा कट आहे, असे स्पष्ट केले आहे. फक्त एका वर्षांने एसीबे आपले मत कसे बदलले, ते पहा.

उच्च न्यायालयात एसीबीचे प्रतिनिधित्व करताना एसपींनी १६ पानी प्रतिज्ञापत्र सादर केले आणि त्यात त्यांनी म्हटले आहे की, जलसंपदा मंत्री हे विदर्भ सिंचन विकास महामंडळाचे अध्यक्ष असले तरीही, कार्यकारी समितीने केलेल्या चुकांबद्दल मंत्र्यांना जबाबदार धरता येणार नाही. गैरव्यवहारांवर नजर ठेवणे ही त्यांची जबाबदारी नाही. ज्या एसीबीने, अजित पवार यांच्या कंत्राटे बहाल करण्यात हात असल्याबद्दल दुजोरा दिला होता, सोयिस्करिरित्या आपली भूमिका बदलली आणि सिंचन विभागाचे मुख्य सचिव आणि महामंडळाचे कार्यकारी संचालक हेच अनियमिततांना जबाबदार असल्याचा आरोप केला. आपल्या युक्तिवादाच्या समर्थनार्थ, त्यांनी असे म्हटले की जलसंपदा सचिवांनी अजित पवार यांना उच्च किमतीची बोली लावलेल्या निविदा स्वीकारू नका, असा सल्ला दिला. एसीबी विदर्भ सिंचन विकास महामंडळांतर्गत ४५ प्रकल्पांच्या २,६५४ निविदांचा तपास करत आहे. यापैकी ३२ प्रकल्पांवर १७,७०० कोटी रूपये इतका अतिरिक्त खर्च करण्यात आला, याचा तपास एसीबी करत आहे. नोव्हेंबर २०१८ नंतर या वर्षापर्यंत खरोखरच काही नव्याने सापडले असेल, यावर विश्वास ठेवणे अवघड आहे. एसीबीच्या भूमिकेत हा बदल का झाला, याचे कारण समजण्यास, सरकारी विभाग गरज आणि संधीनुसार रंग बदलून प्रतिज्ञापत्र चलाखीने कसे बदलण्यात कसे कुशल आहेत, हे ज्याला माहित आहे, त्याला मुळीच अवघड नाही.

भारतासारख्या लोकशाही देशात, पाच वर्षात एकदा सत्ता बदलते, सर्व विभागांनी सत्ताधाऱ्यांची लहर आणि आवडीनुसार स्वतःला जुळवून घेण्याचे कौशल्य हस्तगत केले आहे. दहा दिवसांपूर्वी अजित पवार भ्रष्टाचाराच्या खटल्यांच्या सापळ्यातून बाहेर पडत असून फडणवीसांच्या अल्पमतातील सरकारला पाठिंबा देण्याचे त्यांना पारितोषिक मिळाले आहे, ही बातमी पसरली होती. लगेच एसीबीने नऊ सिंचनाची प्रकरणे गुंडाळून टाकली आहेत, ज्यांचा अजित पवार यांच्याशी काहीच संबंध नाही, असे स्पष्टीकरण तातडीने दिले. गेल्या महिन्याच्या २७ तारखेस उच्च न्यायालयात एसीबीने सादर केलेल्या शपथपत्रात महाराष्ट्र राज्य सरकारच्या विशिष्ट तरतुदींनुसार प्रकल्पांची जी कथित गैरहाताळणी झाली, त्यात अजित पवार यांची काहीच जबाबदारी नव्हती, असे स्पष्ट केले. आता नऊ किंवा एकोणीस प्रकरणे बंद केली का, हे महत्वाचे नाही तर, अजित पवार यांना सर्व प्रकरणे आणि सर्व कलमे किरकोळ ठरवत अजित पवार यांना संरक्षण देण्याचा एसीबीचा अतिउत्साह आणि कठोर परिश्रम चिंताजनक आहेत.

अजित पवार फडणवीस सरकारमध्ये उपमुख्यमंत्री बनल्यावर आणि काँग्रेस, एनसीपी आणि शिवसेनेचे सरकार सत्तेवर आल्याच्या एक दिवस अगोदर अचानक हे सर्व घडले होते. सप्टेंबर २०१२ मध्ये माध्यमांनी उघड केलेल्या तथ्यांनुसार अजित पवार जेव्हा पाटबंधारे मंत्री होते, केवळ तीन महिन्यांत ३२ प्रकल्पांना संबंधित विभागाचे आक्षेप फेटाळून लावत उच्च अंदाजी किमत ठरवून मंजुरी देण्यात आली. १,२०० मोठ्या आणि मध्यम स्तराच्या सिंचन प्रकल्पांवर ७० हजार कोटी रूपये खर्च करण्यात आले.आणि लाभक्षेत्रात वाढीचा दर फक्त एक टक्का होता. अजित पवार यांनी २० हजार कोटी रूपयांचे प्रकल्प सिंचन विकास महामंडळाच्या शिफारशींशिवाय आठ महिन्यांत दिलदारपणे मंजूर केले. या प्रकारच्या अनियमिततांमुळे जो काही राजकीय गहजब झाला, त्यामुळे अजित पवार यांची २०१२ मध्ये सत्ता गेली. विरोधी पक्षनेते, फडणवीस यांनी काँग्रेस आणि एनसीपी सरकारने स्थापन केलेल्या विशेष तपास पथकाला १४ हजार कागदपत्रे सोपवली. महामंडळाच्या कार्यकारी समितीशी संगनमत करून, पवार यांनी कंत्राटदारांना दलाली घेऊन लाभ करून दिला, असाही आरोप केला गेला. माधव चितळे यांच्या नेतृत्वाखाली नेमलेल्या समितीने सत्य सादर केले. पण तत्कालीन सरकारने अजित पवार यांना क्लिनचिट दिले. फडणवीस २०१४ मध्ये मुख्यमंत्री झाल्यावर हे प्रकरण एसीबीकडे सोपवण्यात आले, तपास काम चार वर्षे ढकलत नेले आणि अजित पवार हेच गैरव्यवहारांना जबाबदार असल्याचे जाहीर करण्यात आले आणि... आश्चर्यकारकररित्या त्याच संस्थेने आपली भूमिका पूर्ण उलट केली.

२०१४ मध्ये एका पुण्यातील कंत्राटदाराने सरकारला दिलेल्या लेखी निवेदनात सर्व सिंचन विभागास अगदी कारकुनापासून ते कार्यकारी अभियंता, अधिक्षक अभियंता, संचालक आणि सचिव आणि अध्यक्षांपर्यंत दलाली देणे सक्तीचे होते, असे म्हटले आहे.या लाचेचे प्रमाण प्रकल्पाच्या एकूण खर्चाच्या २२ टक्केपर्यंत होते. यावर उसळलेला जनप्रक्षोभ आणि टीकेची पर्वा न करता, केंद्र सरकार आणि राज्य सरकारी विभागांनी जसे की सीबीआय, सक्तवसुली संचालनालय, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग आदीं तपास संस्था राजकारण्यांच्या पावलांवर पावले टाकत असून आपली जबाबदारी पार पाडण्यात अपयशी ठरत आहेत आणि लोकांचा विश्वास हरवत आहेत.

(हा लेख पार्वतम मूर्ती यांनी लिहिला आहे.)

Intro:Body:

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.