मुंबई - अभिनेता विक्की कौशल आणि कतरिना कैफ ( Vicky Kaushal and Katrina Kaif threat case ) यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या आरोपीला अटक करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांनी मनविंदर सिंग नावाच्या ( Manwinder Singh ) व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून मनविंदर कतरिनाला सोशल मीडियावर स्टॉक करत होता, नंतर कतरिना आणि विक्की जीवे मारण्याची धमकीही दिली. मनविंदर ही मुंबईतील एक संघर्षशील मॉडेल आहे. सोशल मीडियावर धमकी मिळताच विकीने पोलिसांकडे तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.
काय आहे प्रकरण ? : बॉलीवूडची आघाडीची अभिनेत्री कतरिना कैफला सोशल मीडियावर फाॅलो करत असलेल्या एका व्यक्तीकडून जीवे मारण्याची धमकी आल्याचा प्रकार समोर आला होता. कतरिना कैफचा पती विकी कौशल याने सांताक्रुज पोलीस स्टेशनमध्ये या संदर्भात आदित्य राजपूत या युवकाविरोधात तक्रार दाखल केली. कतरिनाला एक व्यक्ती सोशल मीडियावर फाॅलो करत होता. या व्यक्तीच्या विरोधात विकीने तक्रार दिली आहे. संध्याकाळ पोलिसांकडून आरोपी विरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. अनेक वेळा काही युझर्स सेलिब्रिटींना सोशल मीडियावर फाॅलो करतात. संबंधित व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली. याच माहितीच्या आधारे मुंबई पोलिसांनी कारवाई करत आरोपीला अटक केली आहे.
हेही वाचा - Threats To Katrina and Vicky : अभिनेत्री कॅटरिना आणि तीचा पती विकी कौशल यांना जीवे मारण्याची धमकी