मुंबई : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात आज माजी एटीएस अधिकारी यांची उलट तपासणी ( ATS Officer in Malegaon Blast Case ) या प्रकरणातील मुख्य आरोपी भाजप नेत्या तथा खासदार साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर यांच्या वकिलांच्या वतीने ( Sadhvi Pragya Singh Thakur in Malegaon Blast Case ) देण्यात ( BJP Leader and MP Sadhvi Pragya Singh Thakur ) आली आहे. या प्रकरणांमध्ये वापरण्यात आलेली मोटरसायकल बाईकची आरसी नंबर चेक करण्याकरिता सुरतमधील आरटीओ कार्यामध्ये गेले असता, त्यावेळी कुठलीही माहिती मिळाली नसल्याची कबुली या प्रकरणातील तपास अधिकारी ( ATS Officer Did Not Get Any Information at That Time ) यांनी आज उलट तपासणीदरम्यान दिली आहे.
मुंबई सत्र न्यायालयातील विशेष एनआयए कोर्टामध्ये दैनंदिन सुनावणी : मुंबई सत्र न्यायालयातील विशेष एनआयए कोर्टामध्ये दैनंदिन सुनावणी आज पार पडली. त्यावेळी या प्रकरणातील मुख्य आरोपी साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर यांच्या वकिलांकडून या प्रकरणातील माजी मुख्य तपास अधिकारी यांची उलट तपासणी सुरू असतानाच कोट रूममध्ये साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर यांनी प्रवेश केला. त्यावेळी त्यांना बसण्यासाठी चेअर देण्यात यावी, अशी विनंती कोर्टासमोर केल्यानंतर न्यायालयाने ती मान्य केली. मात्र, सुरू असलेले कामकाज मराठीत असल्याने साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर यांना समजत नसल्याने हे कामकाज हिंदीतून करण्यात यावे, अशी विनंतीदेखील करण्यात आली होती. तीदेखील न्यायालयाने मान्य केल्यानंतर हिंदीमध्ये कामकाज सुरू करण्यात आले होते.
प्रज्ञा सिंग ठाकूर यांचे वकील आणि माजी एटीएस अधिकाऱ्यांमध्ये कोर्ट रूममध्ये शाब्दिक वाद : या प्रकरणातील मुख्य आरोपी प्रज्ञा सिंग ठाकूर यांच्या वकिलांच्या वतीने एटीएस अधिकारी यांची उलट तपासणी करण्यादरम्यान एटीएस अधिकारी ज्यावेळी सुरतमधील आरटीओ कार्यालयामध्ये गेले होते. त्या संदर्भातील अनेक प्रश्न तसेच जर ही गाडी प्रज्ञासिंग ठाकूर यांची आहे. या संदर्भातील माहिती तुम्ही तुमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली होती का? तसेच जर तुम्हाला ही माहिती मिळाली होती. तर यासंदर्भातील सर्व माहिती वरिष्ठ अधिकाऱ्याला का देण्यात आली नव्हती किंवा देण्यात आली होती का, असा प्रश्न आरोपी प्रज्ञा सिंग ठाकूर यांच्या वतीने गेल्यानंतर तपास अधिकारी संतप्त झाले.
दोघांबाजूच्या वकिलांमध्ये शाब्दिक वाद : कुठल्याही प्रश्नाला उत्तर देता येत नसल्याने प्रज्ञा सिंग ठाकूर यांच्या वकिलाने म्हटले की, हे तुमचे एटीएसचे कार्यालय नाही आहे. त्यानंतर पुन्हा या दोघांमध्ये शाब्दिक वाद सुरू झाले. त्यानंतर कोर्टाने दोन्हीही पक्षकारांना ताकीद देत म्हटले की, जर तुम्ही कोर्टाची शिस्त पाळत नसणार, तर मला हे सर्व आजच्या कामकाजाच्या रेकॉर्डवर घ्यावे लागणार, असे कोर्टाने म्हटल्यानंतर दोन्हीही बाजूंच्या वतीने शांतता पाळण्यात आली. त्यानंतर पुन्हा कोर्टाचे कामकाज सुरू झाले होते.
काय आहे प्रकरण : 29 सप्टेंबर 2008 रोजी मालेगावमध्ये बॉम्बस्फोट झाला होता. शुक्रवारच्या नमाजानंतर मशिदीत मोटारसायकलवर बॉम्बस्फोट झाला होता. यामध्ये 6 जणांचा मृत्यू झाला होता. तर 100 हून अधिक लोक जखमी झाले होते. याप्रकरणी एटीएसने प्राथमिक चौकशी केली होती. तीन वर्षांनंतर 2011 मध्ये हे प्रकरण एनआयएकडे वर्ग करण्यात आले. एनआयएच्या विशेष न्यायालयात आता मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाची सुनावणी सुरू आहे. भोपाळमधील भाजप खासदार प्रज्ञासिंग ठाकूर या या प्रकरणात आरोपी आहेत. या प्रकरणातील अन्य आरोपींमध्ये लेफ्टनंट कर्नल पुरोहित, मेजर (निवृत्त) रमेश उपाध्याय, सुधाकर द्विवेदी, अजय रहीरकर आणि समीर कुलकर्णी यांचा समावेश आहे.