ETV Bharat / city

कोविडकाळातील विधवांना राज्य सरकारचा आधार; वीरभ्रदकाली ताराराणी स्वयंसिद्धा योजना होणार लागू - Rural Development Minister Hasan Mushrif

गावनिहाय माहिती प्राप्त करून एकल अथवा विधवा महिलांना स्वयंसहाय्यता समुहामध्ये प्राधान्याने समाविष्ठ केले जाणार आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नियमावलीनुसार विशेष बाब म्हणून एकल अथवा विधवा महिलांचा किमान पाच महिला सदस्यांचा स्वतंत्र स्वयंसहाय्यता समुह स्थापन करण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचे लाभ उपलब्ध करून दिले जाणार आहेत.

मुंबई मंत्रालय
मुंबई मंत्रालय
author img

By

Published : Nov 2, 2021, 6:52 PM IST

मुंबई - कोरोनाकाळात घरातील कर्ता पुरूष मृत्यूमुखी पडल्याने विधवा झालेल्या महिलांना उत्पन्नाचे साधन उपलब्ध करण्यासाठी राज्य सरकारने पाऊले उचलली आहेत. अशा महिलांसाठी ग्रामविकास विभागाने वीरभ्रदकाली ताराराणी स्वयंसिद्धा योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भातील शासन निर्णय आज जारी करण्यात आला.

ग्रामीण भागातील महिलांना समृद्ध व आत्मसन्मानाने जीवन जगता यावे, यासाठी शाश्वत उपजीविकेच्या संधी प्राप्त होण्याच्या दृष्टीने पोषक वातावरणाची निर्मिती होण्यासाठी या अभियानाच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येत आहे. त्यासाठी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानच्या (उमेद) माध्यमातून प्रयत्न सुरू आहेत. विविध योजनांमध्ये कृतीसंगमाच्या माध्यमातून ही योजना राबविण्यास सरकारने मान्यता दिल्याची माहिती ग्रामविकास विभागाचे मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.

हेही वाचा-राज्यात कायदा असूनही पत्रकारांवर हल्ले; प्रभावी अंमलबजावणी कधी होणार?

आरोग्य विमा योजनेचा लाभ मिळणार-

गावनिहाय माहिती प्राप्त करून एकल अथवा विधवा महिलांना स्वयंसहाय्यता समुहामध्ये प्राधान्याने समाविष्ठ केले जाणार आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नियमावलीनुसार विशेष बाब म्हणून एकल अथवा विधवा महिलांचा किमान पाच महिला सदस्यांचा स्वतंत्र स्वयंसहाय्यता समुह स्थापन करण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचे लाभ उपलब्ध करून दिले जाणार आहेत. या समुहातील सदस्यांना फिरता निधी व समुदाय गुंतवणूक निधीही अदा करण्यास प्राधान्य दिले जाईल. या एकल अथवा विधवा महिलांना पीएमजेजेबीवाय व पीएमएसबीवाय योजनेचे 342 रूपये निधी भरण्यास बिनव्याजी कर्जही उपलब्ध करून दिले जाईल. तसेच या महिलांना आरोग्य विमा योजनेचाही लाभ देण्यासाठी पात्र महिलांना महात्मा फुले जनआरोग्य योजनेत समाविष्ट करण्यात येणार आहे.

हेही वाचा-विशेष : दिवाळीत गोड, तेलकट फराळ जीवावर बेतू शकतो; फराळ नियंत्रणात करा - आरोग्यतज्ञांचा सल्ला

विधवांना देणार प्रशिक्षण

उमेदमार्फत एकल अथवा विधवा महिलांना रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधीही प्राधान्याने उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या महिलांना तसेच त्यांच्या कुटुंबातील 18 ते 35 वयोगटातील तरुण व तरुणींना दीन दयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजनेच्या माध्यमातून प्रशिक्षण देतानाही प्राधान्य दिले जाईल. आरसेटी योजनेअंतर्गत 18 ते 45 या वयोगटातील तरुण-तरुणी 10 ते 45 दिवसांचे कृषी विषयक प्रशिक्षण, प्रक्रिया उद्योग विषयक प्रशिक्षण, उत्पादक विषयक प्रशिक्षण असे विविध व्यवसायांचे मोफत व निवासी प्रशिक्षण दिले जाणार असल्याचे मंत्री मुश्रीफ म्हणाले.

हेही वाचा-आयकर कारवाईमागे षडयंत्र तर नाही ना - रोहित पवार

आपत्ती दूर होईल

केंद्र सरकारच्या उन्नती योजनामध्ये पात्र असलेल्या एकल (विधवा) महिलांना प्रशिक्षण देतांना प्रथम प्राधान्य असणार आहे. त्याचप्रमाणे केंद्रशासन सहाय्यीत योजनेतही अशा एकल अथवा विधवा महिला आणि त्यांच्या कुटुंबियांना अन्न प्रक्रिया उद्योगासाठी ऑनलाईन नोंदणीद्वारे बीज भांडवल देण्यात येणार आहे. कोरोना महामारीत घरातील कर्त्या पुरूषांच्या अकाली निधनाने कुटुंबांवर जी आपत्ती ओढविली, ती या शासन निर्णयाद्वारे काही प्रमाणात तरी दूर होईल, असा विश्वास मंत्री मुश्रीफ यांनी व्यक्त केला.

महाराष्ट्रात कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत पन्नास वर्षाहून कमी वय असलेल्या जवळपास 20 हजार महिला विधवा झाल्या आहेत. या विधवांच्या मदतीसाठी अकोले येथील शिक्षणतज्ज्ञ हेरंब कुलकर्णी यांच्या पुढाकाराने राज्यातील 190 संस्थांनी एकत्र येत या विधवा महिलांना पाच लाख रुपयांची मदत मिळावी, ही मागणी करत राज्यभरातून एकाच दिवशी चौदाशे मेल मुख्यमंत्र्यांना करण्यात आली होती.

21 ते 50 वयोगटातील झालेले महाराष्ट्रातील कोरोना मृत्यू -

वय 21 ते 30 1818
वय 31 ते 405870
वय 41 ते 5012, 215
एकूण मृत्यू 19,903

For All Latest Updates

TAGGED:

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.