मुंबई - पुण्यातील मनसेचे फायरब्रँड नेते वसंत मोरे (तात्या) दोन ( MNS Leader Vasant More ) तारखेच्या मनसेच्या पाडवा मेळाव्यानंतर नाराज आहेत. शिवतीर्थावर झालेल्या पाडवा ( MNS Padva Melava ) मेळाव्यात राज ठाकरे ( Raj Thackeray Statement On Hanuman Chalisa ) यांनी मशिदीसमोर भोंगे लावून हनुमान चालीसा लावण्याची घोषणा केली. मात्र, याला वसंत मोरे यांनी विरोध केला. पुन्हा एकदा मनसेतील नाराजी नाट्य समोर आलं. नाराज मोरे यांनी आज राज ठाकरे यांची शिवतीर्थ ( Vasant More Meet Raj Thackeray At Shivtirtha ) या निवासस्थानी भेट घेतली. या भेटीदरम्यान, 'तुझ्या सर्व प्रश्नांना उद्या उत्तर सभेत उत्तरं मिळतील', असा शब्द राज ठाकरे यांनी दिला असल्याचे त्यांनी सांगितले.
उद्याच्या सभेत सर्व प्रश्नांची उत्तर - या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना वसंत मोरे म्हणाले की, 'साहेबांना मी माझ्या मनातलं सर्व काही सांगितलं आहे. माझी परिस्थिती सांगितली. यावर साहेबांनी फार काही न बोलता वसंत तुला तुझ्या सर्व प्रश्नांची उत्तरे उद्याच्या सभेतून मिळतील' असं सांगितलं आहे. मला आणि साईनाथला उद्याच्या ठाण्यातील सभेत आमंत्रित केलेला आहे. तिथेच राज ठाकरे सर्व प्रश्नांची उत्तर देतील, अशी प्रतिक्रिया वसंत मोरे यांनी दिली.
पक्षातील अडचणींनादेखील उद्याच उत्तर - नाराज वसंत मोरे यांनी पक्षांतर्गत असलेली गटबाजी जाहीरपणे बोलून दाखवली होती. या पक्षांतर्गत होणाऱ्या गटबाजीवरती राज ठाकरे यांच्यासोबत काही चर्चा झाली का? असा प्रश्न मोरे यांना विचारला असता ते म्हणाले की, 'उद्याची सभा ही उत्तर सभा आहे. त्यामुळे या पक्षांतर्गत असलेल्या वादांनादेखील उद्याच उत्तरे मिळतील, असं राज साहेबांनी सांगितल आहे. दरम्यान, उद्याच्या उत्तर सभेत राज ठाकरे आपल्या नाराज कार्यकर्त्यांना नेमकं काय उत्तर देणार, हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.
हेही वाचा - Fighting Two Groups at JNU : दिल्ली पोलिसांनी 'JNU'मधील हिंसाचाराप्रकणी एफआयआर नोंदवला