ETV Bharat / city

Rajya Sabha Election 2022 : 'या' कारणांमुळे राज्यसभेची सहावी जागा महत्त्वाची; वाचा, सविस्तर... - राज्य सभा निवडणुक 2022

राज्यसभेची ( Rajya Sabha Election 2022 ) निवडणूक दहा जूनला होणार आहे. सहा जागांसाठी होणाऱ्या या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या ( BJP ) दोन, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेना ( Shiv Sena NCP and Congress ) यांच्या प्रत्येकी एक जागा निश्चितपणे निवडून येणार आहे. मात्र राज्यसभेच्या सहाव्या जागेवर ( Rajya Sabha sixth seat ) भारतीय जनता पक्ष आणि महाविकास आघाडीकडून शिवसेनेने आपला उमेदवार दिल्यानंतर या निवडणुकीत चुरस वाढली आहे.

Rajya Sabha Election 2022
Rajya Sabha Election 2022
author img

By

Published : Jun 7, 2022, 5:01 PM IST

मुंबई - राज्यसभेच्या सातव्या जागेवर आपला उमेदवार निवडून यावा यासाठी महाविकासआघाडीकडून चौथा तर भारतीय जनता पक्षाकडून तिसरा उमेदवार रिंगणात आहे. या एका जागेसाठी दोन्ही पक्षांकडून आपली सर्व ताकद पणाला लावली जात आहे. या एक जागेवर आपला उमेदवार निवडून यावा यासाठी भाजपा ( BJP ) सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. तर तिकडे शिवसेनेसहित राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाने ( Shiv Sena NCP and Congress ) कंबर कसलेली आहे. दोन्हीकडून ही निवडणूक प्रतिष्ठेची झाली असल्याचे मत राजकीय विश्लेषक सांगत आहेत.

राज्यसभेची ( Rajya Sabha Election 2022 ) निवडणूक दहा जूनला होणार आहे. सहा जागांसाठी होणाऱ्या या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या ( BJP ) दोन, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेना ( Shiv Sena NCP and Congress ) यांच्या प्रत्येकी एक जागा निश्चितपणे निवडून येणार आहे. मात्र राज्यसभेच्या सहाव्या जागेवर ( Rajya Sabha sixth seat ) भारतीय जनता पक्ष आणि महाविकास आघाडीकडून शिवसेनेने आपला उमेदवार दिल्यानंतर या निवडणुकीत चुरस वाढली आहे. सहावा उमेदवार कोणाचा निवडून येणार? याची चर्चा सध्या राज्यभरात असली तरी, आपला उमेदवार निवडून आणण्यासाठी भारतीय जनता पक्ष आणि महाविकास आघाडी यांच्याकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. देशभरात एकूण 57 राज्यसभा जागांसाठी निवडणूक दहा जूनला होणार आहे. मात्र महाराष्ट्रात सहाव्या जागेसाठी होणारी निवडणूक देशभरात चर्चेचा विषय बनली आहे.

भाजपासाठी का आहे एक जागा महत्त्वाची? : राज्यसभेच्या एकूण 57 जागांसाठी दहा तारखेला निवडणूक होणार आहे. त्यापैकी महाराष्ट्रातून राज्यसभेवर सहा उमेदवार जाणार आहे. राज्यसभेवर आपली ताकद अजून मजबूत करण्यासाठी भारतीय जनता पक्षाने राज्यसभा निवडणुकीला अत्यंत महत्त्व दिले आहे. जास्तीत जास्त भारतीय जनता पक्षाचे उमेदवार राज्यसभेवर जातील यासाठीचे प्रयत्न भारतीय जनता पक्षाकडून सुरू आहेत. म्हणूनच महाविकास आघाडीकडून राज्यसभेची तिसरी जागा भारतीय जनता पक्षाने लढवून नये, त्या बदल्यात विधान परिषदेवरील एक अधिकची जागा भाजपाला देण्यात येईल, असा प्रस्ताव भारतीय जनता पक्षाने थेट नाकारला. विधानपरिषदेपेक्षा राज्यसभेची जागा भाजपाला अधिक महत्त्वाची आहे. असेही या प्रस्तावाच्या वेळी खुद्द देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले होते. त्यामुळे देश पातळीवरच्या राजकारणावर आणि राज्यसभेवर आपल्या पक्षाचा दबदबा असण्यासाठी भारतीय जनता पक्ष राज्यसभेच्या निवडणुकीत जास्तीत जास्त आपला उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करत आहे. त्यातूनच धनंजय महाडिक हे भाजपाचे तिसरे उमेदवार निवडून यावेत यासाठी भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्रातले सर्व ज्येष्ठ नेते जंगजंग पछाडत आहे.

भाजपाच्या 'या' नेत्यावर जबाबदारी : उमेदवार निवडून यावा यासाठी आमदार प्रसाद लाड, आमदार गिरीश महाजन यांच्यावर खास जबाबदारी देवेंद्र फडणवीस यांनी टाकलेली आहे. तिसरा उमेदवार निवडून यावा यासाठी लहान पक्ष आणि अपक्ष उमेदवारांच्या गाठीभेटी घेऊन प्रसाद लाड आणि गिरीश महाजन मतदार आपल्या उमेदवाराला मिळावीत यासाठी प्रयत्न करताना दिसत आहेत. तसेच या निवडणुकीत थेट लढत भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना अशी असणार आहे. सरकार स्थापन झाल्यापासूनच शिवसेना आणि भारतीय जनता पक्षामध्ये आलेला कडवटपणा या निवडणुकीत दिसत आहे. या निवडणुकीत भाजपाचा उमेदवार निवडून आणून शिवसेनेला भाजपाच्या ताकतीची पुन्हा एकदा चुणुक दाखवण्याचा प्रयत्न भाजपाकडून केला जाणार आहे. म्हणून या सहाव्या जागेवर भाजपाचा विजय व्हावा यासाठी सर्वच नेते कामाला लागले आहेत.

शिवसेनेसाठी प्रतिष्ठेचा प्रश्न : राज्यसभेच्या सातव्या जागेसाठी अपक्ष म्हणून आपल्याला सर्व पक्षांनी पाठिंबा द्यावा यासाठी संभाजीराजे छत्रपती यांनी अनेक प्रयत्न केले. सहाव्या जागेसाठी महाविकास आघाडीकडून शिवसेना उमेदवार उभा करणार, असे शिवसेनेने जाहीर केल्यानंतर अपक्ष उमेदवार म्हणून शिवसेनेने आपल्याला पाठिंबा द्यावा, यासाठी संभाजीराजे छत्रपती यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. मात्र संभाजीराजे यांनी शिवसेनेचे अधिकृत उमेदवार म्हणून निवडणूक लढवावी, अशी महत्त्वाची अट मुख्यमंत्र्यांनी ठेवली होती. त्यानंतर संभाजीराजे यांनी या निवडणुकीतून माघार घेतली असली तरी, या परिस्थितीचा राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्षाकडून करण्यात आला. त्यातच सहावा उमेदवार भारतीय जनता पक्षाचा निवडून यावा यासाठी भारतीय जनता पक्षाकडून घोडेबाजार सुरू असल्याचा आरोप शिवसेनेकडून करण्यात आला होता. तसेच विधानसभा निवडणुकीत युती असून सत्ता स्थापन करताना शिवसेनेने भारतीय जनता पक्षाला दगा दिला. त्यामुळे राज्यसभेच्या निवडणुकीतून शिवसेनेने केलेल्या दगाफटकाचा वचपा भारतीय जनता पक्ष या निवडणुकीतून काढेल, असा इशारा केंद्रीय मंत्री आणि राज्यसभा निवडणुकीचे उमेदवार पियुष गोयल यांनी शिवसेनेला दिला आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत सहाव्या जागेवर शिवसेनेचे उमेदवार निवडून यावा यासाठी शिवसेनेने देखील कंबर कसली असून महाविकास आघाडीचे प्रमुख तीन पक्ष यासाठी मैदानात उतरले आहेत.

'चौथा उमेदवार मविआचा निवडून येणार' : राज्यसभेच्या सहाव्या जागेवर आपला उमेदवार निवडून आणण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे नेते सर्वत लहान पक्षाचे आणि अपक्ष आमदारांच्या गाठीभेटी घेत आहेत. मात्र राज्यसभेच्या निवडणुकीत लहान पक्ष आणि अपक्ष आमदार हे महाविकास आघाडीच्या उमेदवारालाच मतदान करतील आणि या निवडणुकीत महाविकास आघाडीचा चौथा उमेदवार निवडून येईल, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केला आहे.

'भाजपाचे एका दगडात दोन पक्षी मारण्याचा डाव' : सहाव्या जागेवर आपला उमेदवार निवडून आणण्यासाठी भाजपा आणि शिवसेनेने या निवडणुकीला प्रतिष्ठेची निवडणूक बनवली आहे. युतीत असलेला भाजपा आणि शिवसेनेची युती तुटल्यानंतर एकमेकाबद्दलचा राग गेल्या अडीच वर्षापासून सातत्याने प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून समोर आला आहे. अनेक वेळा दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते भेटताना पाहायला मिळाले. तसेच रोजच दोन्हीकडील नेतेमंडळी एकमेकांवर आरोपांच्या फेर्‍या घडताना दिसत आहेत. केंद्रात असलेल्या सरकारचा गैरवापर भारतीय जनता पक्ष करत आहे. तर राज्यात असलेल्या सत्तेचा गैरवापर शिवसेनेकडून केला जातो, असा आरोप वारंवार दोन्हीकडच्या नेत्यांकडून केला जात आहे. यातच राज्यसभेच्या निवडणुकीत थेट लढत भाजपा उमेदवार आणि शिवसेना उमेदवार अशी असणार आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनवली, असल्याचे मत राजकीय विश्लेषक प्रविण पुरो यांनी व्यक्त केले आहे.

...म्हणून महाडिकांना उमेदवारी : भारतीय जनता पक्षाने अत्यंत चतुरपणे धनंजय महाडिक यांना तिसरी उमेदवारी दिली आहे. धनंजय महाडिक हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून भारतीय जनता पक्षात आलेली आहे. त्यामुळे आपल्या वैयक्तिक संबंधांवर राष्ट्रवादीची काही मते धनंजय महाडिक आपल्याकडे खेचून आणून, आपला विजय करू शकले तर त्याचा मोठा धक्का महाविकास आघाडीला बसेल. महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये सरकारबाबत एक अविश्वास निर्माण होण्याची देखील शक्यता नाकारता येत नाही. याच संधीचा फायदा घेत सरकार उलथवण्याचा प्रयत्न देखील भारतीय जनता पक्ष करू शकतो. त्यामुळेच या निवडणुकीला अत्यंत महत्त्व आले आहे. भारतीय जनता पक्षाचा हा डाव ओळखूनच महाविकास आघाडी सरकारमधील तिन्ही पक्ष सतर्क झाले असून, आपले आमदार आणि सोबत असलेले अपक्ष आणि लहान पक्षाच्या आमदारांना सांभाळून ठेवण्याची तयारी तिन्ही पक्षांकडून केली जात असल्याचे मत प्रवीण पुरो यांनी व्यक्त केले आहे.

हेही वाचा -Rajya Sabha Election : अपक्ष आणि छोट्या पक्षाच्या आमदारांशी संपर्क साधून मतदानाची विनंती करणार - नाना पटोले

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.