ETV Bharat / city

आर्थिक मंदीवरून लक्ष हटवण्यासाठी नागरिकत्व दुरुस्तीचा घाट - प्रकाश आंबेडकर

वंचित बहुजन आघाडी आणि इतर सामाजिक संघटना यांच्यावतीने नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात दादर टी टी येथे धरणे आंदोलन करण्यात येत आहे.

protest caa
नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात वंचितचे दादर येथे धरणे आंदोलन
author img

By

Published : Dec 26, 2019, 12:33 PM IST

Updated : Dec 26, 2019, 2:29 PM IST

मुंबई - वंचित बहुजन आघाडी आणि इतर सामाजिक संघटना यांच्यावतीने नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात दादर टी टी येथे धरणे आंदोलन करण्यात येत आहे. वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर या आंदोलनाला उपस्थित आहेत.

प्रकाश आंबेडकर

आर्थिक मंदीवरून लक्ष हटवण्यासाठी नागरिकत्व दुरुस्तीचा घाट - प्रकाश आंबेडकर

आर्थिक दृष्टीकोनातून हा देश पूर्णपणे खोलात गेला आहे. वर्षाला सरकारला चालवायला लागणारा खर्चही अजून जमलेला नाही. हे सर्व लपवण्यासाठी कलम 370 चा मुद्दा पुढे केला. मात्र, त्यानेही काही झाले नाही. त्यानंतर एनआरसी, सीएए आणि आता पॉप्युलेशन कायद्याचा मुद्दा पुढे केला असल्याचे म्हणत प्रकाश आंबेडकर यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. आज नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात वंचित बहुजन आघाडीसह इतर संघटनांनी मुंबईत धरणे आंदोलन सुरू केले आहे.

प्रतिनिधी अक्षय गायकवाड यांनी आंदोलनाच्या ठिकाणावरून घेतलेला आढावा

देशातील आर्थिक परिस्थितीवरून लक्ष हटवण्यासाठी केंद्र सरकार वेगवेगळे कायदे आणत दिशाभूल करत आहे. आरएसएस पूर्णपणे खोटारडी संघटना असून त्यांची बुनियादच खोटारडी आहे. खोटे बोलणे हे त्यांच्या रक्तातच असल्याची टीका प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान मोदी आणि शाह यांच्यावर केली आहे.

हेही वाचा - जगातील सर्वाधिक प्रदूषित दहा शहरांपैकी सहा भारतातील!

या कायद्यामुळे 40 टक्के हिंदू बाधित होणार असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी याआधीच सांगितले आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी मोठा बंदोबस्त या ठिकाणी लावला आहे. या भागातील दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत.

Intro:मुंबई
वंचित बहुजन आघाडी आणि इतर सामाजिक संघटना यांच्या वतीने सुधारित नागरिकत्व विधयेकावरोधात दादर टी टी इथे धरण आंदोलन करण्यात येत आहे. जे जे या कायद्यामुळे बाधित होणार आहेत त्यांचे प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. या कायद्यामुळे 40% हिंदू बाधीत होणार असे प्रकाश आंबेडकर यांनी याआधीच सांगीतले आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी मोठा बंदोबस्त या ठिकाणी लावला आहे. या भागातील दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत. कार्यकर्ते जमण्यास सुरवात झाली आहे. काही वेळात आंबेडकर याठिकाणी उपस्थित राहतील. याचा सर्व आंदोलनाचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अक्षय गायकवाड यांनीBody:|Conclusion:
Last Updated : Dec 26, 2019, 2:29 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.