मुंबई - काही दिवसांपूर्वीच राज्याचे पर्यावरण व राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांनी चैत्यभूमीवर व्ह्युविंग गॅलरीचे ( Ramabai Ambedkar Viewing Gallery ) उद्घाटन केले. काही दिवसात याला माता रमाई आंबेडकर असे नाव देण्यात आले. मात्र, या नावाचे अधिकृत पोस्टर या परिसरात सरकारकडून अद्याप लावण्यात आलेले नाही. त्याविरोधात आज मुंबईतले वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलन ( Vanchit Bahujan Aghadi Agitation ) केले. चैत्यभूमीवर वंचित बहुजन आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांनी एकत्र येत मंत्री आदित्य ठाकरे यांनी उद्घाटन केलेल्या शिळेवर रमाई व्ह्युविंग डेक असे पोस्टर लावले व माता रमाई जिंदाबाद अशा घोषणा दिल्या.
'हा सरकारचा खोटेपणा'
वंचितचे नेते आनंद जाधव म्हणाले की, "राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांनी चैत्यभूमीवर येऊन व्ह्युविंग डेकचे उद्घाटन केले. उद्घाटन झाल्यानंतर त्यांच्या लक्षात आले ही चैत्यभूमी आहे. ही बाबासाहेबांच्या आठवण आहे. याला माता रमाई आंबेडकर यांचे नाव दिलं पाहिजे. लक्षात आल्यावर त्यांनी या संदर्भातील घोषणा केली. मात्र, रमाईंच्या नावाचे कोणतेही पोस्टर अथवा फलक या परिसरात अद्याप लावण्यात आलेले नाहीत. हा या सरकारचा खोटेपणा आहे आमचं या सरकारला आवाहन आहे त्यांनी लवकरात लवकर शुद्धीत यावं नाहीतर आम्हाला या सरकारी विरोधात तीव्र आंदोलन करावे लागेल."
आंदोलकांना पोलिसांनी घेतले ताब्यात -
चैत्यभूमीवर घोषणाबाजी करणाऱ्या वंचित बहुजन आघाडीच्या आंदोलकांना दादर पोलीस स्थानकाच्या चैत्यभूमी पोलीस चौकीतील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
हेही वाचा - Ramabai Ambedkar Viewing Gallery : चैत्यभूमी व्ह्युविंग गॅलरीला माता रमाबाई आंबेडकर यांचे नाव देण्याचा प्रस्ताव