ETV Bharat / city

सामान्य नागरिकांमधील सोनू सूद; ४० हजार नागरिकांची शमवली भूक   - वैभव थोरात

लॉकडाऊन काळामध्ये रस्ते, फुटपाथ आणि झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या गरीब लोकांचे दोन वेळच्या जेवणासाठी प्रचंड हाल झाले. अशा लोकांच्या मदतीसाठी शहरातील सामाजिक संस्था, दानशूर व्यक्ती यांनी मदतीचा हात पुढे केला आहे. पण जसजसे लॉकडाऊन शिथिल करण्यात आले, तशी अनेकांनी मदत देखील थांबवली. मदत बंद झाल्याने या लोकांचे पुन्हा हाल सुरू झाले आहेत. अशा नागरिकांच्या मदतीसाठी मुंबईतील ऍड. वैभव थोरात यांनी पुढाकार घेतला आहे.

गरजूंना मोफत अन्नाचे वाटप
गरजूंना मोफत अन्नाचे वाटप
author img

By

Published : Jun 12, 2021, 10:19 PM IST

Updated : Jun 13, 2021, 5:18 PM IST

मुंबई- लॉकडाऊन काळामध्ये रस्ते, फुटपाथ आणि झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या गरीब लोकांचे दोन वेळच्या जेवणासाठी प्रचंड हाल झाले. अशा लोकांच्या मदतीसाठी शहरातील सामाजिक संस्था, दानशूर व्यक्ती यांनी मदतीचा हात पुढे केला आहे. पण जसजसे लॉकडाऊन शिथिल करण्यात आले, तशी अनेकांनी मदत देखील थांबवली. मदत बंद झाल्याने या लोकांचे पुन्हा हाल सुरू झाले आहेत. अशा नागरिकांच्या मदतीसाठी मुंबईतील ऍड. वैभव थोरात यांनी पुढाकार घेतला आहे. गेल्या १३ महिन्यांपासून मुंबईतील गरिबांची भूक शमवण्याचे काम ते करत आहेत. आतापर्यत ४० हजारांपेक्षा जास्त नागरिकांना त्यांनी मदत केली आहे.

गरजूंना मोफत अन्नाचे वाटप

ताजे आणि पौष्टिक जेवण

लॉकडाऊनच्या काळामध्ये बेघर, गरिबांचे अन्नावाचून हाल होत असल्याच्या अनेक बातम्या प्रसिद्ध होत होत्या. त्यातच रस्त्यावरील मुलांना भुकेने व्याकुळ होताना पाहिल्यानंतर या मुलांसाठी काहीतरी करावे, असा विचार वैभव यांच्या मनात येऊ लागला. त्यातूनच रस्त्यावर राहणाऱ्यांना किमान एक वेळचे जेवण देण्याचा निर्णय त्यांनी घेतला. यासाठी वैभव यांनी एक किचन सुरू केले. किचन सुरू करण्यासाठी पालिकेकडून आवश्यक त्या परवानग्या घेण्यात आल्या. या किचनमधून त्यांनी दररोज रात्री 100 लोकांना ताजे आणि पौष्टिक जेवण पुरविण्यास सुरुवात केली. दररोज रात्री 8 च्या सुमारास गाडीमध्ये जेवणाच्या प्लेट भरून, मुंबईच्या रस्त्यावर वैभव निघतात, भायखळापासून कधी दक्षिण मुंबईच्या दिशेने, कधी पूर्व उपनगर तर पश्चिम उपनगराच्या दिशेने त्यांचा हा प्रवास सुरु झाला आहे. रस्त्यामध्ये दिसणाऱ्या प्रत्येक गरीब, फुटपाथवर झोपणाऱ्या व्यक्तीला ते जेवणाचे ताट देतात. यामध्ये लहान मुलांपासून वयोवृद्धांची संख्या अधिक असते. अनेकदा जेवण वाटप करत असताना त्यांच्याकडील जेवण कमी पडायचे, तर भुकेल्यांची संख्या अधिक असायची हे पाहून मन हेलावून जात असल्याचे वैभव यांनी सांगितले.

मित्रांची वैभवाला मदत

अनेकदा काही कामानिमित्त बाहेर जाणे झाले की जेवण वाटप कारायला जाण्यात अडचणी येत, मात्र अशावेळीही रात्री अपरात्री उशिराने जेवण वाटायला जात असे, परंतु त्यावेळी अनेकजण झोपलेले असल्याचे त्यांच्या लक्षात येई, त्यामुळे त्यांना वेळेत जेवण मिळावे यासाठी वैभव यांनी त्यांच्या सहकाऱ्यांची मदत घेण्याचा निर्णय घेतला. या कामात त्यांना चैतन्य बनसोडे, ललित पटेल, समीर चव्हाण, विराज बनसोड, हंसराज ज़ैस्वाल, विजय मिश्रा, प्रतिक बेनके, अजय जगताप, संजय शिंदे यांनी मोठ्या उत्साहाने मदत केली. वैभव कामात असताना त्यांचे हे सहकारी गाडी घेऊन गरीब, झोपडपट्टीतील नागरिकांना जेवण वाटप करण्याचे काम करत असत. वर्षभरात वैभव आणि त्यांच्या सहकार्यांनी 40 हजारपेक्षा अधिक लोकांची भूक भागवली आहे.

लोकांमध्ये बसून केले जेवण

झोपडपट्टी भागामध्ये वारंवार जेवण वाटप करताना काही नागरिकांकडून शंका उपस्थित केली जात असे. जेवणाचा दर्जा कसा असेल किंवा जेवण खराब झाले असेल असे प्रश्न विचारले जात. अशावेळी नागरिकांसोबत बसून त्यांनी स्वतः जेवण केल्याचा अनुभवही त्यांनी सांगितला.

हेही वाचा -भाजपकडून ओबीसींचा घात; नाना पटोले यांचा आरोप

Last Updated : Jun 13, 2021, 5:18 PM IST

For All Latest Updates

TAGGED:

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.