ETV Bharat / city

लसीकरणाला लवकरच सुरुवात, केंद्राने लस मोफत द्यावी- राजेश टोपे

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलासादाक माहिती दिली आहे. केंद्राने निर्देश दिल्यास जानेवारीत लसीकरणाला सुरुवात होऊ शकते. तसेच केंद्राने राज्यांना लस मोफत द्यावी, असे राजेश टोपे म्हणाले.

आरोग्यमंत्री राजेश टोपे
आरोग्यमंत्री राजेश टोपे
author img

By

Published : Dec 17, 2020, 9:20 PM IST

मुंबई - भारतातील दोन औषध कंपन्यांची कोविड प्रतिबंधक लस अंतिम टप्प्यात असून केंद्राने निर्देश दिल्यास जानेवारीत लसीकरणाला सुरुवात होऊ शकते. तसेच केंद्राने राज्यांना लस मोफत द्यावी, अशी अपेक्षा असल्याचे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटले आहे. मंत्रालयात ते पत्रकारांशी बोलत होते. देशातील सिरम आणि भारत बायोटेक या कंपन्यांची लस अंतिम टप्प्यात असून या कंपन्यांनी लसी करिता परवानगी मागितली आहे. केंद्राने निर्धारित केलेल्या सूचनांचे पालन करून अतिशय मायक्रो लेव्हल वर लसीकरण केले जाईल, असे टोपे म्हणाले.

आरोग्यमंत्री राजेश टोपे
मतदान केंद्राप्रमाणे प्रक्रिया राबवली जाणार-राज्यातील आरोग्य केंद्रात आतापर्यंत 11 हजार कर्मचाऱ्यांना लसीकरण संदर्भात प्रशिक्षण देण्यात आले आहे. ज्या प्रमाणे मतदान केंद्रावर काटेकोरपणे मतदानाची प्रक्रिया राबवली जाते. त्याच धर्तीवर लसीकरण मोहीम राबवली जाईल. अनेक राज्यांची अपेक्षा आहे की, केंद्राने नागरिकांना लस मोफत द्यावी, आमची ही अपेक्षा आहे. त्यानंतर लसीकरणाची मोठी प्रक्रिया राज्य आपल्या ताकदीवर करेल. पण लस मोफत दिली नाही तरी महाविकास आघाडी सरकार नागरिकांना वाऱ्यावर सोडणार नाही. लसीकरणाची मोहीम युद्ध पातळीवर राबवली जाईल, असे टोपे यांनी स्पष्ट केले. ज्या तारखेला लस द्यायची आहे. त्या व्यक्तीला मेसेज केला जाईल. त्यानंतर मेसेज आलेल्यांना त्याची ओळख पटल्यावर लस देण्यात येईल, अशी माहिती टोपे यांनी दिली.

आरोग्य कर्मचारी, पोलीस आणि अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना पहिल्यांदा लस-

राज्यात अत्यावश्यक सेवेत असलेले कर्मचारी , पोलीस आणि आरोग्य सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांना पहिल्यांदा लस देण्याचा कार्यक्रम आखण्यात आला आहे. सुरुवातीच्या टप्प्यात 1 लाख कर्मचाऱ्यांना केंद्राच्या निर्देशानुसार लस देण्यात येईल. त्यासाठी लसीचा साठा करण्यासाठी योजना आखण्यात आली आहे. त्यासाठी विभागवार शितगृहाची उभारणी करण्यात येत आहे.

नागरिकांची विभागणी करून लसीकरण कार्यक्रम-

सार्वजनिक आरोग्य विभागाकडून 50 वर्ष वयावरील नागरिक, इतर आजार असलेले 50 वर्ष वयावरील नागरिक तसेच वय वर्ष साठ आणि त्या पुढील नागरिक, अशी वर्गवारी करून लसीकरण करण्यात येणार असल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली.

हेही वाचा- महाराष्ट्र कोरोना अपडेट - राज्यात दिवसभरात ३ हजार ८८० कोरोनाचे रुग्ण, ६५ जणांचा मृत्यू

हेही वाचा- छत्तीसगड, पंजाब आणि हरियाणाच्या कृषी कायद्याचा अभ्यास करून भूमिका घेणार - सुनील केदार

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.