मुंबई - मुंबईत 16 जानेवारीपासून कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली. मुंबईत आतापर्यंत आरोग्य कर्मचारी, फ्रंट लाईन वर्कर यांना लस देण्यात येत होती. 1 मार्चपासून 60 वर्षावरील जेष्ठ नागरिक आणि 45 वर्षावरील आजार असलेल्या नागरिकांच्या लसीकरणाला सुरुवात झाली. आज मुंबईत 43 हजार 234 लाभार्थ्यांना लस देण्यात आली. आतापर्यंत एकूण 17 लाख 96 हजार 686 लाभार्थ्यांना लस देण्यात आली.
लसीकरणाची आकडेवारी -
मुंबईत आज 43 हजार 234 लाभार्थ्यांना लस देण्यात आली. त्यातील 35 हजार 921 लाभार्थ्यांना पहिला तर 7 हजार 313 लाभार्थ्यांना दुसरा डोस देण्यात आला. आतापर्यंत एकूण 17 लाख 96 हजार 686 लाभार्थ्यांना लस देण्यात आली. त्यात 15 लाख 86 हजार 384 लाभार्थ्यांना पहिला तर 2 लाख 10 हजार 310 लाभार्थ्यांना दुसरा डोस देण्यात आला. आतापर्यंत एकूण 2 लाख 61 हजार 091 आरोग्य कर्मचारी, 2 लाख 86 हजार 440 फ्रंटलाईन वर्कर, 7 लाख 02 हजार 138 जेष्ठ नागरिक तर 45 ते 59 वर्षामधील गंभीर आजार असलेल्या 5 लाख 47 हजार 017 लाभार्थ्यांना लस देण्यात आली.
असे झाले लसीकरण -
मुंबई महापालिकेच्या लसीकरण केंद्रावर 23 हजार 756 तर आतापर्यंत 11 लाख 68 हजार 625 लाभार्थ्यांना लसीकरण करण्यात आले.
केंद्र आणि राज्य सरकारच्या रुग्णालयातील लसीकरण केंद्रावर आज 4 हजार 347 लाभार्थ्यांना तर एकूण 1 लाख 23 हजार 767 लाभार्थ्यांना लसीकरण करण्यात आले आहे. खासगी रुग्णालयातील लसीकरण केंद्रावर आज 15 हजार 131 लाभार्थ्यांना तर आतापर्यंत एकूण 5 लाख 04 हजार 294 लाभार्थ्यांना लसीकरण करण्यात आले आहे.
आंबेडकरी अनुयायांचेही लसिकरण -
आज डॉ. आंबेडकर जयंती निमित्त दादर चैत्यभूमी येथे आलेल्या आंबेडकरी अनुयायांचेही लसीकरण करण्यात आले. दादर जी नॉर्थ कार्यालयाच्या वतीने लसीकरण करण्याची व्यवस्था करण्यात आली होती.
एकूण लसीकरण
आरोग्य कर्मचारी - 2,61,091
फ्रंटलाईन वर्कर - 2,86,440
जेष्ठ नागरिक - 7,02,138
45 ते 59 वय - 5,47,017
एकूण - 17,96,686
हेही वाचा- भाजप नेत्यांकडून त्यांच्या आमदारांना गाजर दाखवण्याचे काम - उपमुख्यमंत्री