मुंबई : मुंबईत लसीकरणाला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. यामुळे लसीचा सातत्याने तुटवडा जाणवत आहे. बुधवारी रात्री आलेला साठा कमी पडल्याने पुढील तीन दिवस लसीकरण बंद राहणार आहे. गुरूवारी 28 हजार 782 लाभार्थ्यांना लस देण्यात आली. आतापर्यंत एकूण 24 लाख 28 हजार 626 लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले आहे.
लसीकरणाची आकडेवारी -
मुंबईत गुरूवारी 28 हजार 782 हजार लाभार्थ्यांना लस देण्यात आली. त्यात 11 हजार 571 लाभार्थ्यांना पहिला तर 17 हजार 211 लाभार्थ्यांना दुसरा डोस देण्यात आला. आतापर्यंत एकूण 24 लाख 28 हजार 626 लाभार्थ्यांना लस देण्यात आली त्यात 19 लाख 51 हजार 867 लाभार्थ्यांना पहिला तर 4 लाख 76 हजार 759 लाभार्थ्यांना दुसरा डोस देण्यात आला. आतापर्यंत एकूण 2 लाख 82 हजार 812 आरोग्य कर्मचारी, 3 लाख 25 हजार 665 फ्रंटलाईन वर्कर, 9 लाख 68 हजार 925 ज्येष्ठ नागरिक तर 45 ते 59 वर्षामधील गंभीर आजार असलेल्या 8 लाख 51 हजार 224 लाभार्थ्यांना लस देण्यात आली.
आज दुसरा डोसच दिला जाणार -
मुंबईत रोज 30 ते 50 हजार लाभार्थ्यांचे लसीकरण केले जात आहे. यामुळे लसीचा तुटवडा जाणवू लागला आहे. लसीचा तुटवडा असल्याने उद्यापासून तीन दिवस लसीकरण बंद ठेवले जाणार आहे. तसेच वॉक इन लसीकरण बंद करण्यात आले आहे. जो काही लसीचा साठा बाकी आहे तो फक्त दुसरा डोस असलेल्या लाभार्थ्यांना दिला जाणार आहे.
लसीकरण मोहीम -
मुंबईत कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी 16 जानेवारीपासून कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली. सुरुवातीला आरोग्य कर्मचारी व फ्रंटलाईन वर्करना लस दिली जात होती. 1 मार्चपासून 60 वर्षावरील वयोवृद्ध तसेच 45 ते 59 वर्षामधील विविध गंभीर आजार असलेल्या नागरिकांना लस दिली जात आहे. 1 मे पासून 18 ते 45 वर्षामधील लाभार्थ्यांचे लसीकरण केले जाणार आहे.
एकूण लसीकरण -
- आरोग्य कर्मचारी - 2,82,812
- फ्रंटलाईन वर्कर - 3,25,665
- ज्येष्ठ नागरिक - 9,68,925
- 45 ते 59 वय - 8,51,224
- एकूण - 24,28,626