ETV Bharat / city

मुंबईत मंगळवारी 26 हजार 944 लाभार्थ्यांना लस, १८ वर्षांवरील लाभार्थ्यांचे लसीकरण उद्या सुरू राहणार

author img

By

Published : May 4, 2021, 11:50 PM IST

मुंबईतील कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी लसीकरण मोहीम सुरू आहे. या मोहिमेदरम्यान आज 26 हजार 944 लाभार्थ्यांना लस देण्यात आली. 16 जानेवारीपासून आतापर्यंत एकूण 24 लाख 54 हजार 141 लाभार्थ्यांना लस देण्यात आली.

corona vaccination
corona vaccination

मुंबई - मुंबईतील कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी लसीकरण मोहीम सुरू आहे. या मोहिमेदरम्यान आज 26 हजार 944 लाभार्थ्यांना लस देण्यात आली. 16 जानेवारीपासून आतापर्यंत एकूण 24 लाख 54 हजार 141 लाभार्थ्यांना लस देण्यात आली. लसीचा साठा मंगळवारी रात्री येणार असल्याने उद्या (बुधवार) 18 ते 44 तसेच 45 वर्षावरील लाभार्थ्यांचेही लसीकरण सुरू राहील, असे पालिकेने कळविले आहे.

लसीकरणाची आकडेवारी -

मुंबईत आज मंगळवारी 26 हजार 944 हजार लाभार्थ्यांना लस देण्यात आली. त्यात 5 हजार 357 लाभार्थ्यांना पहिला तर 21 हजार 587 लाभार्थ्यांना दुसरा डोस देण्यात आला. आतापर्यंत एकूण 24 लाख 86 हजार 827 लाभार्थ्यांना लस देण्यात आली त्यात 19 लाख 73 हजार 633 लाभार्थ्यांना पहिला तर 5 लाख 13 हजार 194 लाभार्थ्यांना दुसरा डोस देण्यात आला. आतापर्यंत एकूण 2 लाख 84 हजार 807 आरोग्य कर्मचारी, 3 लाख 29 हजार 141 फ्रंटलाईन वर्कर, 9 लाख 93 हजार 631 जेष्ठ नागरिक, 45 ते 59 वर्षामधील गंभीर आजार व इतर 8 लाख 71 हजार 074 तर 18 ते 44 वर्षामधील 8 हजार 173 लाभार्थ्यांना लस देण्यात आली.

उद्या लसीकरण सुरू राहणार -

मुंबईत लसीकरण मोठ्या प्रमाणात केले जात असल्याने लसीचा तुटवडा निर्माण झाला होता. यामुळे पालिकेला 18 ते 44 वयामधील लाभार्थ्यांना लस देण्यासाठी 18 हजार लसी आल्या आहेत. त्यात पालिकेच्या 5 लसीकरण केंद्रांवर लसीकरण सुरू आहे. लसीचा तुटवडा असल्याने ज्या प्रमाणात लसीचा साठा येत आहे तसे लसीकरण केले जात आहे. आज रात्री लसीचा साठा येणार असल्याने पालिकेच्या लसीकरण केंद्रांवर 45 वर्षावरील नागरिकांना लस दिली जाईल अशी माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

लसीकरण मोहीम -

मुंबईत कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी 16 जानेवारीपासून कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली. सुरुवातीला आरोग्य कर्मचारी व फ्रंट लाईन वर्करना लस दिली जात होती. 1 मार्चपासून 60 वर्षावरील वयोवृद्ध तसेच 45 ते 59 वर्षामधील विविध गंभीर आजार असलेल्या नागरिकांना लस दिली जात आहे. आज 1 मे पासून 18 ते 45 वर्षामधील लाभार्थ्यांचे लसीकरण सुरु झाले आहे.

एकूण लसीकरण -
आरोग्य कर्मचारी - 2,84,807
फ्रंटलाईन वर्कर - 3,29,141
जेष्ठ नागरिक - 9,93,632
45 ते 59 वय - 8,71,074
18 तर 44 वय - 8,173
एकूण - 24,86,827

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.