ETV Bharat / city

महाविद्यालयांत जाण्यासाठीही लसीकरण सक्तीचे, कोरोना नियमांची करावी लागणार अंमलबजावणी - vaccination mandatory to go to college

२० ऑक्टोबरपासून महाविद्यालये सुरू होणार आहेत. त्यासाठी येत्या सोमवारी मार्गदर्शक तत्वे जाहीर केली जाणार आहेत. महाविद्यालयांमध्येही कोरोना नियमांसह लसीकरण केलेले असणे महत्वाचे असणार आहे.

महाविद्यालयांत जाण्यासाठीही लसीकरण सक्तीचे,

author img

By

Published : Oct 15, 2021, 7:02 PM IST

मुंबई : गेले दीड वर्ष सूरु असलेला कोरोनाचा प्रसार आटोक्यात आल्याने निर्बधांमध्ये शिथिलता देण्यात आली आहे. शाळा मंदिरे उघडल्यावर आता २० ऑक्टोबरपासून महाविद्यालये सुरू होणार आहेत. त्यासाठी येत्या सोमवारी मार्गदर्शक तत्वे जाहीर केली जाणार आहेत. महाविद्यालयांमध्येही कोरोना नियमांसह लसीकरण केलेले असणे महत्वाचे असणार आहे अशी माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी "ई टीव्ही भारत"शी बोलताना दिली.

अशी असेल नियमावली -
मुंबईत गेल्या वर्षी मार्च महिन्यात पहिला कोरोना रुग्ण आढळून आला. तेव्हापासून आतापर्यत कोरोनाच्या दोन लाटा येऊन गेल्या. दुसरी लाट आटोक्यात असल्याने शाळा, मंदिरे, सिनेमागृह, नाट्यगृह उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यानंतर आता 20 ऑक्टोबरपासून महाविद्यालये सुरू केली जाणार आहेत. त्यासाठी शाळा सुरू करण्याबाबत असलेल्या नियमावलीप्रमाणेच नियमावली असणार आहे. महाविद्यालयात येणाऱ्या शिक्षक आणि विद्यार्थ्यांना कोरोना लसीचे दोन डोस सक्तीचे असणार आहेत. महाविद्यालयात सोशल डिस्टनसिंगचे पालन करावे लागणार आहे, मास्कचा वापर सक्तीचा असणार आहे. त्याच बरोबर महाविद्यालये वेळोवेळी सॅनिटाइज करावी लागणार आहेत अशी माहिती काकाणी यांनी दिली.

95 टक्के शिक्षक, विद्यार्थ्यांना पहिला डोस -
शिक्षक आणि विद्यार्थी यांना कोरोना प्रतिबंधक लस मिळावी यासाठी विशेष मोहीम राबवली आहे. त्यामाध्यमातून दोन दिवस लसीकरण करण्यात आले. सुमारे 95 टक्के शिक्षक आणि विदयार्थी यांना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. ज्यांचे लसीकरण झाले नाही त्यांचे लसीकरण करण्यासाठी केंद्र वाढवली जातील. येत्या दोन दिवसात लसीकरण केंद्र वाढवली जाणार आहेत. ज्या ठिकाणी बाजूबाजूला 10 ते 20 सोसायट्या असतील अशा ठिकाणीही लसीकरण केंद्र सुरू केले जाणार असल्याचे काकाणी यांनी सांगितले.

20 ऑक्टोबरपासून महाविद्यालये सुरु -
राज्यातील सर्व विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्नित महाविद्यालयातील 20 ऑक्टोबरपासून सुरु करण्यास मान्यता देण्यात आली आहे. ज्यांनी कोविड-१९ च्या लसीचे दोन्ही डोस घेतलेले आहेत, ते विद्यार्थी विद्यापीठ व महाविद्यालयात प्रत्यक्ष उपस्थित राहू शकतील आणि ज्या विद्यार्थ्यांनी कोविड-१९ ची लस घेतलेली नाही, त्यांच्याकरिता विद्यापीठाने संबंधित संस्थांचे प्रमुख, महाविद्यालयांचे प्राचार्य यांचे मदतीने स्थानिक जिल्हा प्रशासनाशी समन्वय साधून लसीकरणासाठी विशेष मोहिम राबवून लसीकरण प्राधान्याने पूर्ण करुन घ्यावे. तसेच विद्यापीठ महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे देखील लसीकरण प्राधान्याने करुन घ्यावे. कोविड-19 च्या आजाराचा स्थानिक पातळीवरील प्रादुर्भाव व स्थानिक परिस्थिती, प्रतिबंधित क्षेत्रांचे नियोजन व आरोग्यविषयक पायाभूत सुविधांची उपलब्धता या बाबी विचारात घेऊन, विद्यापीठे व महाविद्यालये सुरु करण्याबाबत विचारविनिमय करुन योग्य तो निर्णय संबंधित विद्यापीठाने त्यांच्या स्तरावर घ्यावा आणि महाविद्यालयांना सविस्तर मार्गदर्शक सूचना (एसओपी) तयार करण्यात यावी असे निर्देश देण्यात आल्याची माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली.

काय असेल नियमावलीत -
- शिक्षक विद्यार्थी यांनी लसीचे दोन डोस घेतलेले असावेत
- ज्यांनी लसीचे दोन डोस घेतले आहेत त्यांनाच महाविद्यालयात प्रवेश इतर विद्यार्थी ऑनलाईन सहभागी होऊ शकतात.
- एका बेंचवर एक विद्यार्थी
- झिग झ्याग पद्धतीने विद्यार्थी वर्गात बसतील
- वर्ग आणि महाविद्यालयाचा परिसर दिवसातुन तीन वेळा स्वच्छ करावा
- जवळच्या आरोग्य केंद्राला महाविद्यालयाल संलग्न करावे लागणार

हेही वाचा - College reopen : राज्यात २० ऑक्टोबरपासून महाविद्यालये सुरू, उदय सामंत यांची घोषणा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.