ETV Bharat / city

मुंबईतील बेघर, आधारकार्ड नसलेल्यांचेही लसीकरण - महापौर - mumbai breaking news

मुंबईतील कोरोनाग्रस्तांची संख्या घटत आहे. कोरोनाला रोखण्यासाठी सर्वांनी लसीकरण करणे आवश्यक आहे. मात्र, बेघर व आधारकार्ड नसलेल्यांचेही लसीकरण व्हायला हवे. या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने विचार सुरू केला आहे. लवकरच याबाबत निर्णय घेतला जाईल, अशी माहिती मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली.

महापौर किशोरी पेडणेकर
महापौर किशोरी पेडणेकर
author img

By

Published : May 4, 2021, 8:40 PM IST

मुंबई - मुंबईतील कोरोनाग्रस्तांची संख्या घटत आहे. कोरोनाला रोखण्यासाठी सर्वांनी लसीकरण करणे आवश्यक आहे. मात्र, बेघर व आधारकार्ड नसलेल्यांचेही लसीकरण व्हायला हवे. या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने विचार सुरू केला आहे. लवकरच याबाबत निर्णय घेतला जाईल, अशी माहिती मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली.

प्रत्येक वॉर्डला माहिती दिली जाणार

कोरोनाच्या पाश्वभूमीवर मुंबई महापालिकेकडून केल्या जात असलेल्या उपाययोजनांची महापौर किशोरी पेडणेकर यांनी माहिती दिली. यावेळी लसीकरण मोहिमेला वेग दिला जाणार असून सर्वांचे लसीकरण होईल याकडे लक्ष दिला जाणार आहे. फेरीवाल्यांची नोंदणी झाली आहे. फेरीवाल्यांचे झोन तयार करताना ती नोंदणी केलेली आहे. त्यामुळे जी मदतीची घोषणा केली आहे, ती पूर्ण केली जाणार असल्याचे महापौरांनी सांगितले. 45 वर्षांपुढील व्यक्ती आणि पहिल्या फळीतील कोविड योद्धे थेट लसीकरण केंद्रात जाऊन लसीचा दुसरा डोस घेऊ शकतात. अशी 59 केंद्र आहेत. याची प्रत्येक वॉर्डला माहिती दिली जाणार आहे. प्रत्येक वॉर्डच्या बाहेर या लसीकरण केंद्रांची माहिती उपलब्ध करून दिली जाणार आहे, असेही त्या म्हणाल्या. सर्वांचे लसीकरण करणे आवश्यक आहे. मात्र, बेघर व आधारकार्ड नसलेल्यांचे लसीकरण कले करणार हा प्रश्न आहे. मात्र, त्यांचेही लसीकरण करण्याच्यादृष्टीने महापालिकेने विचार केला आहे. त्यांची नोंदणी केली जाणार आहे. स्थलांतरित मजुरांची माहिती आहे, त्यातून कार्यवाही केली जाईल. ते लसीकरणापासून वंचित राहिले, तर कोरोना पुन्हा वाढत राहील, अशी चिंताही त्यांनी व्यक्त केली.

पालकांना कोरोना असलेल्या पाल्यांसाठी पाळणाघर

आई, वडील दोघेही कोरोना बाधित असणाऱ्या मुलांसाठी पाळणाघर तयार करण्याचा प्रयत्न महापालिकेचा आहे. लहान मुलांसाठी वॉर्ड उपलब्ध केला जाईल. त्यासाठी जागेचा शोध प्रशासनाकडून सुरू आहे. दिव्यागांसाठीही घरात ठेवणे घातक ठरू शकते. त्यामुळे या सगळ्यांचा विचार केला जात आहे. लवकरच याबाबत निर्णय घेऊन अंमलबजावणी केली जाणार असल्याचे महापौरांनी सांगितले.

कोविन अ‍ॅप राज्यासाठी स्वतंत्र असायला हवे

लसीकरणासाठी केंद्र सरकारने कोविन अ‍ॅप तयार केले आहे. मात्र, नोंदणी करताना अनेकवेळा गोंधळ होतो. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रत्येक राज्यासाठी स्वतंत्र अ‍ॅप तयार करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मागणी केली आहे. तशी परवानगी मिळाल्यास राज्य सरकारला स्वतंत्र अ‍ॅप तयार करता येईल, असेही महापौर म्हणाल्या.

हेही वाचा - मुंबईतील शालेय बस मालक-चालक कोरोनामुळे आर्थिक संकटात

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.