मुंबई - मुंबईत एकीकडे कोरोनाचा प्रसार होत असताना लसीकरण मोहीम राबवली जात आहे. लसीकरण मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळत असल्याने लसीचा तुटवडा भासत आहे. यामुळे आज रविवारी पालिका, राज्य व केंद्र सरकारच्या 30 तर खासगी 7 अशा एकूण 37 लसीकरण केंद्रांवर लसीचा साठा असेपर्यंत लसीकरण केले जाणार आहे. त्यानंतर मुंबईतील लसीकरण ठप्प होणार आहे.
लसीचा तुटवडा -
मुंबईत 16 जानेवारीपासून लसीकरण मोहीम सुरू आहे. आतापर्यंत 22 लाख 13 हजार 864 लाभार्थ्यांना लस देण्यात आली आहे. मुंबईत रोज 30 ते 50 हजार लाभार्थ्यांना लस दिली जात आहे. मुंबईमधील लसीकरण सुरळीत चालण्यासाठी कमीतकमी 5 लाख लसीचा साठा असणे आवश्यक आहे. मात्र 10 ते 50 हजार लसीचा साठा उपलब्ध होत असल्याने लसीचा तुटवडा होत आहे. यामुळे पूर्ण क्षमतेने लसीकरण होत नाही, लसीचा साठा लसीकरण केंद्रांवर रोज पाठवावी लागत असल्याने लसीकरणाला उशीर होत आहे. यामुळे कर्मचारी आणि लाभार्थी त्रस्त झाले आहेत. अशा परिस्थितीतही लसीकरण मोठ्या प्रमाणात होत आहे.
37 केंद्रांवर लसीकरण -
मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात कोविड-19 लसीकरण मोहिमेतंर्गत महानगरपालिका, शासन यांच्या तर्फे 59 कोविड-19 लसीकरण केंद्रे तसेच खाजगी रुग्णालयात 73 कोविड -19 लसीकरण केंद्रे कार्यान्वित करण्यात आलेली आहे. लसीचा साठा मर्यादित स्वरुपात असल्याकारणामूळे महानगरापालिका, शासकीय आणि खाजगी 37 लसीकरण केंद्रात आज पहिल्या सत्रात किंवा लसीकरण केंद्रात लससाठा उपलब्ध असेपर्यंत लसीकरण करण्यात येईल. सदर लसीकरण केंद्रांवरती दुस-या डोसचे लाभार्थी व प्रथम येणा-या लाभार्थीस प्राधान्य देण्यात येईल असे पालिकेने कळविले आहे.
लसीकरण केंद्र -
महापालिका, सरकारी लसीकरण केंद्राची यादी -
1 जे.जे. रूग्णालय, भायखळा
2 डॉ. बाबसाहेब आंबेडकर रेल्वे रूग्णालय, भायखळा
3 कस्तुरबा रूग्णालय, चिंचपोकळी
4 केईएम रूग्णालय, परळ
5 टाटा मेमोरियल रुग्णालय, परळ
6 मुंबई पोर्ट ट्रस्ट, वडाळा
7 अकवर्थ रुग्णालय, वडाळा
8 वरळी कोळीवाडा आरोग्य केंद्र, वरळी
9 ई एस आय एस रुग्णालय, वरळी
10 व्ही.एन.देसाई रूग्णालय, सांताक्रूझ
11 बांद्रा भाभा रूग्णालय, बांद्रा
12 शिरोडकर प्रसुतीगृह, विलेपार्ले
13 हिंदूरुदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रौमा रुग्णालय, जोगेश्वरी
14 कुपर रूग्णालय, जुहू
15 टोपीवाला दवाखाना, गोरेगाव
16 गोकूळधाम प्रसृतीगृह, गोरेगाव
17 मिनाताई ठाकरे रक्तपेढी कोविड लसीकरण केंद्र, गोरेगाव
18 स. का. पाटील रूग्णालय, मालाड
19 मालवणी सरकारी रूग्णालय, मालाड
20 चौकसी प्रसुतीगृह, मालाड
21 आप्पापाडा प्रस्तुतीगृह, मालाड
22 भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर रूग्णालय, कांदिवली
23 चारकोप विभाग १ दवाखाना,कांदिवली
24 आकुर्ली प्रस्तुतीगृह, कांदिवली
25 इ एस आय एस रूग्णालय, कांदिवली
26 क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले रूग्णालय, बोरीवली
27 शताब्दी रूग्णालय, गोवंडी
28 मॉ रूग्णालय, चेंबुर
29 लाल बहादूर शास्त्री प्रसुतीगृह, भांडूप
30 क्रांतीज्योती महात्मा ज्योतिबा फुले जनरल रुग्णालय, विक्रोळी
खासगी लसीकरण केंद्र -
1 मित्तल रुग्णालय, चर्नी रोड
2 क्रिटीकेअर रुग्णालय, अंधेरी
3 तुंगा रुग्णालय, मालाड
4 लाईफ लाईन मल्टीस्पेशलिस्ट रुग्णालय, मालाड
5 शिवम रूग्णालय, कांदिवली
6 कोहीनूर रुग्णालय, कुर्ला
7 ईनलॅक्स् रुग्णालय, चेंबूर