ETV Bharat / city

UTS Mobile App : लोकल प्रवाशांसाठी उद्यापासून मोबाईल तिकिटींग अॅप युटीएस सुरू

मोबाईल तिकिटींग अॅप युटीएस (UTS Mobile app) सामान्य नागरिकांसाठी बुधवारपासून सुरू करण्यात येणार आहे. कोरोना काळात रेल्वे प्रवासावर निर्बंध लागू करण्यात आले होते. त्यानंतर युटीएस अॅपवरून तिकिट बुकिंग बंद करण्यात आले होते. युटीएस अॅप (UTS Mobile app) हे महाराष्ट्र सरकारच्या लसीकरण प्रमाणपत्र पोर्टलशी जोडले गेले आहे.

uts-mobile-app
uts-mobile-app
author img

By

Published : Nov 23, 2021, 6:51 PM IST

Updated : Nov 23, 2021, 6:56 PM IST

मुंबई - लोकलने प्रवास करणाऱ्या मुंबईकरांना रेल्वे प्रशासनाने मोठा दिलासा आहे. मोबाइल तिकिटींग अॅप युटीएस (UTS Mobile app) सामान्य नागरिकांसाठी सुरू करण्यात येणार आहे. कोरोना काळात रेल्वे प्रवासावर निर्बंध लागू करण्यात आले होते. त्यानंतर युटीएस अॅपवरून (UTS Mobile app) तिकिट बुकिंग बंद करण्यात आले होते. युटीएस अॅप हे महाराष्ट्र सरकारच्या लसीकरण प्रमाणपत्र पोर्टलशी जोडले गेले आहे.

अखेर युटीएस अॅप (UTS Mobile app) हे महाराष्ट्र सरकारच्या युनिर्व्हसल पास पोर्टलशी (Universal pass of Maharashtra govt) जोडण्यात आले आहे. त्यामुळे युटीएस अॅपमधून तिकिट घेताना संबंधित प्रवाशाचे लसीकरण झाले असल्याची खातरजमा होणार आहे. अशी माहिती मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक अनिल कुमार लाहोटी यांनी दिली आहे.

लसीकरण पूर्ण होऊन 15 दिवस झालेल्यांना लोकलचं तिकीट मिळणार आहे. राज्य सरकारने लोकलची तिकीट्स विक्री बंद करून सर्वांना फक्त मासिक पास देण्याचे आदेश मध्य आणि पश्चिम रेल्वेला दिले होते. मात्र, त्यामुळे काही दिवस प्रचंड गोंधळ आणि संतापाचे वातावरण होते.

युटीएस अॅप (UTS Mobile app) ही अँड्रॉईड व आयओएस प्रणालीवर आज रात्रीपासून उपलब्ध होणार आहे. या अॅपच्या माध्यमातून लोकल रेल्वेचे पास उद्या (बुधवार) सकाळपासून काढता येणार आहेत, अशी माहितीही अनिल कुमार लाहोटी यांनी दिली आहे.

Last Updated : Nov 23, 2021, 6:56 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.