ETV Bharat / city

उषा मंगेशकरांनी लता दीदींना केली ‘लिटिल चॅम्प्स’चा एपिसोड पाहण्याची विनंती! - Zee Marathi

उषा मंगेशकर यांच्यासोबतच माईंड रीडर केदार परुळेकर देखील या मंचावर उपस्थित असतील. उषा मंगेशकर यांच्या उपस्थितीत लिटिल चॅम्प्सने एका पेक्षा एक धमाकेदार परफॉर्मन्स सादर केले. या आठवड्यात कोणाला गोल्डन तिकीट मिळणार वा कोण हा मंच सोडून जाणार जाणून घ्यायचं असेल तर ‘सारेगमप लिट्ल चॅम्प्स’ बघण्याशिवाय पर्याय नाही जो प्रसारित होतो गुरुवार ते शनिवार रात्री ९.३० वाजता झी मराठीवर.

लता दीदी
लता दीदी
author img

By

Published : Nov 11, 2021, 9:25 AM IST

मुंबई - ‘सारेगमप लिटील चॅम्प’ हा छोट्यांसाठीचा म्युझिक रियालिटी शो मराठी असल्यामुळे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील प्रतिभा प्रेक्षकांसमोर येते. झी मराठीचा ‘सा रे ग म प’ हा अनेकांच्या स्वप्नपूर्तीचा मंच आहे असं म्हटलं तर खोटं ठरणार नाही. या मंचाने आजवर अनेक उत्तमोत्तम गायक, गायिका, संगीतकार या मनोरंजन क्षेत्राला दिले आहेत. फक्त लोकप्रियताच नाही तर खऱ्या अर्थाने या मंचाने गायक, गायिका घडवले असून त्यांच्या संगीत क्षेत्रातील प्रवास यशस्वी बनवला आहे. तसेच संगीतक्षेत्रातील अनेक दिग्गज हा कार्यक्रम पहात असतात.

लिटिल चॅम्प्स
लिटिल चॅम्प्स

हल्लीच ‘सारेगमप लिट्ल चॅम्प्स’च्या नवीन पर्वाला सुरुवाती पासूनच प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला. हा महाराष्ट्रातील तमाम प्रेक्षकांचा आणि संगीत प्रेमींचा अगदी लाडका कार्यक्रम आहे. त्यातील सर्व निरागस स्पर्धकांइतकाच गोड त्यांचा परफॉर्मन्स असतो. फक्त परीक्षक आणि प्रेक्षकच नाही तर मनोरंजन सृष्टीतील अनेक कलाकार देखील या छोट्या गायकांचे फॅन झाले आहेत. ‘सारेगमप लिट्ल चॅम्प्स’ या कार्यक्रमात लोकप्रिय कलाकारांना निमंत्रित केले जाते आणि ते प्रेक्षकांनाही आवडतं. येत्या आठवड्यात या कार्यक्रमात एक सुप्रसिद्ध व्यक्तिमत्व हजेरी लावणार आहे. सुप्रसिद्ध गायिका उषा मंगेशकर या मंचाला भेट देणार आहेत. त्यांनी सर्व लिटिल चॅम्प्सच कौतुकच केलं नाही तर लता दीदींना हा एपिसोड पाहण्याची विनंती देखील केली.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.