ETV Bharat / city

कृत्रिम तलावाचा वापर करा; परळ गाव गणेश मंडळाचे भक्तांना आवाहन - परळ गाव मंडळ

परळच्या केईएम रुग्णालयाच्या मागील बाजूस परळ गाव आहे. येथील सीकेपी समाजातील लोकांनी एकत्र येऊन 38 वर्षांपूर्वी शाळेत असताना गणपतीची मूर्ती तयार केली होती. तेव्हापासून आजपर्यंत हे लोक दरवर्षी गणेश उत्सव साजरा करतात.

परळ गाव मंडळाचा गणपती
author img

By

Published : Sep 12, 2019, 8:57 PM IST

मुंबई - गणेश विसर्जन करताना मोठ्या प्रमाणात मूर्ती समुद्रात, नदीत विसर्जन केले जाते. यामुळे पर्यावरणाची हानी होते. यावर उपाय म्हणून आमदार अजय चौधरी अध्यक्ष असलेल्या परळ गाव गणेशोत्सव मंडळाच्या मूर्तींचे कृत्रिम तलावात विसर्जन करण्यात आले. पर्यावरणाचा ऱ्हास होऊ नये म्हणून आम्ही कृत्रिम तलावात विसर्जन केले असून गणेश भक्तांनीही कृत्रिम तलावाचा वापर करावा, असे आवाहन कार्यकर्त्यांनी केले आहे.

परळ गाव मंडळाचा उपक्रम

परळच्या केईएम रुग्णालयाच्या मागील बाजूस परळ गाव आहे. येथील सीकेपी समाजातील लोकांनी एकत्र येऊन 38 वर्षांपूर्वी शाळेत असताना गणपतीची मूर्ती तयार केली होती. तेव्हापासून आजपर्यंत आम्ही स्व:त हाताने गणेश मूर्ती तयार करतो. आमच्या विभागाचे आमदार अजय चौधरी हे आमच्या परळ गाव गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष आहेत. आम्ही सर्व सीकेपी समाजाचे असलो आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ असले तरी 38 वर्षांपासून एकाच आकाराची छोटी मूर्ती आम्ही तयार करत असतो, अशी प्रतिक्रिया कार्यकर्त्यांनी यावेळी दिली आहे.

हेही वाचा - नंदुरबारमध्ये विसर्जन मिरवणूक उत्साहात; ढोल-ताशांच्या गजरात खासदार हिना गावितांनीही केले नृत्य

आमचा गणेशोत्सव आता परळ गावचा उत्सव झाला आहे. नवसाला पावणार गणपती म्हणून याची ख्याती असून अनेकांचे नवस पूर्ण झाल्याने अनेक दागिने येथे दान केले जातात. समुद्रात मोठ्या प्रमाणात गाळ असतो. समुद्रात विसर्जित करण्यात आलेल्या मूर्ती पुन्हा किनाऱ्यावर आलेल्या दिसतात. हे मनाला पटत नाही, तसेच पर्यावरणाचा ऱ्हास होता कामा नये, म्हणून आमदार अजय चौधरी यांनीही कृत्रिम तलावामध्येच विसर्जन करा, असे सांगितले. त्याप्रमाणे आम्ही कृत्रिम तलावात विसर्जन केले आहे. इतर गणेश भक्तांनीही कृत्रिम तलावात विसर्जन करावे, असे आवाहन परळ गाव गणेशोत्सव मंडळाकडून यावेळी करण्यात आले.

हेही वाचा - खैराताबादमध्ये तब्बल '६१ फुटी' गणेश मूर्तीचे विसर्जन; पाहा व्हिडिओ

Intro:मुंबई - गणेश विसर्जन करताना मोठ्या प्रमाणात समुद्रात, नदीत विसर्जन केले जाते. यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत असल्याने आमदार अजय चौधरी अध्यक्ष असलेल्या परळ गाव गणेशोत्सव मंडळाच्या मूर्तींचे कृत्रिम तलावात विसर्जन करण्यात आल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले. पर्यावरणाचा ऱ्हास होऊ नये म्हणून आम्ही कृत्रिम तलावात विसर्जन केले असून गणेश भक्तांनीही कृत्रिम तलावाचा वापर करावा असे आवाहन कार्यकर्त्यांनी केले आहे.Body:परळच्या केईएम रुग्णालयाच्या मागील बाजूस परळ गाव आहे. येथील सीकेपी समाजातील लोकांनी एकत्र येऊन 38 वर्षांपूर्वी शाळेत असताना गणपतीची मूर्ती बनवली होती. तेव्हापासून आजपर्यंत आम्ही स्वता हाताने गणेश मूर्ती बनवतो. आमच्या विभागाचे आमदार अजय चौधरी हे आमच्या परळ गाव गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष आहेत. आम्ही सर्व सीकेपी समाजाचे असलो आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ असले तरी 38 वर्षांपासून एकाच आकाराची छोटी मूर्ती आम्ही बनवतो.

आमचा गणेशोत्सव आता परळ गावचा उत्सव झाला आहे. नवसाला पावणार गणपती म्हणून याची ख्याती असून अनेकांचे नवस पूर्ण झाल्याने अनेक दागिने दान केले आहेत. समुद्रात मोठ्या प्रमाणात गाळ असतो. समुद्रात विसर्जित करण्यात आलेल्या मुर्त्या पुन्हा किनाऱ्यावर आलेल्या असतात. हे मनाला पटत नाही. तसेच पर्यावरणाचा ऱ्हास होता कामा नये म्हणून आमदार अजय चौधरी यांनीही कृत्रिम तलावामध्येच विसर्जन करा असे सांगितले. त्याप्रमाणे आम्ही कृत्रिम तलावात विसर्जन केले. इतर गणेश भक्तांनीही कृत्रिम तलावात विसर्जन करावे असे आवाहन परळ गाव गणेशोत्सव मंडळाकडून करण्यात आले आहे.

सोबत 1 2 1 Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.