मुंबई - प्रसार माध्यमांत आणि सोशलमिडीयावर सतत चर्चेत राहणारी उर्फी जावेद रूग्णालयात उपचार घेत आहे ( Urfi Javed is undergoing treatment ) . आपल्या चित्रविचित्र फॅशन सेन्समुळे बऱ्याचदा तिला टीकेलाही सामोरे जावे लागले आहे . असे असले तरिही ती रूग्णालयात असताना सुद्धा चर्चेत आली आहे. उर्फीची प्रकृती ठीक नसल्याचे समजते आहे. त्यामुळे तिला हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागले ( Urfi Javed admitted in hospital )आहे. उर्फीला गेल्या दोन-तीन दिवसांपासून उलट्या होत होत्या. शनिवारी तिला तापही आला होता. त्यामुळे तिला तातडीने मुंबईतील कोकिलाबेन ( Urfi Javed admitted in Kokilaben Hospital ) हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. उर्फीच्या काही वैद्यकीय चाचण्या करण्यात आल्या असून त्याच्या अहवालानंतरच नेमके काय झाले ते स्पष्ट होईल.
प्रकृती बिघडली - उर्फीने हॉस्पिटलमधील तिचा स्वत:चा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. ज्यामध्ये ती हॉस्पिटलच्या बेडवर बसून जेवण करत असल्याचे दिसत आहे. पण ते जेवण तिला आवडले नसल्याचे फोटोतून स्पष्ट होते. त्यामुळे ती चित्रविचीत्र हावभाव करत आहे. ती तिच्या तब्येतीची योग्य काळजी घेत नसल्याने असे घडल्याचे कॅप्शन तिने फोटोला दिले आहे. त्यामुळे डिस्चार्ज मिळाल्यानंतर आरोग्याकडे दुर्लक्ष करणार नसल्याचे तिने म्हटले आहे.
मानसिकता बदलण्याची गरज - उर्फी तिच्या फॅशन सेन्समुळे ट्रोल ( Urfi Javed gets troll for her fashion sense ) होत असते. तरी याआधी फॅशन डिझायनर मसाबा गुप्ता आणि बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग यांनी तिचे खूप कौतूक केले होते. “प्रत्येकाला फॅशनेबल कपडे घालणे, मेकअप करणे आणि सर्वोत्कृष्ट दिसणे आवडते. त्यामुळे मी ही तशीच राहणार. कारण चांगले दिसणे सर्वांना आवडते जर माझा एखादा ड्रेस लोकांना आवडत नसेल तर ती त्यांची समस्या आहे. त्यांना मानसिकता बदलण्याची गरज आहे.” अशी प्रतिक्रीया या आधी तिच्यावर टिका झाल्यावर तिने दिली होती ( Reaction of Urfi Javed to troller ).
हेही वाचा - August Kranti 2022 : 'ऑगस्ट क्रांती' ने ब्रिटीशांना हादरवून सोडले; जगात भारताची वेगळी ओळख बनवली