ETV Bharat / city

युपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ मुंबईत; शेअर बाजारात केले लखनऊ बाँडचे अनावरण - योगी आदित्यनाथ यांचा मुंबई दौरा

उत्तर प्रदेशते मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ मुंबई दौऱ्यावर आहेत. मंगळवारी त्यांनी अभिनेता अक्षय कुमार आणि गायक कैलास खेर यांची भेट घेतली. आज ( बुधवार) ते काही उद्योजकांना भेटणार आहेत.

योगी आदित्यनाथ मुंबईत
योगी आदित्यनाथ मुंबईत
author img

By

Published : Dec 2, 2020, 8:40 AM IST

Updated : Dec 2, 2020, 1:50 PM IST

मुंबई: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ मंगळवारी मुंबई दौऱ्यावर आले आहेत. त्यात त्यांनी आज (बुधवारी ) मुंबई शेअर बाजाराला भेट दिली. यावेळी त्यांनी शेअर बाजारात लखनऊ बाँडचे अनावरण केले. शेअर बाजारात जवळपास २०० कोटींचे बाँड असणार आहेत. यातून लखनऊ महापालिकेत व्यापक सुधारणा करता येतील असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. ही एक उत्तर प्रदेश सरकारला संधी असल्याचेही ते यावेळी म्हणाले.

युपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांच्या हस्ते लखनऊ बाँडचे अनावरण

लखनऊ बाँडची लिस्टींग

लखनऊ बाँडच्या निमित्ताने उत्तर प्रदेश सरकारने कॉर्पोरेट जगतात पाऊल टाकले आहे. त्याचे आज मुंबई शेअर बाजारात लिस्टींग करण्यात आले. सर्व सामान्यांच्या समस्या सुटण्यास या माध्यमातून मदत होतील असेही त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी बोलताना त्यांनी बीएसईच्या सर्व अधिकाऱ्यांना सुभेच्छा दिल्या. २०० कोटींची म्यून्सिपल बॉण्डचे लिस्टींग केले आहे.

इतर महापालिकांचेही लवकरच बाँड

उत्तर प्रदेशातील इतर महापालिकांचे बाँड ही मुंबई शेअर बाजारात लवकरच लिस्टींग करणार असल्याचे यावेळी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी स्पष्ट केले. त्यामध्ये गाझीयाबाद, आग्रा, वाराणसी, प्रयागराज या महापालिकांचा समावेश असल्याचेही त्यांनी सांगितले. हे बॉण्ड लवकरच जारी करणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यासाठी पुन्हा मुंबईत येऊ असेही ते म्हणाले.

उत्तरप्रदेश फिल्मसिटी संदर्भात सेलेब्रिटींशी करणार चर्चा
सप्टेंबर महिन्यात योगी आदित्यनाथ यांनी एका नव्या फिल्म सिटीची घोषणा केली होती. देशाला एका चांगल्या फिल्म सिटीची गरज असून उत्तर प्रदेशमध्ये एका भव्य फिल्म सिटीची निर्मिती करणार असल्याचे त्यांनी सांगितले होते. अनेक सेलिब्रेटींनी योगी आदित्यनाथ यांच्या निर्णयाचं स्वागत केले होते. योगी आदित्यनाथ यांनी यासंबंधी लखनऊतही बैठक घेतली होती. आता ते मुंबईत बॉलिवूड सेलिब्रिटींना भेटून त्यांच्या बरोबर चर्चा करणार आहेत.

अक्षय कुमार आणि कैलास खेर यांची घेतली भेट
उत्तर प्रदेशातील गौतम बुद्ध नगरात यमुना एक्स्प्रेस-वे जवळ चित्रनगरी ( फिल्मसिटी ) उभारण्यात येत आहे. याबाबत योगी यांनी अक्षयकुमारसोबत मंगळवारी चर्चा केली. तशी माहिती खुद्द योगी आदित्यनाथ यांनीच ट्वीटरच्या माध्यमातून दिली आहे. 'भारतीय सिनेविश्वातील लोकप्रिय अभिनेते अक्षयकुमार यांच्यासोबत औपचारिक भेट झाली. सिनेविश्वाच्या विविध पैलूंवर त्यांच्यासोबत विस्तृत चर्चा झाली', असे योगींनी आपल्या ट्वीटमध्ये नमूद केले आहे. शिवाय त्यांनी गायक कैलास खेर यांच्या बरोबरही चर्चा केली.

लखनऊ बॉण्डचे अनावरण, इतर शहरांच्या बॉण्डची घोषणा
लखनऊ महापालिकेने शहराचे सौंदर्यीकरण, विकास आणि स्वच्छता या कामांना गती देण्यासाठी २०० कोटी रुपयांचा बॉण्ड जारी केला आहे. या बॉण्डला गुंतवणूकदारांची जबरदस्त प्रतिसाद दिल्याने हा बॉण्ड ४.५ पट अधिक (४५० कोटी रुपये) सब्स्क्राईब झाला आहे. यामुळे आता उत्तर प्रदेश सरकार गाजियाबाद, वाराणसी, आगरा आणि कानपूर या शहरांसाठी देखील बॉण्ड काढण्याची घोषणा मुंबईत आज (बुधवारी) योगी करू शकतात.

भेट घेऊन, उद्योजकांना गुंतवणूक करण्याचे आवाहन
आपल्या दुसऱ्या मुंबई दौऱ्यात योगी आदित्यनाथ उद्योजक-बँकर्स सोबत चर्चा करून उत्तर प्रदेशात गुंतवणूक करण्याचे आवाहन करणार आहेत. योगी आदित्यनाथ यांची टाटा सन्सचे एन.चंद्रशेखर, हिरानंदानी ग्रुपचे डाॅ.निरंजन हिरानंदानी, भारत फोर्जचे बाबा कल्याणी, सीमोन्सचे सीईओ सुप्रकाश चौधरी, एल. अॅण्ड टी चे चेअरमन एस.एन. सुब्रमण्यम, कॅपिटल सर्विसचे विकास जैन, केकेआरचे चेअरमन संजय नायर, सेंट्रम कॅपिटल लि.चे चेअरमन जसपाल बिंद्रा, टाटा अॅडव्हांस सिस्टिमचे सीईओ आणि एमडी सुकरण सिंग, टाटा डिफेन्स टेक्नाॅलाॅजीचे हर्षवर्धन, अदानी डिफेन्सचे आशिष राजवंश, अशोक लेलँडचे रजत गुप्ता, टेलिकाॅम डिफेन्स सिस्टिमचे सीईओ टी.एस.दरबारी या उद्योजकांना भेटणार आहेत. सोबतच मुकेश अंबानी, आनंद महिंद्रा यांचीही ते भेट घेतील.

भेटी-गाठींनंतर पत्रकारांशी संवाद साधणार
दोन दिवसांच्या दौऱ्यावर असलेले योगी भेटीगाठी व बैठका झाल्यानंतर ते मुंबईत कशासाठी आले, काय चर्चा झाली, या बाबत दुपारी दोन वाजता पत्रकारां बरोबर संवाद साधणार आहेत.

हेही वाचा- 'मुंबईत येऊन उद्योग करण्यापेक्षा योगींनी उत्तर प्रदेशातील कायदा सुव्यवस्था सुधारावी'

हेही वाचा- बॉलिवूडला कोणी मुंबईबाहेर नेऊ शकत नाही - चंद्रकांत पाटील

Last Updated : Dec 2, 2020, 1:50 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.