ETV Bharat / city

Ashwini Vaishnav : बुलेट ट्रेन स्थानकासाठी रेल्वेची धारावीमधील 45 एकर जमीन महाराष्ट्राला दिली- अश्विनी वैष्णव - बुलेट ट्रेन

Ashwini Vaishnav : बुलेट ट्रेनच्या संदर्भात केंद्रीय पातळीवर रेल्वे मंत्रालयाने देखील या सगळ्या कामांचा आढावा घेतला आहे. त्यासाठी  रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी नुकतीच बांद्राकरला कॉम्प्लेक्स अर्थात बीकेसी येथील बुलेट ट्रेनच्या स्थानकासाठीच्या कामाची पाहणी केली आहे.

रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली भेट

author img

By

Published : Aug 1, 2022, 9:02 AM IST

मुंबई - रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स बुलेट ट्रेन स्थानकासाठी भेट रेल्वेची धारावी मधील 45 एकर जमीन महाराष्ट्र शासनाकडे सुपुर्द केली आहे. महाराष्ट्रामध्ये शिंदे फडणवीस सरकार आल्यानंतर बुलेट ट्रेनच्या कामाला तातडीने सर्व मंजुऱ्या देण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मागच्या महिन्यातच दिली होती. त्यानंतर बुलेट ट्रेनच्या संदर्भात केंद्रीय पातळीवर रेल्वे मंत्रालयाने देखील या सगळ्या कामांचा आढावा घेतला आहे. त्यासाठी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी नुकतीच बांद्राकरला कॉम्प्लेक्स अर्थात बीकेसी येथील बुलेट ट्रेनच्या स्थानकासाठीच्या कामाची पाहणी केली आहे. या पाहणी दरम्यान रेल्वे मंत्रालयाने धारावीमधील आपली 45 एकर जमीन महाराष्ट्र शासनाकडे विकासासाठी सुपुर्द केल्याची माहिती भाजपा नेते आशिष शेलार यांनी ईटीव्ही भारतला दिली आहे.

रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली भेट

बुलेट ट्रेनचे नवीन काम सुरु - महाराष्ट्र विकास आघाडी सरकारने सत्तेवर आल्या- आल्या बुलेट ट्रेनच्या सर्व कामांच्या संदर्भात धोरणात्मक स्थगिती दिली होती. बुलेट ट्रेनच्या संदर्भात महाराष्ट्रातील अनेक संघटनांचे आक्षेप आणि विरोध होता. परंतु, महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी सरकार जाऊन शिंदे फडणवीस सरकार सत्ता स्थापन झाल्यावर तातडीने बुलेटच्या संदर्भात सर्व प्रकारच्या मंजुरी या शासनाने दिल्या आहेत. त्यानंतर बुलेट ट्रेनच्या कामाला प्रचंड गती आली आहे. बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स या ठिकाणी बुलेट ट्रेनचे रेल्वे स्थानक जे तयार होत आहे. त्या कामाची पाहणी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी केली आहे. नुकतेच बीकेसी या ठिकाणी भेट दिली आणि या भेटीमध्ये त्यांनी महाराष्ट्र शासनाला विविध विकास कामांच्या संदर्भात रेल्वेच्या अख्त्यारीतली धारावीतील 45 एकर जमीन सुद्धा महाराष्ट्र शासनाला रेल्वे मंत्रालयाने आज तात्काळ सुपुर्द केली आहे. अश्विनी वैष्णव यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले की, ''हे बुलेट ट्रेनचे नवीन काम आहे. यासाठी अत्यंत आधुनिक प्रकारचे तंत्रज्ञान आपण वापरत आहोत. या कामांमधून आपल्यालाही शिकायला मिळत आहे. हे काम वेगाने कसे होईल.

बुलेट ट्रेनसाठीचे ७२ पिलर उभे - या संदर्भातला आमचा उद्देश आहे, असे त्यांनी म्हटले आहे. पुढे त्यांनी अशीही माहिती दिली की, अहमदाबाद ते बीकेसीपर्यंत एकूण 8 नद्या लागतात. या नद्यांवर पूल बांधण्याचे बांधकाम झालेले आहे. त्याचबरोबर बुलेट ट्रेनसाठीचे ७२ पिलर देखील उभे केले गेलेले आहेत. यात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला गेला आहे. बुलेट ट्रेनच्या बाबत काम करण्याची पद्धत वापरली. त्यासाठी वापरलं गेलेलं तंत्रज्ञान हे जर आपण पाहिलं, तर अत्यंत महाकाय यंत्र आणि या यंत्राद्वारे अत्यंत व्यवस्थित रितीने सर्व रेल्वे स्थानकाची बांधणी करण्याचं काम वेगाने सुरू आहे. या कामाच्या संदर्भातलं वैशिष्ट्य देखील अधोरेखित केले की, पहिल्यांदा या महाकाय आणि अत्याधुनिक यंत्रसामुग्री आपण आयात केली. पण यानंतर आपण या महाकायंत्रसामुग्री स्वतः भारतात त्याचे उत्पादन करत आहोत. एका प्रकल्पाच्या कामातून संबंधित अभियंते आणि इतर सर्व मंडळींना एक प्रकारे शिकायला मिळतं आहे. या एका प्रकल्पाच्या अनुभवानंतर दुसऱ्या ठिकाणी आपल्याला तो प्रकल्प कार्यान्वित करत असताना, या ज्ञानाचा उपयोग होतो. याच रितीने बुलेट ट्रेनच्या कामाच्या संदर्भात देखील आपल्याला म्हणता येईल'' असं त्यांनी प्रसारमाध्यमासोबत बोलताना नमूद केले आहे.

बुलेट ट्रेन लोकांना प्रवासासाठी उपलब्ध होणार - ज्या रितीने बुलेट ट्रेन च्या संदर्भात सर्व परवाणग्या महाराष्ट्र शासनाने दिले आहेत. त्यानंतर केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी देखील बुलेट ट्रेनच्या कामाच्या संदर्भात पाहणी केली आहे. हे पाहणं अत्यंत उत्सुकतेच आहे की खरोखर येत्या 2-3 वर्षात बुलेट ट्रेन खरोखर लोकांना प्रवासासाठी उपलब्ध होईल तो येणारा काळच ठरवणार आहे.

हेही वाचा - Case Against Sanjay Raut : संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ.. स्वप्ना पाटकर प्रकरणात वाकोला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

हेही वाचा - ED Arrested Sanjay Raut : संजय राऊत यांना 16 तासाच्या मॅराथॉन चौकशीनंतर ईडीकडून मध्यरात्री अटक

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.