ETV Bharat / city

Union Budget 2022 : केंद्राकडून बुलेट ट्रेनचा लाड, अर्थसंकल्पात मुंबई-अहमदाबादसाठी 5 हजार कोटींची तरतूद - दिल्ली-वाराणसी हाय स्पीड बुलेट ट्रेन

केंद्रीय अर्थसंकल्पात ( Union Budget 2022 ) मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनसाठी ( Mumbai Ahmedabad Bullet Train ) भरीव तरतूद करण्यात आली आहे. यंदा तब्बल 5 हजार कोटी रुपये अर्थसंकल्पात मंजूर करण्यात आले आहे. तर मुंबई-नागपूर बुलेट ( Mumbai Nagpur Bullet Train ) ट्रेनला झुकते माप अर्थसंकल्पात मिळाल्याचे दिसत आहे.

Mumbai Ahmedabad Bullet Train
Mumbai Ahmedabad Bullet Train
author img

By

Published : Feb 3, 2022, 7:13 AM IST

मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Pm Narendra Modi ) यांच्या महत्वाकांक्षी प्रकल्पापैकी एक असलेल्या मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनसह ( Mumbai Ahmedabad Bullet Train ) प्रस्तावित असलेल्या सात बुलेट ट्रेनच्या प्रकल्पांना गती देण्यासाठी केंद्रीय अर्थसंकल्पमध्ये भरीव तरतूद केली आहे. गेल्या वर्षीपेक्षा यंदा बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी 5 हजार 102 कोटींची वाढ देत 19 हजार 102 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्यातील 5 हजार कोटी रुपयांचा निधी मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन साठी मंजूर करण्यात ( Mumbai Nagpur Bullet Train ) आला आहे.

मुंबई नागपूर बुलेट ट्रेनला झुकते माप

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामण ( Fm Nirmala Sitharaman ) यांनी सादर केलेल्या यंदाच्या २०२२-२३ केंद्रीय अर्थसंकल्पात जनतेला काय मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यामुळे प्रस्तावित असलेल्या दिल्ली-वाराणसी हाय स्पीड बुलेट ट्रेन ( Delhi Varanasi Bullet Train ) आणि महाराष्ट्रातील मुंबई - नागपूर हाय स्पीड बुलेट ट्रेन प्रकल्पाला ग्रीन सिग्नल मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. मात्र, प्रत्यक्षात तसे काही झालेलं नाही. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्वाकांक्षी प्रकल्पापैकी एक असलेल्या देशातील पहिला मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाकरिता यंदा 5 हजार कोटींची मंजुरी देण्यात आलेली आहे. तर गेल्या वर्षीचा अर्थसंकल्पामध्ये तब्बल 7 हजार 897 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती.

या बुलेट ट्रेन प्रकल्पाला मिळणार गती

नॅशनल हाय-स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडला (एनएचएसआरसीएल) देशातील बुलेट ट्रेनचा प्रकल्पासाठी यंदाचा अर्थसंकल्पामध्ये 19 हजार 102 कोटी रुपयांची भरीव तरतूद करण्यात आली आहे. विशेष म्हणजे 2021-22 च्या अर्थसंकल्पामध्ये 14 हजार कोटींची तरतूद करण्यात आली होती. यंदाही 5 हजार 102 कोटीने वाढून 19 हजार 102 कोटी रुपयांपर्यत केली आहे.

नागपूर बुलेट ट्रेन प्रकल्प (७३६ किलोमीटर), दिल्ली-वाराणसी हाय-स्पीड रेल्वे प्रकल्प (८१० किलोमीटर ), दिल्ली-अमृतसर हाय-स्पीड रेल्वे (४६९ किलोमीटर), दिल्ली-अहमदाबाद हाय-स्पीड-रेल कॉरिडोर (६८५ किलोमीटर), मुंबई-हैदराबाद हाय-स्पीड रेल्वे कॉरिडोर (६७० किलोमीटर ), चेन्नई-म्हैसूर हाय-स्पीड रेल्वे कॉरिडोर (४३५ किलोमीटर) आणि वाराणसी-हावडा हाय-स्पीड रेल्वे कॉरिडोर (६८०किलोमीटर) या प्रस्तावित असलेल्या देशभरातील सात हायस्पीड बुलेट ट्रेन प्रकल्पाचा कामाला गती मिळणार आहे.

मुंबईकरांना बुलेट ट्रेन नको

एकीकडे यंदाच्या अर्थसंकल्पात मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनकरिता 5 हजार कोटी रुपयांची निधी मंजूर करण्यात आला आहे. तर दुसरीकडे मुंबई उपनगरीय रेल्वे मार्गावर राबविण्यात येणाऱ्या महत्वाच्या एमयूटीपी प्रकल्पासाठी गेल्या वर्षीपेक्षा यंदा कमी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे प्रवासी संघटनेकडुन नाराजी व्यक्त केली जात आहे. सध्या मुंबईकरांना बुलेट ट्रेनची गरज नसून सर्व सामान्य प्रवाशांची लोकल सेवा हवी आहे. अनेक एमयूटीपी 2, एमयूटीपी 3 आणि एमयूटीपी 3 (अ) चे अनेक प्रकल्प गेल्या अनेक वर्षांपासून रखडत जात आहे. हे पूर्ण करण्याऐवजी बुलेट ट्रेनचा लाड केंद्र सरकरकडून केला जात, असल्याची प्रतिक्रिया मुंबईकरांनी दिली आहे.

यंदा एमयूटीपी प्रकल्पांना मिळालेला निधी

एमयूटीपी 2 - 185 कोटी
एमयूटीपी 3 - 190 कोटी
एमयूटीपी 3 (अ) - 200 कोटी
एकूण - 575 कोटी

गेल्यावर्षी मिळालेला निधी

एमयूटीपी 2 - 200 कोटी
एमयूटीपी 3 - 300 कोटी
एमयूटीपी 3 (अ) - 150 कोटी
एकूण - 650 कोटी

हेही वाचा - Rahul Gandhi In Lok Sabha : पाकिस्तान,चीन, पेगासस अन् बेरोजगारीवर राहुल गांधींचे भाष्य, दिला मोठ्या धोक्याचा इशारा, वाचा सविस्तर....

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.