ETV Bharat / city

BJP Posters Torn in Dadar: दादरमध्ये अज्ञातांनी भाजपचे पोस्टर फाडले - tore BJP posters in Dadar

उद्धव ठाकरे ( Shiv Sena chief Uddhav Thackeray ) यांचा दादर शिवाजी पार्कात ( Dadar Shivaji Park ) दसरा मेळावा ( Dussehra Melawa ) झाला. मेळाव्यानंतर दादर भागात लावण्यात आलेले भाजपचे पोस्टर अज्ञातांनी टराटरा ( BJP posters were torn ) फाडल्याचे दिसून आले.

BJP posters were torn
भाजपचे पोस्टर्स फाडले
author img

By

Published : Oct 6, 2022, 6:07 PM IST

मुंबई - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ( Shiv Sena chief Uddhav Thackeray ) यांचा दादर शिवाजी पार्कात ( Dadar Shivaji Park ) दसरा मेळावा ( Dussehra Melawa ) झाला. मेळाव्यानंतर दादर भागात लावण्यात आलेले भाजपचे पोस्टर अज्ञातांनी टराटरा फाडल्याचे ( BJP posters were torn ) दिसून आले. शिवसेनेतील बंडखोरीने संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी हे कृत्य केल्याचे बोलले जाते.

BJP posters were torn
भाजपचे पोस्टर्स फाडले

शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा शिवाजी पार्कात मेळावा झाला. या मेळाव्यांना मोठ्या प्रमाणावर शिवसैनिकांनी गर्दी केली होती. उद्धव ठाकरे यांनी बंडखोरी करणाऱ्या शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला. यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी ठाकरेंच्या टीकेला प्रत्युत्तरही दिले. दरम्यान, शिवाजी पार्कवर झालेल्या दसरा मेळाव्यानंतर दादरमध्ये भाजपचे पोस्टर्स फाडण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबई भाजपचे अध्यक्ष आशीष शेलार यांचे पोस्टर्स फाडण्यात आले आहेत. उद्धव ठाकरे यांच्या समर्थकांनी हे केले असावे, असा अंदाज वर्तवला जातो आहे.

BJP posters were torn
भाजपचे पोस्टर्स फाडले

मेळाव्यानंतर पोस्टर फाडले - शिवसेनेतील बंडखोरीनंतर राज्यात सत्तांतर झाले. त्यानंतर उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे यांनी एकमेकांवर अनेक आरोप प्रत्यारोप केले. या सगळ्या पार्श्वभूमीवर दोन्ही गटांचा दसरा मेळावा पार पडला. उद्धव ठाकरेंचा शिवाजी पार्कवर तर, मुख्यमंत्री शिंदेंचा बीकेसी मैदानात दसरा मेळावा झाला. शिवाजी पार्कवर येताना वाजत, गाजत शिस्तीत या! कायदा सुव्यवस्था बिघडू नये, याची काळजी घेण्याचे आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले होते. मात्र, दसरा मेळाव्यानंतर पोस्टर फाडण्यात आल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.