मुंबई - गँगस्टर फहिम मचमचच्या नावाने घाटकोपरमधील एका व्यावसायिकाकडे 50 लाखांच्या खंडणी मागण्याचे परदेशातून अनेक फोन आले होते. या प्रकरणी व्यावसायीकाने घाटकोपर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपासासाठी हे प्रकरण खंडणी विरोधी पथकाकडे वर्ग करण्यात आले आहे.
कोण आहे फहिम ?
मुंबईतील प्राँपर्टी रिडेव्हलपर असलेल्या फहिमचे नाव सर्वप्रथम २००३ मध्ये प्रसिद्धी झोतात आले होते. फहिम मचमचने एका उद्योजकाकडून जबरदस्ती पैसे वसूल करण्याचा प्रयत्न केला होता. दाऊदसाठी हप्ते वसूली करणारा फहिम हा प्रचंड बडबड्या होता. त्यामुळेच त्याला मचमच हे टोपन नाव पडले. 'डी' कंपनीत दाऊद, छोटा शकिलनंतर राजनचे स्थान होते. माञ राजनने 'डी' कंपनी सोडल्यानंतर फहिमने त्याची जागा घेतली.
फेसबुकच्या मदतीने शोधून काढतो शार्प शूटर
फहिम मचमचवर मुंबईत शेकडो धमकीचे गुन्हे दाखल आहेत. फहिम हा 'डी' कंपनीसाठी शार्प शूटरची भरती करतो. सूञांनी दिलेल्या माहितीनुसार फहिमने काही वर्षांपासून यूपी, रत्नागिरी, मध्यप्रदेश, कुर्ला, गोवंडी, साकीनाका, पंजाब, राजस्थान या राज्यातून २०१८ मध्ये 'डी' कंपनीत तरुणांची भरती केली होती. हे शार्प शूटर त्याने फेसबुकच्या मदतीने शोधून काढले होते. वांद्रेतील एका सामाजिक कार्यकर्ता महिलेच्या हत्येचा कट उधळत पोलिसांनी एका आरोपीला अटक केली होती. त्या चौकशीतून फहिमच्या या कृत्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
हेही वाचा - झारखंडच्या धनबादमध्ये युवकानं आपल्या कुटुंबातील तिघांची हत्या करून केली आत्महत्या