ETV Bharat / city

अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनची 'या' गुन्ह्यातून निर्दोष मुक्तता - mumbai police

या प्रकरणात छोटा राजनच्या विरोधात मुबलक पुरावे सादर करण्यात आले नाही. त्यामुळे सीबीआयकडून या गुन्ह्यात क्लोजर रिपोर्ट सादर करण्यात आला आहे.

अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनची 'या' गुन्ह्यातून निर्दोष मुक्तता

author img

By

Published : Feb 9, 2021, 2:16 PM IST

मुंबई - पत्रकार बलजीत परमार यांना धमकावल्याच्या प्रकरणातून अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनची विशेष सीबीआय कोर्टाकडून निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. 1997 मध्ये क्राईम रिपोर्टर म्हणून काम करणारे पत्रकार बलजीत परमार यांना धमकावल्याप्रकरणी छोटा राजनवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. याचा तपास मुंबई पोलिसांकडून सीबीआयकडे वर्ग करण्यात आला होता. विशेष सीबीआय न्यायालयाचे न्यायाधीश ए टी वानखडे यांनी पुराव्याअभावी छोटा राजनची या गुन्ह्यातून निर्दोष मुक्तता केली आहे.

सीबीआयकडून क्लोजर रिपोर्ट सादर
या प्रकरणाचा तपास करत असताना सीबीआयकडून बलजीत परमार यांचा शोध घेतला जात होता. मात्र, सीबीआयने न्यायालयामध्ये दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे की, त्यांना मिळालेल्या पत्त्यावर बलजीत परमार हे आढळून आलेले नसून ते सध्या कुठे आहेत हे सीबीआयला माहीत नाही. त्यामुळे या प्रकरणात छोटा राजनच्या विरोधात मुबलक पुरावे सादर करण्यात आले नाही. त्यामुळे सीबीआयकडून या गुन्ह्यात क्लोजर रिपोर्ट सादर करण्यात आला आहे.

पत्रकार जे डे हत्येप्रकरणी दाखल आहे गुन्हा
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा एके काळी खास म्हणून ओळखल्या जाणाऱ्या छोटा राजन याने 1993 मध्ये मुंबईत घडलेल्या साखळी बॉम्बस्फोटानंतर त्याच्याशी फारकत घेत दाऊदविरोधातच काम करण्यास सुरुवात केली होती. मुंबईसह देशातील इतर राज्यांमध्ये छोटा राजनवर 70 हून अधिक गंभीर गुन्हे दाखल आहेत. यात खून, खुनाचा प्रयत्न, खंडणीसारखे गुन्हे दाखल केले आहेत. 2015 मध्ये छोटा राजनचे इंडोनेशियातून प्रत्यार्पण करून त्याला भारतात आणण्यात आले होते. सध्या त्याची रवानगी दिल्लीतील तिहार तुरुंगात करण्यात आली आहे. त्याच्यावर 2011 च्या पत्रकार जे डे हत्येप्रकरणीही गुन्हा दाखल आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.