मुंबई - अमरावतीत झालेल्या उमेश कोल्हे हत्याकांडातील मुख्य आरोपी काही दिवसांपासून फरार ( Shaheem Ahmed 10 day NIA custody ) होता. अखेर काल त्याला एनआयएने अटक केली आहे. शहीम अहमद असे मुख्य Shaheem Ahmed 10 day NIA custody आरोपीचे नाव आहे. त्याला आज विशेष न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने शहीमला 10 दिवसांची एनआयए कोठडी सुनावली आहे.
अमरावती उमेश कोल्हे हत्याकांड प्रकरणातील प्रार आरोपीला मुंबई सत्र न्यायालयातील विशेष एनआयए न्यायालयाने एक ऑक्टोंबर पर्यंत एनआयए कोठडी रवानगी केली आहे. या प्रकरणातील फरार आरोपी शहिम अहमद बुधवारी आत्मसमर्पण करण्याकरिता मुंबई सत्र न्यायालयात आला असता न्यायालयीन परिसरातून एनआयए ताब्यात घेतले होते आज न्यायालयासमोर आरोपीला हजर केले असता 14 दिवसाची एनआयए कोठडी मागण्यात आली होती मात्र न्यायालयाने आरोपीला दहा दिवसाची कोठडी ( Umesh Kolhe Murder Case ) रवानगी केली आहे.
एनआयकडून कोठडीची मागणीएनआयएच्यावतीने आज मुंबई सत्र न्यायालयामध्ये असा युक्तिवाद करण्यात आला आहे की आरोपी अहमद याच्याजवळ या प्रकरणात वापरण्यात आलेले हत्यार आणि ज्या वाहनांचा उपयोग करण्यात आला होता ते वाहन जप्त करण्याचे करिता कोठडीची आवश्यकता आहे. त्यामुळे कोठडी देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली होती. तसेच या प्रकरणात आणखी दोन आरोपी संशयित आहे. ज्याचा तपास देखील सदर आरोपीकडून करणे आवश्यक आहे, असा युक्तिवाद एनआयच्या वतीने वकील संदीप सदावर्ते यांनी केला आहे.
ही अटक बेकायदेशीर असल्याचा दावाया प्रकरणात आरोपीच्यावतीने वकील अली काशीफ खान देशमुख यांनी असा युक्तीवाकेला की आरोपी स्वतःहून न्यायालयासमोर स्वतःला आत्मसमर्पण करण्याकरिता आला होता. मात्र एनआयने आरोपीला कोर्ट परिसरामध्ये न्यायालयीन कामकाजाचे डॉक्युमेंट तयार करत असताना अटक केली आहे. ही अटक कलम 279 अंतर्गत बेकायदेशीर असल्याचे देखील युक्तिवाद करण्यात आला आहे. या संदर्भातील अर्ज न्यायालयासमोर सादर करण्यात आला आहे. या अर्जावर एनआयएला उत्तर सादर करण्याचे निर्देश देखील न्यायालयाने दिले असल्याचे वकील आली काशीद यांनी सांगितले आहे.
तपासाला 180 दिवस पूर्ण उमेश कोल्हे हत्याकांडामध्ये एनआयएला उद्या तपासाला 180 दिवस पूर्ण होत असल्याने त्यांना आरोप पत्र दाखल करण्या आवश्यक होते. मात्र एनआयएने सोमवारी सत्र न्यायालयात अर्ज करून या प्रकरणात आणखी 180 दिवस मुदतवाढ देण्यात यावी अशी मागणी अर्जाद्वारे केली आहे. एनआयए असा युक्तिवाद केला की या प्रकरणांमध्ये आरोपींकडून कुठल्याही प्रकारचे तपासात सहकार्य मिळत नाही. तसेच आरोपींची लिंक ही आंतरराष्ट्रीय टेररिझम सोबत असल्याचे देखील पुरावे मिळाले आहे असा दावा एनआयए केला आहे. त्यामुळे या प्रकरणात आणखी तपास करणे बाकी असल्याने मुदतवाढ देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.
आरोपीमध्ये यांचा समावेश एनआयएकडून आतापर्यंत अटक करण्यात आलेल्या आरोपी मध्ये इरफान खान (32), मुदस्सर अहमद उर्फ सोनू रजा शेख इब्राहिम (22), शाहरुख पठाण उर्फ बादशाशा हिदायत खान (25), अब्दुल तौफिक उर्फ नानू शेख तस्लीम (24), शोएब खान उर्फ भुर्या साबीर खान (22), अतीब रशीद आदिल रशीद (22), युसूफ खान बहादूर खान (44) यांचा समावेश आहे.