ETV Bharat / city

मी पंढरपूरला जाणार नाही, उद्धव ठाकरे यांचे पत्रकार परिषदेत सुतोवाच - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे

मी पंढरपूरला जाणार नाही. हे कोणी पसरवले आहे हे मला माहीत नाही, मी माझा कार्यक्रम स्वतः जाहीर करेन, असे बोलत उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या पंढरपूरला जाण्याच्या चर्चेला पूर्णविराम दिला आहे.

शेतकऱ्यांसाठी शिवसेना उतरणार रस्त्यावर, बुधवारी पिकविमा कंपन्यांविरोधात मोर्चा
author img

By

Published : Jul 11, 2019, 5:34 PM IST

Updated : Jul 11, 2019, 6:27 PM IST

मुंबई - शिवसेना भवन या ठिकाणी झालेल्या पत्रकार परिषदेत शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या पंढरपूरला जाण्याच्या चर्चेला पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला आहे. 'शेतकरी कर्जमाफी' आणि 'दुसरा प्रधान मंत्री फसल विमा' यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली.

दरवर्षीप्रमाणे यंदाही आषाढी एकादशीला पंढरपुरात मुख्यमंत्री सपत्नीक विठ्ठलाची महापूजा करणार हे ठरले असताना, 'शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे देखील विठ्ठल-रुक्मिणी यांच्या महापूजेसाठी जाणार असल्याचे' संजय राऊत म्हणाले होते. दिल्लीत संजय राऊत यांनी या बातमीचे सूतोवाच केले होते.

राऊत यांच्या या प्रतिक्रियेनंतर राज्यभरातून यावर संमिश्र प्रतिक्रिया आल्या होत्या. अशोक चव्हाण यांनी यावर टीका करताना, "मुख्यमंत्र्यांसह शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे यावेळी ही शासकीय पूजा करणार असून, हा नवा पायंडा पाडला जात आहे. तो अयोग्य आहे" अशी टीका केली होती. परंतु, आता उद्धव ठाकरे यांनीच आपण जाणार नसल्याचे सांगत या चर्चेला पूर्णविराम दिला आहे. उद्धव ठाकरे यांच्या या प्रतिक्रियेने संजय राऊत हे मात्र चांगलेच तोंडघशी पडले आहेत.

Intro:Body:

उध्दव ठाकरे #

मी पंढरपूरला जाणार नाही हे कोणी पसरवले हे माहीत नाही, जाताना मी माझा कार्यक्रम जाहीर करेन

पी साईनाथ यांनी काही सूचना यांनी नुकत्याच दिल्या आहेत. 

योजनामधील काही त्रुटी आहेत किंवा उणीव आहेत त्या आम्ही सरकारच्या निदर्शनास आणून देऊ

शिवसेना सदैव शेतकऱ्यांच्या पाठीशी उभी रहाणार आहे

शेतकरी कर्ज माफी आणि दुसरा प्रधान मंत्री फसल विमा यासाठी ही पत्रकार परिषद आहे

या दोन्ही योजना चांगल्या आहेत.पण यंत्रणा तीच राहिली त्यामुळे योजना शेतकऱ्यापर्यत पोहोचत नाही..यामुळे या कंपन्यांना इशारा देण्यासाठी १७ तारखेला मुंबईत मोर्चा काढला जाणार आहे. यात मी सहभागी होणार आहे

येत्या बुधवारी  हा मोर्चा विमा कंपन्यांना इशारा देण्यासाठी वांदे येथील विमा कार्यालयावर शिवसेना मोर्चा काढणार आहे. 

जर विमा कंपन्यांना कळत नसेल तर त्यांना शिवसेनेच्या भाषेत उत्तर देऊ, 

हा मोर्चा शेतकऱ्याचा नसेल तर शेतकऱ्यांसाठी असेल..

मुंबईमध्ये आम्ही हा मोर्चा हाती घेत आहोत. हा इशारा मोर्चा आहे. पण तरी देखील विमा कंपन्यांना ते कळत नसेल तर त्यांना शिवसेनेच्या भाषेत उत्तर देईल

शिवसेनेची मदत केंद्र ग्रामीण भागात आहेत तिकडे अर्ज येत आहेत. 

जन आशीर्वाद यात्रा ही वेगळी आहे. ती समाजाच्या सर्व घटकांचे आशीर्वाद घेण्यासाठी जाणार आहेत.

कृषी आयोग स्वतंत्र असावा अशी आमची मागणी आहे

तसेच ज्यांना शेतीमधील समजणार त्यांना यामध्ये सामील करून घ्यावे

योजनांचा पैसा आला असताना विमा कंपन्यानी तो हाताशी राखून ठेवू नये

मोर्चा मुंबईत असला तरी त्या त्या जिल्ह्यात आमची शिष्टमंडळ जातील

Conclusion:
Last Updated : Jul 11, 2019, 6:27 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.