ETV Bharat / city

​​Uddhav Thackeray : प्रकल्प गुजरातला जात असताना काय करत होतात? उद्धव ठाकरेंनी शिंदे - फडणविसांना खडसावले

​​Uddhav Thackeray वेदांता प्रकल्पावरुन आरोप - प्रत्यारोप होत असताना, माजी मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिंदे - फडणवीस सरकारला ( Shinde Fadnavis Govt ) चांगलेच खडसावले. महाराष्ट्राचा लहान भाऊ असलेल्या गुजरातकडे प्रकल्प ( vedanta project ) जातो. मग तुम्ही काय करत होतात, असा सवाल ठाकरेंनी विचारला आहे. ( Uddhav Thackeray scolded Shinde Fadnavis what Are They Doing When The Projects Are Going To Gujarat )

Shinde Fadnavis Govt
शिंदे फडणवीस सरकार
author img

By

Published : Sep 17, 2022, 8:35 PM IST

Updated : Sep 17, 2022, 10:27 PM IST

मुंबई - ​​Uddhav Thackeray वेदांता प्रकल्पावरुन आरोप - प्रत्यारोप होत असताना, माजी मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ( ​​Uddhav Thackeray ) यांनी शिंदे - फडणवीस सरकारला ( Shinde Fadnavis Govt ) चांगलेच खडसावले. महाराष्ट्राचा लहान भाऊ असलेल्या गुजरातकडे प्रकल्प जातो. मग तुम्ही काय करत होतात, असा सवाल ठाकरेंनी विचारला आहे. वेदांता प्रकल्प ( vedanta project ) गुजरातमध्ये गेल्यानंतर काही दिवसांपासून राज्यात जुंपली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्याकडून महाविकास आघाडी सरकार तसेच तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर आरोप करत आहेत. शिवसेना पक्षप्रमुख, राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वेदांता प्रकल्पावर मौन सोडले. ( Uddhav Thackeray scolded Shinde Fadnavis what Are They Doing When The Projects Are Going To Gujarat )

सत्ताधाऱ्यांनी आत्मपरीक्षण करावे - वेदांता प्रकल्प महाराष्ट्रात सुरु व्हावा,( Vedanta project should be started in Maharashtra ) यासाठी सतत प्रयत्न केले. त्यादृष्टीने हालचाली सुरु केल्या. मात्र, आपले अपयश उघडे पडू नये, म्हणून राज्य सरकारकडून मविआवर आरोप सुरु आहेत. एकीकडे सांगयचे गुजरात महाराष्ट्राचा लहान भाऊ. त्याच गुजरातला प्रकल्प गेला, पण राज्य सरकार त्यावेळी काय करत होते? दोन महिन्यात फॉक्सकॉन प्रकल्प ( The Foxconn project ) गुजरातला गेलाच कसा, वेदांता आणि फॉक्सकॉन सारख्या कंपन्या राज्याबाहेर गेल्यामुळे राज्याचे नुकसान झाले आहे. सत्ताधाऱ्यांनी याचे आत्मपरीक्षण करावे, असा सल्ला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिंदे - फडणवीस सरकारला दिला आहे.

विरोधकांना दिला इशारा - राज्यातील राजकीय घडामोडींनंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी आज विभाग प्रमुखांची बैठक घेतली. दरम्यान, शिवसेनेवर दावा करणाऱ्यांनी शिवसेनेची घटना समजून घ्या, असा चिमटा ही उद्धव ठाकरे म्हणाले. राज्यात शिवसेनेला शह देण्यासाठी शिंदे गटाकडून प्रयत्न सुरु आहेत. त्यांच्यावर शरसंधान साधताना, उद्धव ठाकरे​ यांनी ठाकरे​ कुटुंबियांची आता चौथी पिढी​ राजकारणात येत असल्याचे ​सांगत विरोधकांना इशारा दिला.

Last Updated : Sep 17, 2022, 10:27 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.