ETV Bharat / city

महाशिवआघाडीत गुप्त बैठक? उद्धव ठाकरेंनी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक घेतल्याची चर्चा

author img

By

Published : Nov 14, 2019, 5:48 PM IST

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची आज गुरूवारी, प्रसार माध्यमे आणि पोलिसांच्या सुरक्षेलाही चकवा देत काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांबरोबर बैठक झाल्याची माहिती समोर येत आहे..

महाशिवआघाडीत गुप्त बैठका

मुंबई - राज्यातील सत्ता स्थापनेसाठी काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या नेत्यांच्या बैठकांचे सत्र गुप्तपणे सुरू असल्याचे उघड होत आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची आज गुरूवारी प्रसार माध्यमे आणि पोलिसांच्या सुरक्षेलाही चकवा देत काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांबरोबर जुहू येथील हॉटेल जे. डब्ल्यू. मेरिट येथे बैठक झाल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

हेही वाचा... उद्धव ठाकरे आणि मोदी यांच्यात फुट पाडण्याचा प्रयत्न - संजय राऊत

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज गुरूवारी मातोश्रीवरून झेड प्लस सुरक्षा न घेता दुपारी एक वाजता उद्धव ठाकरे यांचे स्वीय सचिव मिलिंद नार्वेकर यांच्या गाडीतून बाहेर पडले आणि एमआयजी क्लबच्या दिशेने गेले. उद्धव ठाकरे ट्रायडंट हॉटेल, सोफिटेल, मुंबई क्रिकेट असोसिएशन क्लब हाऊस येथे कुठल्या प्रकारची बैठक न घेता त्यांनी गुप्तपणे काँग्रेस-राष्ट्रवादी नेत्यांबरोबर बैठक केल्याचे समजत आहे. ही बैठक आटोपून उद्धव ठाकरे पावणे दोनच्या सुमारास पुन्हा मातोश्रीवर शिवसेनेच्या नेत्यांसह 'मिशन फत्ते' करून पोहोचल्याचे दिसत आहे. यामुळे या एकूण प्रकाराची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

हेही वाचा... महाराष्ट्र ही काय जुगारावर लावण्याची 'चीज' नाही; सेनेचा भाजपवर बाण

Intro:
मुंबई - राज्यातील सत्ता स्थापनेसाठी काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या नेत्यांच्या बैठकांचे सत्र गुप्तपणे सुरू असल्याचं उघडत होत आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज प्रसार माध्यम आणि पोलिसांच्या सुरक्षेला ही चकवा देत काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांबरोबर जुहू येथील हॉटेल जे. डब्ल्यू. मेरिट येथे बैठक झाल्याची माहिती सुत्रांनी दिलीय.
Body:शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज मातोश्रीवरून झेड प्लस सुरक्षा न घेता दुपारी एक वाजता उद्धव ठाकरे यांचे स्वीय सचिव मिलिंद नार्वेकर यांच्या गाडीतन  बाहेर पडले. आणि एमआयजी क्लबच्या दिशेने गेले. उद्धव ठाकरे ट्रायडंट हॉटेल , सोफिटेल ,मुंबई क्रिकेट असोसिएशन क्लब हाऊस इथे कुठल्या प्रकारची बैठक न घेता त्यांनी गुप्तपणे काँग्रेस-राष्ट्रवादी नेत्यांबरोबर बैठक केली आहे. ही बैठक आठपुन उद्धव ठाकरे पावणे दोनच्या सुमारास पुन्हा मातोश्री शिवसेनेच्या नेत्यांसह मिशन फत्ते करून पोचले. यामुळे राजकीय वर्तुळात एकच चर्चा निर्माण झालीय.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.