मुंबई - राज्याचे मुख्यमंत्रीपद स्वीकारल्यानंतर उद्धव ठाकरे आज बहुमताच्या परीक्षेला सामोरे गेले. यामध्ये सत्ताधारी स्वत:चे बहुमत सिद्ध करण्यात सक्षम ठरले असून महाविकास आघाडीला 169 आमदारांचा पाठिंबा मिळाला आहे. सध्या हंगामी विधानसभा अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे दिलीप वळसे पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
रविवारी(1नोव्हेंबर)ला विधानसभा अध्यक्षांची निवड होणार आहे. यावेळी राज्यपाल अभिभाषण करणार असून त्यांनी महाविकास आघाडीला 3 डिसेंबपर्यंत विश्वासदर्शक ठराव मंजूर करण्याची मुदत दिली होती. यानंतर आज सभागृहात पार पडलेल्या विश्वासदर्शक ठरावात उद्धव ठाकरे सरकारला बहुमत सिद्ध करण्यात यश आले आहे.
- 2.54 PM - भाजपच्या आमदारांनी सभात्याग केल्याने महाविकास आघाडीविरोधात शून्य मतं मिळाली
- 2.52 PM - 4 आमदारांनी तटस्थ राहणे पसंत केले
- 2.50 PM- महाविकासआघाडीला मतमोजणीत 169 मते मिळाली
- 2:33 PM- विश्वास दर्शक ठरावाच्या मतदानाला सुरुवात
- 2:32 PM- भाजप आमदारांनी सभा त्याग केला.
- 2:30 PM- विधानसभा अध्यक्षांनी विश्वास दर्शक ठराव मांडला
- 1.40 PM - शिवसेनेचे सर्व आमदार भगवे फेटे घालून विधान भवनात उपस्थित
- 12:36 PM - चंद्रपूरचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार झाले सत्ताधारी गोटात दाखल
- 12.45 PM - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विधानभवनात दाखल
- 12.35 PM - राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेनेकडून आमदारांना व्हीप जारी
- 12:26 PM - राष्ट्रवादीचे विधिमंडळ गटनेते जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या विश्वासमत ठरावाला पाठिंबा देण्यासाठी व्हिप जारी
- 12:26 PM - देवेंद्र फडणवीस विधानभवनात दाखल
- 11:40 AM - विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले हे अध्यक्ष होत असल्याने मला त्याचा विशेष आनंद - प्रफुल पटेल
- 11:36 AM - तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी नाना पटोले यांचा विधानसभा अध्यक्ष पदाचा अर्ज भरला - एकनाथ शिंदे
- 11:30 AM - विधानभवनात सर्वपक्षीय आमदार दाखल होण्यास सुरुवात
- 11:07 AM - भाजपचे आमदार हे आमचेच आमदार आहेत. ते आमदार पुन्हा पक्षात येण्यास तयार आहेत - नवाब मलिक
- 11:04 AM - भाजपने फोडाफोडीचे राजकारण करू नये - नवाब मलिक
- 10:44 AM - शिवाजी पार्क येथे झालेला शपथविधी कायदेशीर नाही, राज्यपालांकडे याचिका दाखल होईल - चंद्रकांत पाटील
- 10:36 AM - विधानसभा अध्यक्षपदासाठी काँग्रेसकडून नाना पटोले अर्ज भरणार; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांची घोषणा