ETV Bharat / city

...म्हणून कंगना राणौतने उद्धव ठाकरे यांना म्हटले 'जगातील सर्वोत्तम मुख्यमंत्री' - कंगना राणौतची उद्धव ठाकरेंवर इंस्टाग्राम स्टोरी

कंगना रणौतने 'थलायवी' चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी महाराष्ट्र सरकारला राज्यातील चित्रपटगृहे उघडण्याची विनंती केली होती. मात्र राज्य सरकारने चित्रपटगृहे न उघडल्याने तिने बंद सिनेमागृहांवरून महाराष्ट्र सरकारवर निशाणा साधला आहे.

Uddhav Thackeray is the best cm
Uddhav Thackeray is the best cm
author img

By

Published : Sep 19, 2021, 9:36 AM IST

हैदराबाद - बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. अलीकडेच अभिनेत्रींचा चित्रपट 'थलायवी' सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात तिने तामिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांची भूमिका साकारली होती. आता कंगना रणौतने मुंबईतील बंद सिनेमागृहांवरून महाराष्ट्र सरकारवर निशाणा साधला आहे.

Uddhav Thackeray is the best cm
कंगणाची पोस्ट

काय म्हणाली कंगणा -

तिच्या इन्स्टाग्रामवर एक स्टोरी पोस्ट केली आहे. 'महाराष्ट्र सरकारने अद्याप मुंबईत चित्रपटगृहे उघडलेली नाहीत. त्यामुळे चित्रपट उद्योगाला मोठे नुकसान होत आहे. यासोबतच कंगना रणौतने उद्धव ठाकरे यांना जगातील सर्वोत्तम मुख्यमंत्री म्हणून टोलाही लगावला आहे. चित्रपटसृष्टीतून चित्रपट संस्कृती पूर्णपणे नष्ट होईपर्यंत महाराष्ट्र सरकार सिनेमागृह बंद ठेवणार आहे. चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होण्याच्या रांगेत अनेक चित्रपट आहेत आणि कलाकार, निर्माते, वितरक आणि थिएटर ऑपरेटर्सबद्दल कोणालाही चिंता नाही. बॉलिवूडने शांतपणे दुःख सहन करण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु जगातील सर्वोत्तम मुख्यमंत्र्यांना कोणीही प्रश्न विचारू शकत नाही.

यापूर्वीही केली होती मागणी -

दरम्यान, कंगना रणौतने 'थलायवी' चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी महाराष्ट्र सरकारला राज्यातील चित्रपटगृहे उघडण्याची विनंती केली होती. महाराष्ट्रात कोरोना रुग्णांमध्ये घट झाली आहे. त्यामुळे राज्यातील चित्रपट उद्योग आणि सिनेमा व्यवसाय सुरू, अशी विनंती तिने राज्य सरकारला केली होती.

हेही वाचा - दाऊद इब्राहिमचा खास मानल्या जाणाऱ्या तारिक अब्दुल करीम मर्चंटला 22 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.