ETV Bharat / city

Uddhav Thackeray : एकनाथ शिंदें यांनी वाईट पद्धतीने मुख्यमंत्री पद मिळविले- उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray Interview by Sanjay Raut : उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या संजय राऊत (Sanjay Raut) यांनी घेतलेल्या मुलाखती दुसरा भाग आज प्रसारीत होत आहे. या भागात बंडखोरांसह केंद्र सरकार, भाजपवर उद्धव ठाकरेंनी थेट निशाणा साधला आहे.

Uddhav Thackeray Interview by Sanjay Raut

author img

By

Published : Jul 27, 2022, 9:08 AM IST

Updated : Jul 27, 2022, 11:12 AM IST

मु्ंबई - एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याबरोबरच 40 आमदाराने बंड केले होते. महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार (Maha Vikas Aghadi) अल्पमतात आली होती. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आणि सरकार कोसळले आहे. यानंतर एकनाथ शिंदे गटाने भाजपच्या पाठिंब्यावर सरकार स्थापन केले आहे. या सर्व घडमोडीनंतर उद्धव ठाकरे यांनी पहिल्यांदाच मुलाखत दिली आहे. या मुलाखतीचा दुसरा भाग आज प्रसारित झाला आहे.

Uddhav Thackeray Interview by Sanjay Raut

बंडखोरानी भाजप सोबत जाण्याचा निर्णय घेतल्याच्या मुद्द्यावर उद्धव ठाकरे यांनी भाष्य केले. आधी भाजप सोबत युतीत होतो. पंचवीस वर्ष युती टिकली. पुढे भाजपा त्रास देत होती, शिवसेनेला खोटं ठरवत होती, आपल्यासोबत ठरलेल्या गोष्टी नकार देत होती, म्हणून महाविकास आघाडीचा जन्म झाला. तर काँग्रेस-राष्ट्रवादी त्रास देत आहेत, म्हणायला लागले. त्यापूर्वी भाजप किती भयंकर आहे. कसा शिवसैनिकांवर अन्याय अत्याचार करतो, हे सांगत आत्ताच्या मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला होता. तेव्हा म्हणालो होतो, संयम ठेवा मात्र भाजपसोबत सत्तेत त्रास होतोय असा सूर या बंडखोरानी लावला होता. गावागावात सेनेला काम करू देत नाही, भाजप शिवसेनेला संपवते असेही म्हणत होते, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

शिवसेनेचा मुख्यमंत्री परत होणार? ठाकरे - असा प्रश्न उद्धव ठाकरे यांना संजय राऊतांनी विचारला असता ते म्हणाले की, का नाही होणार? आणि तो जर करायचा नसेल, तर माझ्या लढाईला काय अर्थ आहे. माझे जे शिवसेनाप्रमुखांना वचन दिलं आहे, ते आज कायम राहणार आहे. मी तर शिवसेनेचा आहे. मी पक्षप्रमुख आहे. पण माझा हेतू तो नव्हता. मी मुख्यमंत्री होणार असे मी बोललो नव्हतो आणि वचन पूर्ण केल्यानंतर देखील मी काय दुकान बंद करून बसणार का? शिवसेना मला वाढवायची आहे, आणि ती जर का वाढवण्याचा प्रयत्न मी सोडणार, तर मी कशाला पक्षप्रमुख? उद्धव ठाकरे यांनी यावेळी म्हणाले.

एकनाथ शिंदें यांनी वाईट पद्धतीने मुख्यमंत्री पद मिळविले - एकनाथ शिंदें यांनी वाईट पद्धतीने मुख्यमंत्री पद मिळविले. काँग्रेस विश्वासघात करणार असल्याचे भासवित होते. शरद पवारांची तीच ओळख होते, असे सांगण्यात येत होते. पण, माझ्याच लोकांनी दगा दिला. सांगितले असते तर सन्मानाने दिले असते. अजून सरकारच स्थापन झालेले नाही.

सत्तापीपासून, सावध रहा - बंडखोरांना पदाची लालसा आहे. स्वतःला मुख्यमंत्रीपद हवं असल्याने अत्यंत वाईट पद्धतीने त्यांनी सगळं मिळवले. ही आमची शिवसेना म्हणत आता शिवसेना प्रमुखांबरोबर तुलना करू लागले आहेत. हे सत्तापीपासून उद्या भाजपने पक्षात घेतल्यास पुढे नरेंद्रभाईं मोदीं बरोबर तुलना करायला लागतील आणि पंतप्रधान पद मागतील, यांच्यापासून भाजपने सावध राहावे असे आवाहन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले आहे.

हेल्दी राजकारण करावं - गेले पंचवीस सोबत होतो. तरी सुद्धा काहीही कारण नसताना भाजपने २०१४ मध्ये युती तोडली. आम्ही तेव्हा हिंदुत्व सोडले नव्हत आणि आजही हिंदुत्व सोडलेले नाही, अशा शब्दांत भाजपला खडे बोल सुनावले. भाजपने हेल्दी राजकारण करावं असा सल्ला पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला. तसेच, युती काळात शिवसेनाप्रमुख आणि देश तुम्ही सांभाळा महाराष्ट्र मी सांभाळतो म्हटलं होते. पण तुम्ही देशात पसरू देत नाही. दिल्लीत लाल किल्ल्यावर जाऊन भाषण करण्याची आपली इच्छा नाही. पण निदान महाराष्ट्र आणि मुंबईची जागा देणार नसाल, तर युतीला काय अर्थ? असा सवाल ही उद्धव ठाकरे यांनी केला आहे.

राज्यकर्त्यांचा मुंबई जीव - मुंबई महापालिका निवडणूक लवकर जाहीर झाल्या पाहिजेत. मुंबई महापालिकेवर भगवा फडकणारच, असा विश्वास शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. अनेकांनी या निवडणुकीनंतर शिवसेना राहणार नाही, असं म्हटलं होतं. मुंबईत मुंबईकर आता एकत्र झाले आहेत. हिंदुत्वात मराठी फोडण्याचा प्रयत्न केला ते देखील आता मला येऊन भेटत आहेत. तमाम मुंबईकर आज निवडणुकांची वाट पाहत आहेत. फक्त पालिकाच नाही तर विधानसभेच्या निवडणुका ही लवकरात लवकर घ्याव्यात, असे उद्धव ठाकरे म्हणाले. तसेच मुंबईवर शिवसेनेचा जो पगडा आहे. तो मिटवण्याचा प्रयत्न सुरू आहे. घात नक्कीच होऊ शकतो आणि त्यांचं जून स्वप्न आहे. जसा रावणाच्या बेंबीत जीव होता, तसा राज्यकर्त्यांच्या मुंबईत आहे. दिल्ली मिळाली तरी मुंबई पाहिजे, असे विचित्र प्रकार सुरू असल्याचा घणाघात भाजपवर केला.

माझ्यावरचा राग आरे वर काढू नका - राज्यात सत्तांतर होताच शिंदे सरकारकडून जुन्या निर्णयांना स्थगिती देण्याचा सपाटा सुरू झाला आहे. शपथविधीच्या दुसऱ्या दिवशी आरेतील मेट्रो -३ कारशेड प्रकल्पावरील स्थगिती उठवण्यात आली. आरे कारशेडच्या निर्णयानंतर माझ्यावरचा राग मुंबईवर काढू नका असे मी वारंवार सांगत आहे. पर्यावरणाचा घात होईल, असं काहीही करू नका झाडांची कत्तल केल्यानंतर बिबट्यांचा वावर आहे. त्याचा रिपोर्ट माझ्या घरी टेबलावर आहे. तिथे वन्यजीव आहेत कांजुरच्या ओसाड जागेत केलं तर हीच मेट्रो अधिक लोकसंख्या साठी वापरता येईल. आज ना उद्या कांजुरमध्ये जावं लागणार आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले. तसेच आरेमध्ये कारशेड करताना कोर्टात प्रतिज्ञापत्र दिले. त्यात ठराविक जागे व्यतिरिक्त जागा वापरणार नाही असे सांगितले. परंतु त्यांना जागा वापरावीच लागणार आहे. केवळ तुमच्या हट्टपायी मुंबईचा घात करू नका, असे उद्धव ठाकरे यांनी सांगताना मुंबईच्या बाहेरचे असल्याने त्यांना मुंबईबद्दल प्रेम नसल्याचे म्हटले.

ऑगस्टमध्ये दौरा - राज्यातील वातावरण ढवळून निघाले असताना आदित्यच्या दौऱ्याला प्रचंड गर्दी उचलत आहे. त्यांना धडा शिकवायचा हिच चर्चा आहे. मी ऑगस्टमध्ये बाहेर पडणार आहे. गेल्या आठवड्यात जिल्हा प्रमुखांना काही सूचना केल्या आहेत. जास्तीत जास्त सदस्य नोंदणी, सक्रिय कार्यकर्त्यांची नोंदणी मोठ्या प्रमाणात सुरू आहे. जेव्हा मी राज्यात सुरू लागेल, तेव्हा सगळे नेते माझ्यासोबत फिरतील. त्या दौऱ्यात येण्यासाठी ही काम सोडावी लागतील म्हणून थांबल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले.

मान ठेवण्यासाठी विश्वासघातकी म्हणतोय - महाराष्ट्रात शिवसेनेचे पुन्हा तुफान निर्माण करावा लागेल आणि तो आहे. लोकांच्या मनात हृदयात, तुफान आहे, असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. मी महाराष्ट्राच्या जनतेचा सदैव ऋणी आहे. वर्षा बंगला सोडून निघाल्यानंतर महाराष्ट्राच्या डोळ्यात पाणी होते. त्या अश्रूंचे मोल मला आहे, त्या अश्रूंची किंमत या विश्वास घातक्यांना चुकवायला लागल्याशिवाय आपल्याला गप्प बसता येणार नाही ही जनतेला विनंती आहे, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले. तसेच फुटीराना तुमच्याकडे गद्दार म्हणू नका विनंती केली जाते, असा सवाल संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांना विचारला असता, गद्दार नाही तर विश्वासघातकी उपमा दिली. विश्वासघातकी बोलून त्यांचाही मान ठेवल्याचा चिमटा ठाकरे यांनी काढला.

ठाकरेंच्या परिवारावरील टीकेला उत्तर का दिली नाही - शिवसेनेकांना काहीही नसताना ईडीपीडी मागे लावली जात आहे. अडीच- अडीच वर्षाचे मुख्यमंत्री पद भाजपने का दिलं नाही, शिवसेनेला सन्मानित वागणूक भाजप कशी देणार ? या तीन गोष्टी मला आमदारांना विचारायचे आहेत. खासदाराना त्या दिवशी बोललो अडीच वर्ष कोणीही हिम्मत केली नाही. आज बाळासाहेबांचा फोटो लावून आम्ही शिवसेनेत असल्याचे सांगत आहेत, त्यांना माझा एक सवाल आहे. बाळासाहेबांच्या कुटुंबाबद्दल, मातोश्रीबद्दल अश्लाघय भाषेत जे बोलले गेले, त्याबद्दल तुम्ही काय बोलणार आहात.? त्याबद्दल तुम्ही मधल्या काळात का बोलला नाहीत आम्हाला मान्य नाही. एवढं सगळं तुमच्या नेत्यांच्या, कुटुंबियांच्याबद्दल, घराबद्दल, मातोश्रीबद्दल बोलून सुद्धा तुम्ही शेपट्या घालणार, असा सवाल पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला.

तुमच्या हट्टापायी शिवसेनेला भाजपच्या दाराशी बांधू का - बंडखोरांच्या हट्टापायी शिवसेनेला भाजपच्या दाराशी बांधू का? असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी बंडखोरांना विचारला आहे. तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही जाऊ शकता, पण शिवसेनेला सन्मान देण्याचे आज त्यांनी केला आहे, ते या आधी का केलं नाही. ठरल्याप्रमाणे झालं असत तर आज अडीच वर्ष होऊन गेल्यानंतर त्यांचा मुख्यमंत्री झाला असता किंवा शिवसेनेचा झाला असता. शिवसेनेच्या मुख्यमंत्र्याला तुम्ही पहिली अडीच वर्षे दिली असती तर ज्या तारखेला राजीनामा द्यायचा ती तारीख आणि वार टाकून त्याखाली मुख्यमंत्र्यांची सही आणि खाली पक्षप्रमुख माझी सही करणारे होर्डिंग मंत्रालयाच्या दारात लावले असते. परंतु ते शब्दावर ठाम राहिले नाहीत, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

फडणवीसांबाबत असं का वागले, कळत नाही - 5 वर्ष राज्याचा मुख्यमंत्री राहिलेला व्यक्तीने उपमुख्यमंत्री पद स्वीकारल्याने सर्व स्तरातून आश्चर्य होते. विरोधकांनीही या मुद्द्यावरून भाजपला लक्ष केले आहे. आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही यावर, उपर वाले की मेहरबान अशा शब्दांत भाष्य केले. देवेंद्र फडणवीस भाजपचे इथले सर्वात मोठे नेते आहेत. त्यांच्याच बरोबर असं का झालं, त्यांना का वागवलं गेलं, हे मला काही कळालं नाही. ठीक आहे तो त्यांच्या पक्षांतर्गत विषय आहे. त्यांच्या पक्षातले अनेक जुने जाणते नेते आजही माझ्या संपर्कात आहेत, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले ल. मात्र जे जुने जाणते निष्ठेने भाजपमध्ये आहेत, त्यांना शिवसेनेत यायचे असं काही पोकळ दावा नाही. त्यांना या गोष्टी पटत नाहीत, तरी देखील ते निष्ठेने भाजपचे काम करत असल्याचा चिमटा बंडखोर आमदारांना काढला.

हेही वाचा - ईडीला अटक आणि जप्तीचा अधिकार आहे का? पीएमएलएतील तरतुदींवर आज सर्वोच्च न्यायालयात निर्णय

हेही वाचा - Uddhav Thackeray Birthday : एकनाथ शिदे यांनी उद्धव ठाकरेंना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, पक्षप्रमुख उल्लेख टाळला!

Last Updated : Jul 27, 2022, 11:12 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.