मुंबई - शिवसेनेच्या ४० आमदारांनी बंडखोरी ( Shiv Senas 40 Rebel MLA ) केल्यानंतर एकनाथ शिंदे राज्यात मुख्यमंत्री ( CM Eknath Shinde ) झाले. या पाठोपाठ आता शिवसेनेचे खासदारही बंडखोरी ( Shiv Sena MP rebellion ) करायच्या तयारीत असून आज संसदेमध्ये त्यांचा स्वतंत्र गट स्थापन केला जाणार आहे. शिवसेनेच्या या बंडखोर खासदारांची कल्पना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ( Shiv Sena Party chief Uddhav Thackeray ) यांना होती, असा दावा शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी केला आहे.
खासदार कपटनीतीला बळी पडले? - याप्रसंगी बोलताना शिवसेना खासदार विनायक राऊत ( Shiv Sena MP Vinayak Raut ) म्हणाले की, खासदार बंडखोरी बाबत मला फार गांभीर्याने प्रतिक्रिया द्यायची नाही. हे होणार होते याची कल्पना उद्धव ठाकरे यांना होती. प्रत्येक खासदारावर दबाव टाकण्यात आला. वेगवेगळी प्रलोभने दाखवण्यासह त्यांच्याविरोधात विविध प्रकरणे दाखल करण्याच्या धमक्या द्यायच्या आणि आपल्याकडे खेचून घ्यायचे अशा प्रकारची कपटनीती दोन दिवसापासून शिवसेनेच्या खासदारांसोबत केली जात होती. दुर्दैवाने त्याला ते बळी पडले, असा आरोपही विनायक राऊत यांनी लगावला आहे.
विनायक राऊतांची घणाघाती टीका - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाला धक्का देत एकनाथ शिंदे गटाने शिवसेनेची नवीन राष्ट्रीय कार्यकारणी जाहीर ( Shiv Senas new national executive ) केली. त्यात माजी मंत्री रामदास कदम ( Ramdas Kadam ), आनंदराव अडसूळ ( Anandrao Adsul ) यांना नेतेपद देण्यात आले आहे. याविषयी बोलताना विनायक राऊत म्हणाले की, शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारणीला बरखास्त करण्याचा अधिकार या गद्दारांना ( Shiv Sena traitors ) नाही. त्यांनी शिवसेनेची कार्यकारणी बघावी, तपासावी आणि मगच या बाबतचा निर्णय घ्यावा. २० जुलैच्या सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीकडे ( Supreme Court hearing ) आमचे लक्ष आहे, असेही ते म्हणाले.
एकनाथ शिंदे गटासोबत जाणारे बंडखोर खासदार - श्रीकांत शिंदे (कल्याण), राहुल शेवाले (दक्षिण मध्य मुंबई), हेमंत पाटील (हिंगोली), प्रतापराव जाधव (बुलढाणा) कृपाल तुमाणे (रामटेक), भावना गवळी (यवतमाळ, वाशिम), श्रीरंग बारणे (मावळ), संजय मंडलिक (कोल्हापूर), धैर्यशील माने (हातकणंगले), सदाशिव लोखंडे (शिर्ड हेमंत गोडसे (नाशिक), राजेंद्र गावित (पालघर).
उद्धव ठाकरे यांच्यासोबत उरलेले खासदार - गजानन कीर्तिकर (मुंबई उत्तर पश्चिम), संजय जाधव (परभणी), ओमराजे निंबाळकर (उस्मानाबाद), अरविंद सावंत (मुंबई दक्षिण), विनायक राऊत (रत्नागिरी, सिंधुदुर्ग), राजन विचारे (ठाणे).
हेही वाचा - Mumbai Metro three : मुंबई मेट्रो तीन ऑगस्टमध्ये दाखल होणार - अश्विनी भिडे