मुंबई - सरकारचा विश्वासदर्शक ठराव जिंकल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी शिवसेनेला थेट आव्हान दिले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही शिंदे यांना जोरदार प्रत्युत्तर देताना, हिंमत असेल मध्यावधी निवडणुका घ्या, असा सूचक इशारा दिला. बंडखोर आमदार आणि भाजपचा यावेळी जोरदार समाचार घेतला. शिवसेना भवन येथे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जिल्हाप्रमुखांची बैठक घेतली. यावेळी ते बोलत होते. ( Uddhav Thackeray on mid term election )
सध्याच्या घडामोडींवर घटनातज्ज्ञांनी आपली भूमिका मांडावी - एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्याने राज्यात गेल्या काही दिवसांपासून राजकीय घडामोडींना वेग आला होता. एकीकडे शिंदे गटाने विश्वास दर्शक पारीत केल्यानंतर दुसरीकडे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आक्रमक पवित्रा घेत जिल्हाप्रमुखांना मार्गदर्शन करताना, भाजपचा शिवसेनेला संपवण्याचा डाव आहे. मात्र, आपण जनतेच्या न्यायालयात जाऊ, जर आपण चुकत असेल, तर जनता आम्हाला घरी बसवेल. तुम्ही चुकत असाल, तर जनता तुम्हाला घरी बसवेल. हिंमत असेल तर भाजपने मध्यावधी निवडणुका घेऊन दाखवाव्यात, असे थेट आवाहन त्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपला केले. तसेच, सध्या विधानसभेत सुरु असलेल्या घडामोडींवर घटनातज्ज्ञांनी आपली भूमिका स्पष्ट करावी, असे ठाकरे म्हणाले.
भाषणातील ठळक मुद्दे - लढायचे असेल तर सोबत राहा, भाजपचा शिवसेनेला संपवण्याचा डाव आहे. असे खेळ खेळण्यापेक्षा जनतेच्या न्यायालयात जाऊ, आम्ही चुकत असू तर जनता आम्हाला घरी बसवेल, तुम्ही चुकत असाल तर जनता तुम्हाला घरी बसवेल. घटना तज्ज्ञांना विनंती आहे आपण घटनातज्ञ आहात, सध्या जे सुरु आहे ते घटनेला धरून सुरु आहे की डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची घटना मोडण्याचा प्रकार सुरु आहे त्याबाबत आपली भूमिका मांडा. देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात महाराष्ट्रात जे सुरु आहे त्याबाबत सर्वाना सत्य बोलू द्या. विधानसभा मनमानी पद्धतीने चालवणे हा घटनेचा अपमान आहे, असेही उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.
शरद पवारांनी दिल्या होत्या सुचना - महाविकास आघाडी ( Mahavikas Aghadi ) सरकारला सत्तेपासून खाली ( Down from power )खेचून राज्यांमध्ये भारतीय जनता पक्ष आणि शिंदे यांचे सरकार स्थापन झाले आहे. मात्र, हे सरकार सहा महिन्यांमध्ये कोसळेल. त्यामुळे सर्व आमदार आणि नेत्यांनी मध्यवर्ती निवडणुकीच्या तयारीला ( Prepare for Midterm Elections ) लागा, अशा सूचना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना आणि आमदारांना दिल्या आहेत. शरद पवार ( NCP President Sharad Pawar ) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची आणि आमदारांची यशवंतराव चव्हाण सेंटर ( Meeting at Yashwantrao Chavan Center ) येथे सायंकाळी बैठक ( NCP meeting ) बोलावली होती. या बैठकीतून त्यांनी आपल्या नेत्यांना आणि आमदारांना या सूचना दिल्या आहेत.
नवीन सरकारमधील आमदार फुटण्याची शक्यता : काल विधिमंडळ विशेष अधिवेशन पार पडल्यानंतर शरद पवार यांनी सायंकाळी राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक बोलावली होती. त्यामध्ये त्यांनी राष्ट्रवादीच्या आमदार, नेत्यांना संबोधित करताना सांगितले की, शिवसेनेमधून बंडखोरी करून गेलेल्या आमदारांची मंत्रिमंडळ वाटपानंतर मोठ्या प्रमाणात नाराजी उमटण्याची शक्यता आहे. त्यामुळे बंडखोरी केलेल्या आमदार स्वगृही परत येण्याची शक्यतादेखील शरद पवार यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी आपल्या मतदारसंघात असलेल्या कामांकडे लक्ष देण्याच्या सूचना शरद पवारांनी या बैठकीतून केल्या आहेत.
हेही वाचा - Nana Patole On CM Eknath Shinde : गुवाहाटीतील महाशक्तीचा मुख्यमंत्र्यांवर प्रभाव; नाना पटोले यांचा घणाघात
हेही वाचा - आदित्य ठाकरे वगळता व्हीप झुगारणाऱ्या 14 आमदारांवर कारवाई करावी; विधानसभा अध्यक्षांना पत्र