मुंबई: पक्षात उभी फूट पडल्यानंतर देखील, नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला चांगले यश मिळाल्याचे पाहायला मिळतंय. या पार्श्वभूमीवर राज्यभरातून विजयी झालेल्या ग्रामपंचायतीचे उमेदवार व त्या जिल्ह्यातील पदाधिकारी सध्या पक्षप्रमुख उद्धव ठाकरे Party chief Uddhav Thackeray यांची भेट घेण्यासाठी मातोश्रीवर येत आहेत. असेच आज रत्नागिरी, बुलढाणा, औरंगाबाद अशा 3 जिल्ह्यातून पदाधिकारी उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी मातोश्रीवर आले होते. या पदाधिकाऱ्यांना उद्धव ठाकरे यांनी सूचना आणि मार्गदर्शन केले आहे.
निव्वळ त्रास आणि मनस्ताप देण्यासाठी या पदाधिकाऱ्यांशी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, माझ्या बाजूला राजन साळवी उभे आहेत. त्यांना गद्दारांनी अनेक आमिष दाखवली, पण ते हलले नाहीत. त्यांना गाडून त्यांच्या छाताडावर उभ राहून ग्रामपंचायती निवडून आणल्या आहेत. त्यांनी अतिशय खालच्या पातळीवर जाऊन राजकारण केले आहे. आपल्या पक्षाचं नाव गोठवलं, चिन्ह गोठवलं आणि मग निवडणुकीतून माघार घेतली. हे सगळं केवळ आणि केवळ त्रास द्यायचा मनस्ताप द्यायचा, आणि शिवसेना संपवायची यासाठीच केले आहे.
बुलढण्यात घेणार सभा पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, आपल्याला आपल्या कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना अडवण्याचे बरेच प्रयत्न झाले. अजून देखील ते सुरू आहेत. पण, आपल्याला जे नवीन निवडणूक चिन्ह मिळाले मशाल ती मशाल घेऊन तुम्ही सर्व माझे साथीदार पुढे जात आहात. धनुष्यबाण हे रामाचं होतं. याच बाणाने रामाने अन्याय रावणाला मारलं. आता आपल्याला मिळालेली मशाल देखील अन्यायाला जाळणारी आहे. आता अंधारात वाट दाखवणारी ही मशाल घेऊन आपण पुढे जात राहूया. मी लवकरच बुलढाण्यात येऊन सभा घेणार आहे, असा आश्वासन देखील उद्धव ठाकरे यांनी येथे जमलेल्या कार्यकर्त्यांना दिले आहे.