मुंबई - केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. एकनाथ शिंदे गट हीच खरी शिवसेना असून ती आमच्यासोबत आहे. तसेच उद्धव ठाकरे यांनी आम्हाला फसवले असे अमित शहा म्हणाले.
लालबागच्या राजाचे दर्शन - शाह यांनी लालबागच्या राजाचे दर्शन घेतले. त्यांनी राजाच्या चरणी डोकं टेकलं. यावेळी त्यांच्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. शाह यांनी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाचे लक्ष्य १५० जागा जिंकण्याचे आहे. तशी घोषणाच भाजप कार्यकर्त्यांच्या मेळाव्यामध्ये अमित शाह यांनी केली.
त्यांनी धोका दिला - मुंबईच्या दौऱ्यावर असणाऱ्या शाह यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर थेट निषाणा साधला. ते कार्यकर्त्यांसमोर भाषण देत होते. उद्धव ठाकरे यांनी आपल्याला धोका दिला. केवळ दोन जागांसाठी त्यांनी २०१४ मध्ये युती मोडली असे शाह म्हणाले. मोदी आणि फडणवीसांच्या नावाने मते मागून जिंकून आल्यानंतर विश्वासघात केल्याचा आरोप शाह यांनी केला. उद्धव ठाकरेंना आता त्यांची जागा दाखवण्याची वेळ आली आहे, अशा आशयाचे वक्तव्य अमित शाह यांनी केले.
योग्य शिक्षा झालीच पाहिजे - जे धोका देतात त्यांना योग्य शिक्षा झालीच पाहिजे असेही शाह यांनी कार्यकर्त्यांना आदेश वजा सूचक सांगितले. भाजपाच्या कार्यकर्त्यानी सर्वत्र समाजात मिसळून काम केलं पाहिजे, असे ते म्हणाले. थेट उद्धव ठाकरेंचा उल्लेख करुन शाह यांनी टीका केली उद्धव ठाकरेंनी केवळ दोन जागांसाठी २०१४ मध्ये आपल्यासोबतची युती तोडली असे शाह म्हणाले.
हिंदुविरोधी राजकारण आपल्याला संपवायचं आहे - भाजपच्या कार्यकर्त्यांना अमित शाह यांनी स्पष्ट संदेश दिला. राजकारणात काहीही सहन करा, पण धोका सहन करु नका असे अमित शाह यांनी कार्यकर्त्यांना स्पष्टपणे सांगितले. जे धोका देतात त्यांना योग्य शिक्षा दिली पाहिजे आणि यासाठी कार्यकर्त्यांनी मैदानात उतरलं पाहिजे असंही शाह म्हणाले. महाराष्ट्रातलं हिंदुविरोधी राजकारणं आपल्याला संपवायचं आहे, असंही अमित शाह यांनी स्पष्ट केलं.
हेही वाचा - राज ठाकरे यांच्या घरी आले बिहार विधान परिषदेचे सभापती देवेशचंद्र ठाकूर, चर्चांना उधाण