ETV Bharat / city

महात्मा गांधी जयंती : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची आदरांजली - गांधी जयंती मुख्यमंत्र्यांचे अभिवादन

मातोश्री या निवासस्थानी मुख्यमंत्री ठाकरे यांनी महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री या महामानवांना आदरांजली अर्पण केली.

महात्मा गांधी जयंती २०२०
महात्मा गांधी जयंती : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंने 'मातोश्री'वर वाहिली आदरांजली
author img

By

Published : Oct 2, 2020, 1:42 PM IST

मुंबई - राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांना जयंतीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अभिवादन केले. मातोश्री निवासस्थानी मुख्यमंत्री ठाकरे यांनी महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण केले.

महात्मा गांधी जयंती २०२०
मातोश्री या निवासस्थानी मुख्यमंत्री ठाकरे यांनी लालबहादूर शास्त्री या महामानवाला आदरांजली अर्पण केली.

भारतीय स्वातंत्र्याचे शिल्पकार, जगाला सत्याग्रहाचा मार्ग दाखवून देणाऱ्या महात्मा गांधी यांनी सत्य, अहिंसा आणि मानवता या मूल्यांसाठी आयुष्य वेचले. महात्मा गांधी यांचे विचार चिरकाल टिकणारे आहेत, असे मुख्यमंत्री म्हणाले.

माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांनी राष्ट्राभिमान जोपासताना साधी राहणी आणि उच्च विचारसरणीचा वस्तूपाठ घालून दिला. 'जय जवान, जय किसान' ही घोषणा त्यांनी कृतीतूनही सिद्ध केली. या दोन्हीही सुपुत्रांनी भारताला एक राष्ट्र म्हणून ओळख मिळवून देण्यात आणि राष्ट्रउभारणीत दिलेले योगदान अतुलनीय असल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले. विश्ववंद्य महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांना जयंतीनिमित्त कोटी कोटी प्रणाम, असे म्हणत मुख्यमंंत्री उद्धव ठाकरे यांनी दोन्ही महामानवांना आदरांजली वाहिली.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.