ETV Bharat / city

Thackeray On Mumbai : माझ्यावरचा राग मुंबईवर काढू नका, उद्धव ठाकरेंचे नव्या सरकारला आवाहन

author img

By

Published : Jul 1, 2022, 2:50 PM IST

Updated : Jul 1, 2022, 3:16 PM IST

माझ्यावरचा राग मुंबईवर काढू नका, असं आवाहन माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) यांनी आज विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Chief Minister Eknath Shinde ) यांच्या सरकारला केलं आहे. मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर आज प्रथमच उद्धव ठाकरे शिवसेना भवनात ( Shivsena Bhavn ) आले होते. महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथीनंतर माजी मुख्यमंत्री व शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रथमच पत्रकार परिषद घेत जनतेशी संवाद साधला आहे.

उद्धव ठाकरे
उद्धव ठाकरे

मुंबई - एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत मोठे बंड करून शिवसेनेचा मोठा गट फोडल्यानंतर उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला. भाजपनेते देवेद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार अशी अटकळ बांधली जात असतानाच भाजपने संख्याबळ जास्त असूनही एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदाचा मान दिला. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. मात्र, त्याला उद्धव ठाकरे यांनी आज आक्षेप घेतला. एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे मुख्यमंत्री होऊ शकत नाही, असे उद्धव ठाकरे यांनी आज म्हटले.

मुंबईवर राग नको - एकनाथ शिंदे यांचे बंड यशस्वी होत असल्याचे दिसल्याने अखेर उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर आज प्रथमच उद्धव ठाकरे शिवसेना भवनात ( Shivsena Bhavn ) आले होते. शिवसेना भवनातील पत्रकार परिषदेत त्यांनी माझ्यावरचा राग मुंबईवर काढू नका, असं आवाहन माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) यांनी आज विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Chief Minister Eknath Shinde ) यांच्या सरकारला केलं आहे. नव्या सरकारने सत्तेवर येताच आरेमधून कांजूरमार्गला नेलेले कारशेड पुन्हा आरेमध्येच करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यावरून उद्धव ठाकरे यांनी सरकारला हे आवाहन केलं आहे.

मी आधीच सांगितलं होतं - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शिवसेनेचे मुख्यमंत्री म्हणून मानण्यास त्यांनी साफ नकार दिला. तसंच भाजपनं हे आधीच केलं असतं तर राज्यात महाविकास आघाडीची गरजच पडली नसती, असंही ते म्हणाले. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, "काल जे काही घडलं ते मी अमित शहांना आधीच सांगितलं होतं. भाजप-शिवसेना युतीत आम्हाला अडीच वर्षे शिवसेनेचा मुख्यमंत्री हवा होता. त्यांनी आधी तयारी केली असती तर या महाविकास आघाडीच्या प्रयोगाची गरजच पडली नसती."

माझ्या खंजीर खुपसलात मुंबईकरांच्या नको - मेट्रो शेड प्रकल्पाची जागा बदलण्याबाबत झालेल्या चर्चेवर उद्धव ठाकरे यांनीही आपले मत मांडले. गुरुवारी एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर लगेचच पहिली कॅबिनेट घेतली. या बैठकीत त्यांनी आरे येथील मेट्रो कार शेड व जलयुक्त शिवार योजनेच्या कामाला पुन्हा एकदा सुरुवात करा, असे आदेश दिले. यावर उद्धव ठाकरे म्हणाले की, "माझा राग मुंबईकरांवर काढू नये. मेट्रो शेडच्या प्रस्तावात बदल करू नका. मुंबईच्या वातावरणाशी खेळू नका. आम्ही कंजूर मार्गचा पर्याय सुचवलेला आहे तोच पुढे चालू ठेवा. आता तर केंद्रात आणि राज्यात देखील तुमचंच सरकार आहे."

सत्तेसाठी जनतेचा विश्वासघात नाही - आपण ज्याला मतदान करतो त्याला परत बोलावण्याचा अधिकार प्रत्येक मतदाराला असला पाहिजे, असे ठाकरे म्हणाले. माझ्या पाठीवर कसा खंजीर खुपसला हे सर्वांनी पाहिले. भाजपने मला दिलेले आश्वासन पूर्ण केले असते तर किमान अडीच वर्षे त्यांचा स्वत:चा मुख्यमंत्री राहिला असता. महाराष्ट्रात सर्व काही आधीच ठरलेले होते. मात्र, महाराष्ट्रातील जनतेचा मी ऋणी आहे. मला वचन द्यायचे आहे की सत्तेसाठी मी कधीही विश्वासघात करणार नाही. सत्ता येते आणि जाते.

शिंदे शिवसेनेचे नाहीत - एकनाथ शिंदे यांचे सरकार कसे बनले, असा सवालही उद्धव ठाकरे यांनी केला. ते म्हणाले की, ज्या पद्धतीने हे सरकार स्थापन झाले आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्याला मुख्यमंत्री बनवलं अशा बातम्या पसरवल्या जात आहेत. तेच मी अमित शहा यांना सांगितले होते. हे सर्व सन्माननीय मार्गाने करता आले असते. त्यावेळी शिवसेना अधिकृतपणे तुमच्यासोबत होती, मात्र, आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे मुख्यमंत्री नाहीत." असं स्पष्टपणे उद्धव ठाकरे यांनी सांगितलं आहे.

लोकशाही वाचवा - मतदारांनी ज्यांना निवडून दिले तेच मुंबई, सुरत, गुवाहाटी व्हाया गोवा असे फिरत असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. कुठे आहे लोकशाही? लोकशाहीचे चार स्तंभ. लोकशाही वाचविण्यासाठी हे चार स्तंभ आता पुढे यायला हवे. लोकशाही वाचवा, चारही स्तंभ एकत्र या. पुढे या. लोकशाहीचे धिंडवडे थांबवण्याची गरज आहे, ज्याने मत दिले त्याचा बाजार असा मांडला गेला तर ते चुकीचे आहे. मतदाराचा लोकशाहीवरचा विश्वास उडेल." अशी चिंता देखील उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली.

हेही वाचा - Radhakrishna Vikhe Patil : विधानसभा अध्यक्षपदासाठी भाजपकडून राधाकृष्ण विखे पाटील यांचे नाव चर्चेत

Last Updated : Jul 1, 2022, 3:16 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.