ETV Bharat / city

अंतिम सत्र परीक्षा प्रकरण: 'न्यायालयाचा मान ठेऊनच अंतिम निर्णय घेणार'

राज्यातील विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा हिताचा विचार करूनच परीक्षेचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती उच्च तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा आदर करून याविषयी अंतिम निर्णय घेण्यात येईल, असे ते म्हणाले.

उच्च तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत
अंतिम सत्र परीक्षा प्रकरण: न्यायालयाचा मान ठेऊनच अंतिम निर्णय घेणार
author img

By

Published : Aug 28, 2020, 2:04 PM IST

Updated : Aug 28, 2020, 2:24 PM IST

मुंबई - सर्वोच्च न्यायालयाने अंतिम वर्ष परीक्षेच्या संदर्भात दिलेल्या निर्णयाचा आदर करत असल्याचे उच्च तंतत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले. मात्र त्यासोबतच राज्यातील विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न तितकाच महत्त्वाचा आहे. त्याकडेही लक्ष देऊन अंतिम वर्षांच्या परीक्षा कशा आयोजित करता येतील, यासाठी लवकरच निर्णय घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

अंतिम सत्र परीक्षा प्रकरण: 'न्यायालयाचा मान ठेऊनच अंतिम निर्णय घेणार'
राज्यात कोरोना आणि त्याचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन आम्ही अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठीचे प्रतिज्ञापत्रही न्यायालयात दिले . परंतु, आज न्यायालयाने दिलेल्या निकालामुळे आम्हाला विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करावा लागेल, अशी माहिती सामंत यांनी दिली.

आम्ही जो निर्णय घेतला होता, तो राज्यातील विद्यार्थी आणि पालक यांचा विचार करून घेतला होता. याबाबत अनेक विरोधी पक्षनेत्यांनी आरोप-प्रत्यारोप केले. परंतु, सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाच्या आदेशाचे पालन करुनच यातून मार्ग काढला जाईल, असे ते म्हणाले.

राज्यात अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्यासंदर्भात लवकरच सर्व विद्यापीठांमध्ये जाऊन त्या कुलगुरूंची चर्चा सरकारतर्फे चर्चा करणार आहोत. त्यासाठी विविध उपाययोजना काय आहेत, यासाठीचा दौरा करणार आहे. अंतिम वर्षाच्या परीक्षेसंदर्भात तब्बल साडेआठ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न आहे. तितकाच त्यांच्या आरोग्याच्या आणि जीवनाचा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यामुळे परीक्षा न घेण्याबाबत मत असलेल्या इतर राज्यांशी चर्चा करून राज्याचे महाधिवक्ता, विधी व न्याय विभागाच्या अधिकाऱ्यांसोबतसुद्धा चर्चा केली जाईल, अशी माहिती सामंत यांनी दिली.

सर्वोच्च न्यायालयाने 30 सप्टेंबर पर्यंत परीक्षा घेण्यासाठीची डेडलाइन दिली आहे. परंतु, यूजीसीने मात्र तशी काही डेडलाइन दिलेली नाहीय. त्यामुळे या सर्व गोष्टींचा विचार होणार असल्याचे ते म्हणाले.

Last Updated : Aug 28, 2020, 2:24 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.